मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
शार्दूलविक्रीडित

शार्दूलविक्रीडित

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


शार्दूलविक्रीडित. य० १२,७.
आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित ॥
मा सा जा स त ताग येति गण हे पादास कीं जोडित ॥
एकोणीस पहा गणूनि चरणीं येतात हीं अक्षरें ॥
तेज: पुंज नभोंगणीं पसरलीं रत्नें पहा नक्षरें ॥१॥
चरणांत अक्षरें १९. गण - म, स, ज, स, त, त, ग.
उदाहरण मोरोपंत.
जो लोकत्रितयीं फिरे स्थिर नसे ताटीं जसा पादर ॥
स्वांतध्येयपदींच निश्चल भवांभोधींत जो पारद ॥
जो वर्णें गगनोदरीं क्षण दिसे पूर्णेदु कीं शारद ॥
श्रीशांत: पुरचत्वरींच उत्तरे तो सन्मुनी नारद ॥१॥
चरणांत अक्षरें २१ गण - म, र, भ, न, य, य, य.
उदाहरण * मोरोपंत.
माझा प्रेमा सुदामा हरिसख दुबळा शब्द - संदोह जो हे ॥
साधूंपाशीं श्रुतीनें पदर पसरुनी जोडिले स्वल्प पोहे ॥
या दीनोपायनातें बुधजन भगवान्‍ प्रीतिनें फार गोडी ॥
आणोनी श्रोत्रवक्त्री भरिल बहु दया मानुनी तेहि थोडी ॥१॥
१४ जाति आकृति. पादाक्षरें २२

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP