मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
दुसर्‍या दिवसापासूनची क्रिया

दुसर्‍या दिवसापासूनची क्रिया

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


दुसर्‍या दिवसापासून दहा दिवसपर्यंत जी क्रिया करावयाची ती पहिल्या दिवशी ज्या जागी क्रिया केली असेल त्याच जागी त्याच पात्री व त्याच अन्नादिक पदार्थांनीं करावी. कर्त्यानें स्नान, आचमन, व प्राणायाम केल्यावर देशकालाचा उच्चार करून अपसव्य करावें, आणि ‘ अमुक गोत्राच्या अमुक नांवाच्या प्रेताचें प्रेतत्व नष्ट होऊन उत्तम लोक प्राप्त होण्यासाठीं दुसरे दिवसाचा विधि करितो ’ असें म्हणून उदक सोडावें; व भात करावा. आणि पहिल्या दिवसाप्रमाणेंच तीन वेळ मृत्तिकास्नन करून अश्म्यावर तिलांजलि देऊन स्नान करावें; व ‘ अमुक गोत्राच्या अमुक नांवाच्या प्रेतास दुसरे दिवशीं डोळे, कान, नाक या अवयवांची उत्पत्ति होण्याकरितां हा पिंड देतों ’ असें म्हणूण पिंड द्यावा. तिसरे दिवशी, हात, छाती, मान व तोंड हे अवयव उत्पन्न होण्यासाठीं; चवथे दिवशीं, पाठ, कुशी, कंबर, बेंबी, गुदद्वार व मूत्रद्वार; पांचवे दिवशी मांड्या, गुडघे व पोटर्‍या; सहावे दिवशीं, घॊटे, पाय, बोटें, मर्म इत्यादि; सातवे दिवशी हाडें मज्जा व शिरा; आठवे दिवशी नख, केश इत्यादि अवयव; नववे दिवशी वीर्यादि उत्पन्न होण्यासाठीं; आणि दहावे दिवशीं क्षुधातृषाशमनार्थ, या प्रमाणें श्राद्धांचे संकल्प करावे. मृत्तिकास्नान, तिलांजलि, व पिंडदान वगैरे श्राद्धविधि पहिल्या दिवसासारखाच करावा. प्रेताचे अवयव ( लिंगदेहात्मक ) उत्पन्न होण्यासाठीं हीं श्राद्धें करावयाची असतात. त्यामुळें या श्राद्धांस अवयवश्राद्धें असें म्हणतात. या शिवाय तिसरे, पांचवे वगैरे दिवशी नव ( विषम ) श्राद्ध करावयाचें त्याविषयी वर सांगितलें आहेच. ही नऊ दिवसांची क्रिया सोईसाठीं एकदम नवव्या दिवशीच करण्याचा प्रघात आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP