TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
अस्थिसंचयन श्राद्ध

अस्थिसंचयन श्राद्ध

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


अस्थिसंचयन श्राद्ध
गाईच्या शेणानें चितेची जागा सावरून तीवव्र त्रिकोणाकार वेदी, दक्षिणेस टोक होईल अशारीतीनें करून, देशकालाचा उच्चार करून अपसव्यानें ‘ अमुक गोत्राच्या अमुक प्रेताचें पेतत्व नष्ट होण्यासाठीं वेदीचें आराधन करितों ’ असें म्हणावे अमंत्रक तिलोदक करावें. वेदीला हळद, गुलाल यांनीं रंगवून पाण्यानें भरलेला घडा वेदीवर ठेवावा. त्यावर भाताचा मोठा पिंड ठेवावा; व त्यावर दर्भासह तिलोदक ‘ हा पिंड भोजनासाठी व हें पाणी पिण्यासाठी प्रेतास देतों ’ असें म्हणून द्यावें. त्याच्या पश्चिमभागीं श्मशानवासी रुद्रास, व त्याच्या उत्तरभागीं श्मशानवासी प्रेतांस, व पूर्व अगर दक्षिणभागी प्रेताच्या ( मृताच्या ) मित्रांनां, याप्रमाणें चार उदकंभ व पिंड ठेवावे; नंतर तीन यवाच्या पिठाच्या पोळ्या, तीन छत्र्या, व सहा पादुका करून, त्यापैकी एकेके पोळी, एकेके छत्री आणि दोन दोन पादुका याप्रमाणें काल, मृत्यु, व यम या दहनपतीनां द्याव्या, नंतर स्नान अक्रून अस्थिसंचयनश्राद्ध, नग्नप्रच्छादन श्राद्धाप्रमानेच करावें.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-05-24T14:13:54.0070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वावून

  • न. धारे . वावणे पहा . 
RANDOM WORD

Did you know?

विविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site