TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

उपमालंकार - लक्षण ४०

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


लक्षण ४०
“ ज्याप्रमाणें राजा साठविलेल्या खजिन्याचें रक्षण करतो, व ज्या-प्रमाणें शेतकरी शेताचें रक्षण करतो, त्याप्रमाणें भगवान शंकर तुमचें नेहमीं भयापासून रक्षण करो. ”
या ठिकाणीं, ‘ त्रायताम्‍ ’ ह्या आज्ञार्थक क्रियापदाचें कर्तृत्व ज्या-प्रमाणें भगवान शंकराच्या ठिकाणीं जुळतें त्याप्रमाणें, उपमान असलेला राजा व शेतकरी ह्यांच्याशीं जुळत नाहीं. कारण कीं, आज्ञार्थी त्रायतां या क्तिया-पदाचें कर्तृत्व नेहमीं असिद्ध ( म्ह० पूर्ण व्हावयाचें ) असतें. आणि वरील श्लोकांतील उपमान असलेल्या, राजा व शेतकरी ह्यांनीं केलेलें त्राण व रक्षण ही सिद्ध ( पूर्ण ) झालेली वस्तू आहे. म्हणून वरील श्लोकांतील ‘ त्रायताम्‍ ’ ह्या रूपाऐवजीं ‘ त्रायते ’ असें आज्ञार्थकविरहित क्तियापदाचें रूप, केल्यास त्याचें कर्तृत्व उपमेय व उपमान ह्या दोहोंकडेही जाऊं शकेल. आणि अशा-रीतीनें त्रायते हा योग्य साधारण धर्म झाल्यानें ह्या उपमाश्लोकांत दोष राहणार नाहीं.
पण ह्या ठिकाणीं कोणी अशी शंका घेतात:-
“ तुम्ही आज्ञार्थक क्रियापद न वापरतां त्रायते असें वर्तमानकालिक रूप वापरलें तरीसुद्धां त्राणकर्तृतव हा साधारण नाहीं. कारण कीं, आज्ञार्थामुळें ज्याप्रमाणें धर्मांत भेद पडला त्याप्रमाणें, उप-मानांतील क्रियापद अनुवाद्य कोटींतील व उपमेय वाक्यांतील क्रियापद विधेय कोटींतील असल्याने, शेवटीं समानधर्मांत फरक हा पडणारच. ” ( कारण उपमान नेहमीं अनुवाद्य कोटींतच असतें. ) तेव्हां, ‘ त्रायताम्‍ ’ च्या ऐवजीं त्रायते असा पाठ तुम्ही घेतला तरी दोष हा राहणारच. ह्या शंकेवर आमचें उत्तर असें :-
तुमचें म्हणणें बरोबर आहे. ह्या श्लोकांतील धर्मलोपरहित म्ह० उपात्तधर्मा उपमेंत, धर्मवाचक शब्दांनीं (च) सांगितलेल्या, प्रार्थना, भूत, भविष्यत्‍ , वर्तमान ( काल ) इत्यादि रूप विशेषणांनी विशिष्ट जो धर्म ( येथें त्रायतां मधील त्राणकर्तृत्व हा धर्म ) तो, उपमेय व उपमान ह्या दोहोंना साधारण होत नाहीं. ( कारण, त्राणकर्तृत्व या धर्माचीं विशेषणें दोहोंना लागू होणारीं नाहींत; ) व म्हणून तो धर्म त्या दोहोमधील सादृश्याला कारण होणार नाहीं ( प्रयोजकाभावात्‍ ) आणि म्हणूनच या श्लोकांत उपमा निर्माण होत नाही ही गोष्ट निर्विवाद आहे. आतां प्रस्तुत स्थलीं, शब्दांनीं न सांगितलेल्या ( अर्थात्‍ , अर्थावरून समजल्या जाणार्‍या ) अनुवाद्यत्व ( ह्या केवळ उपमानाला लागू होणार्‍या विशेषणानें, ) व विधेयत्त्व ( ह्या केवळ उपमेयाला लागू होणार्‍या विशेषणानें ) या विशेषणांनीं विशिष्ट ( त्राणकर्तृत्व हा ) धर्म, साधारण धर्म होऊं शकत नसेल तर न होवो; प्रत्यक्ष शब्दांनीं न सांगितलेल्या ( उदासीनै: ) ( येथें अनुवाद्यत्व व विधेयत्व ) अशा विशेषणांनीं विशिष्ट धर्म उपमेंत साधारणधर्म व्हावा अशी मुळीं अपेक्षाच नसते; पण साक्षात्‍ धर्मवाचक शब्दांनीं निवेदित ( विशेषणांनीं विशिष्ट ) धर्म, साधारण धर्म म्हणून गणला जावा, अशी मात्र अपेक्षा खरी. ( म्हणूनच त्रायते ह्यांतील प्रार्थनानिर्मुक्त ( आज्ञार्थक प्रत्ययावाचूनचा ) केवळ त्राणकर्तृत्व हा धर्म, अनुवाद्यत्व व विधेयत्व ह्या, शब्दांनीं प्रतिपादित नसलेल्या, विशेषणांनीं विशिष्ट असला तरी त्याला साधारण धर्म मानायला मुळींच हरकत नाही. आणि म्हणून त्रायते ह्या प्रयोगांत प्रार्थनाविध्यादिकांच्या अनुपपत्तीचा दोष नाहीं.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:56.8730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

संकीर्ण

  • धावि . १ मिश्रित ; एकत्रित ; मिसळलेलें ; गोंधळ झालेलें . २ दाटी झालेलें ; गर्दीचें ; घोळका , गर्दी , दाटी झालेलें ( घर , खोली ). ३ संकलित ; एकवटलेलें . आरंभी पडिलीं होतीं तयाकरीं । संकीर्ण त्या नारीनर लोक । - तुगा ५४ . ४ आकुंचित ; थोडक्यांत आणलेलें ; संक्षिप्त . मूळ संकीर्ण कृष्णवेणी । - रावि २ . ५ क्षीण झालेलें ; र्‍हास पावलेलें ; अंधुक झालेलें ; अंतकाळचें ( ज्योति , जीव , प्राण ). अल्प ; थोडें . अन्नवस्त्र संकीर्ण घरीं । कुटुंब बहु आहे पदरीं । - भवि १८ . १३४ . ६ मिश्र जातीचा , रक्ताचा ; संकर झालेला ; कडू . [ सं . ] ७ ( संगीत ) अन्य रागांच्या मदतीनें रंजक होणारा ( राग ). 
  • पु. १ ( ताल ) पहिला विभाग नियमानें नऊ मात्रांचा असणारा दक्षिणेकडील एक ताल . 
  • p  Mixed. Crowded-a room or place. Compressed, shortened. Diminished, shrunken. Miscellaneous. 
  • ना. एकत्रित , विविध प्रकार मिसळलेले , संमिश्रित . 
RANDOM WORD

Did you know?

सूतक कोणाचे नसते?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site