TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
पददानें

पददानें

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


पददानें
‘ मार्गकष्टपरिहारपूर्वक उत्तम लोक प्राप्तीसाठीं व तृप्तीसाठी पददानें करितों ’ असा संकल्प करावा. हीं पदें
१ आसन,
२ उपानह ( जोडा ),
३ छत्री,
४ मुद्रिका ( आंगठी ),
५ कमंडलु,
६ जानवें,
७ तूप,
८ वस्त्र,
९ भोजन,
१० अन्नभाजन ( म्ह. अन्नाचें मांडे ),
याप्रमाणें दहा आहेत.
दानाचा मंत्र :- ‘ त्रिलोकीनाथ, इ. याचा अर्थ वर दिलाच आहे.
शालग्रामदान :- ‘ मृतास पृथ्वीदानासारखें पुष्प प्राप्त होण्यासाठीं शालग्राम दान करतों ’ असा संकल्प करावा.
दानमंत्र :- ‘ देवांनी महाकोशाचे ठिकाणीं ठेवून ज्याला शोभा आणिली. त्या शालग्रामाचे दानानें मृतास शांति मिळो ’
रुद्राक्षमालादान :- मृतास सुख व उत्तम लोक मिळण्यासाठी रुद्राक्षदान करितों. ’ असा संकल्प करावा.
दानमंत्र :- ‘ ही अठ्ठावीस रुद्राक्षांची माळ, हे ब्राह्मणश्रेष्ठा, मी तुझे हातांत देतों, तिचा स्वीकार कर ’
पुस्तकदान :- “ गोदानासारखे फल मिळून स्वर्गलोकी निवास व्हावा व विद्यादानाचें वगैरे मृतास फळ मिळावें म्हणून पुस्तक दान करितों ” असा संकल्प करावा; व “ सर्व विद्या यज्ञास आधारभूत आहेत, व लेखन हें त्यांचे साधन आहे, यासाठीं पुस्तकदानाच्या योगेंकरून मृताचे वाणीस संतोष प्राप्त होवो. ” असें म्हणून पुस्तक द्यावें.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-05-24T14:13:55.0230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उपेगा येणें

  • उपयोगी पडणें 
  • कामास येणें. ‘येथे येता न भागा त्वरित हजरगा तीर्थ आले उपेगा।’- ब ६८७. उपयोग पहा. 
RANDOM WORD

Did you know?

कोणतीही ही पूजा करण्याआधी संकल्प कां करावा?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site