TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

उपमालंकार - लक्षण २६

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


लक्षण २६
ह्यापैकीं पहिल्या उदाहरणांत आल्हादिनी व आनंदिनी हे अनुगामी धर्म असून ते ( धर्म ) उपमेय व उपमान ह्यांच्याठिकाणीं भिन्न स्थळीं भिन्न काळीं आहेत. दुसर्‍या उदाहरणांतील साधारण धर्म, बिंबप्रतिबिंबभावापन्न असून उपमेव व उपमान ह्यांच्या ठिकाणीं एकच काळीं व एकच स्थळीं राहतात, ह्या या दोहोंत फरक.
आणि दुसर्‍या उदाहरणांत, सीता बाहेर आल्यावर पूर्वीपेक्षां जास्त कांतियुक्त दिसली, ह्या वाक्यार्थाला उपस्कारक, श्लोकांतील दोन्ही उपमा, आहेत; ह्यांपैकीं पहिल्या उपमेंतील सूर्यमंडलाचे लंकेशीं सादृश्य अशामुळे कीं, सूर्यमंडल स्वतांत शिरणार्‍या वस्तूचा पूर्ण नाश करून टाकणारें, व अत्यंत देहीष्यमान, आणि लंका पण आंत शिरलेल्या माणसाचा पूर्ण नाश करणारी, व सोन्याची असल्यानें अत्यंत तळणारी; आणि दुसर्‍या उपमेंतील अग्नीच्या राशीचें व लंकेचें सादृश्य अशामुळें कीं अग्नीची रास, सोन्याच्या शुद्धतेला दाखविते, व आंत पडलेल्या वस्तूला भस्म करून टाकते; आणि लंका ही सीतेच्या शुद्धतेची खात्री करून देण्यास कारणीभूत होणारी व तिला भस्म करूं पाहणारी; अशारीतीनें सूर्यमंडल व लंका ह्या जोडींत, व अग्नीची रास व लंका ह्या जोडींत, सादृश्य असल्यानें, लंका ही बिंबभूत आणि सूर्यमंडल व अग्नि राशी ही लंकेची प्रतिबिंबिंभूत समाजावी. येथील उपमा मालारूप आहे. कारण येथील सीता हे उपमेय एकच व त्या एकच उपमेयाला घेऊन अनेक उपमा श्लोकांत एकत्र आल्या आहेत.
समस्तवस्तुविषया सावयवा उपमा ही:-
“ जिचें तोंड कमळासारखें आहे; जिचे केस भुंग्याप्रमाणें आहेत; जिचे हात कमलाच्या तंतूप्रममाणें आहेत; व जिची ( पोटावरील ) केसांची ओळ ( म्ह० रोमराजि ) शेवाळ्याप्रमाणें आहे; अशी ती बाला एक अद्‍भुत सरोवराप्रमाणें आहे ” किंवा वरील उपमेचेंच हें दुसरें उदाहरण-
“ चांदण्याप्रमाणें जिचें हसणें मंजुळ आहे; पूर्णचंद्राप्रमाणें जिच्या तोंडाची शोभा मनोहर आहे; पौर्णिमेच्या रात्रीप्रमाणें जिचें रूप रमणीय आहे, अशी ती सीता अत्यंत शोभते. ”
ह्या दोन्ही उदाहरणांतील उपमा समस्तवस्तुविषया आहेत. कारण, ह्यांतील सर्व उपमानें शब्दाने सांगितलीं आहेत व ती सावयवा ( साड्रा ) ही आहे; कारण ह्यांतील मुख्य उपमा, तिच्या अंगभूत असलेल्या ( छोटया ) उपमांनीं बनविली आहे.
एकदेशविवर्तिनी सावयवा. उपमा ही -
“ मगरासारख्या मोठ्या योद्धयांनीं व रत्नासारख्या कवींनीं युक्त असा तूं हे राजा, अमृताप्रमाणें असणार्‍या कवितेचें, व चंद्राप्रमाणें असणार्‍या कीर्तीचें ह्या जगांत जन्मस्थान आहेस. ”

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-17T19:36:08.1900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

irrevocable credit

  • रद्द न करता येण्याजोगी पत 
  • रद्द न करता येण्याजोगी पत 
  • अविकल्पी पत 
  • वज्रलेप पत 
RANDOM WORD

Did you know?

जानवे म्हणजे नेमके काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.