मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
भुजंगप्रयात

भुजंगप्रयात

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


भुजंगप्रयात. य० ६, ६.
म्हणावें तयाला भुजंगप्रयात ॥ क्रमानेंच येती य चारी जयांत ॥
पदीं ज्याचियां अक्षरें येति बारा ॥ रमानायका दु: ख माझें निवारा ॥
चरणांत अक्षरें १२ गण - य, य, य, य.
उदाहरण * रामदास.
मना सज्जना भक्तिपंथेंचि जावें ॥ तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥
जनीं निंद्य तें कर्म सोडोनि द्यावें । जगीं वंद्य तें सर्वभावें करावें ॥१॥
द्रुतविलंबित. य० पा०.
द्रुतविलंबित वृत्त घडे तिथें ॥ न भ भ र क्रम हाच गणीं जिथें ॥
रविमितें चरणांतील अक्षरें ॥ त्वरित धर्म करा अपुल्या करें ॥
चरणांत अक्षरें १२ गण - न, भ, भ, र.
उदाहरण* वामनपंडित.
क्षणभरी जरि देह न सूटता ॥ तटतटां स्थळिंचे स्थळिं तूटता ॥
बळ असें कळलें खळसत्तमा ॥ दुरुनि लक्षितसे पुरुषोत्तमा ॥१॥
द्रुतविलंबित वृत्तांतील दुसर्‍या भ गणाचे जागीं ज गण घातला कीं, पुढील प्रियंवदा वृत्त होतें.
प्रियंवदा. य० ४,४,४.
कवि भले म्हणति ती प्रियंवदा ॥ न भ ज रा गण असे जिच्या पदा ॥
चरणिचीं असति अक्षरें रवी ॥ न करि तो अनय जो असे कवी ॥
चरणांत अक्षरें १२. गण - , भ, ज, र.
उदाहरण स्वकृत.
मुनिजनीं मदनसा दिसे सये ॥ मज गमे वर तुझ्या मनास ये ॥
जनकजेस रिझवूनियां तदा ॥ वदतसे निजसखी प्रियंवदा ॥१॥
उपेंद्रवज्रा वृत्तांतील शेवटच्या दोन गुरु अक्षरांत एक लघु अक्षर मध्यें जास्त घातलें कीं, पुढील वंशस्थ वृत्त होतें.

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP