मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
मदिरा किंवा सवाई

मदिरा किंवा सवाई

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


मदिरा किंवा सवाई. य० ६,६,५.
ठेविति नाम तया मदिरेसचि थोरथोर कविराज सवाई ॥
चार भकार पुढें र न भा ग ग जेथ जेथ गण येतिल पाई ॥
यांतहि तेविस अक्षरसंमिति पादिं पादिं सम मोजुनि घेई ॥
सज्जनसंग निरंतर जोडुनि दुष्टसंगातिस सोडुनि देई ॥१॥
चरणांत अक्षरें २३. गण - भ, भ, भ, भ, र, न, भ, ग, ग.
उदाहरण * मोरोपंत.
राम रघुत्तम कामरिपुप्रिय लोकशोकहर यापरि भावें ॥
दाशरथे तुज होऊनियां पदिं लीन दीनजनबंधुसि गावें ॥
आमरण स्मृति हेच असो वय याच साच सुपथांत सरावें ॥
दे वरदा वर या शरणाप्रति पापताजलधीस तरावें ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP