मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
प्रहर्षिणी

प्रहर्षिणी

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


प्रहर्षिणी. य० ३, १०.
वृत्तातें म्हणति कवि प्रहर्षिणी त्या ॥
आरंभी म न ज र शेवटीं ग ये ज्या ॥
एकैका चरणिं सदक्षरेंहि तेरा ॥
देवाचें चरित कसें विचित्र हेरा ॥
चरणांत अक्षरें १३. गण - म, न, ज, र, ग.
उदाहरण *
अंगानें सरल तसाच तो मनानें ॥
कालानें चल न तसाच तो धनानें ॥
विद्येनें सरस तसाच तो मतीनें ॥
उक्तीनें चतुर तसाच तो कृतीनें ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP