TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

उपमालंकार - लक्षण २५

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


लक्षण २५
ह्या सामान्य ( सांगणार्‍या ) सूत्राचा अर्थ नीट समजण्याकरतां, उदक शब्दांतील उकार पुढें आला असतां, दधि शब्दांतील इकाराचा यकार होतो, असें दुसर्‍या वाक्यानें विशेषाचें उदाहरण दिलें जातें; तसेंच येथेंहि कवीने चंद्रकिरणांच्या शेजारचा डाग हें विशेषाचें उदाहरण दिलें आहे. ह्याचें जास्त विवेचन आम्ही उदाहरण अलंकाराच्या वेळीं करणारच आहोंत.
आणखी, “ लुप्तोपमेचें बिंबप्रतिबिंबभावापन्न वगैरे भेद होत नाहींत; कारण लुप्तोपमेंत साधारण धर्म अनुगामी असलाच पाहिजे असा नियम आहे. ” असेंही अप्पय्य दीक्षितांनीं म्हटलें आहे. पण तें सुद्धां बरोबर नाहीं. कारण ‘ मलय इव जगति पाण्डुर्वल्मीक इवाधिधरणि धृतराष्ट्र: ’ । ( जगांत मलयपर्वतासारखा पांडुराजा, व वारुळासारखा पृथ्वीवर धृतराष्ट्र ) ह्या लुप्तोपमेच्या उदाहरणांत, अनुगामी धर्म दिसत नसल्यानें, पांडव व चंदन, आणि दुर्योधनादिक व सर्प ह्यांच्यांत बिंबप्रतिबिंबभावाची प्रतिति होते. बिंबप्रतिबिंबभाव असायला संबंधी पदार्थ, शब्दांनीं सागणें आवश्यक आहे, असा आग्रह धरणें विद्वानांना शोभत नाही. ( उलट ) बिंबप्रतिबिंब भावांत सुद्धां, श्रौतत्व व आर्थत्व असे दोन प्रकार असतात, असें मानणेंच योग्य आहे. म्हणूनच, अप्रस्तुतप्रशंसा इत्यादि अलंकारांत प्रकृत व अप्रकृत ह्या दोन वाक्यार्थांचें सादृश्य, त्या दोन वाक्यार्थांचीं जीं दोन अवयवें, त्यांचा बिंबप्रतिबिंबभाव मानण्यावर अवलंबून असतें, हें म्हणणें जुळतें.
ही उपमा रूपकाप्रमाणें, (१) केवलनिरवयवा, (२) मालारूप-निरवयवा, (३) समस्तवस्तुविषयसावयवा, (४) एकदेशविवर्तिसावयवा, (५) केवलश्लिष्टपरंपरिता, (६) मालारूपश्लिष्टपरंपरिता, (७) केवल-शुद्धपरंपरिता आणि (८) मालारूपशुद्धपरंपरिता अशी आथ प्रकारची असते. ह्या उपमेच्या प्रकारांत केवल ह्याचा अर्थ, ‘ मालेंत ओवली न जाणारी ’ हा; व निरवयवा ह्याचा अर्थ, दुसर्‍या एखाद्या उपमेची अपेक्षा न राखणारी म्हणजे त्या दुसरीवर अवलंबून नसणारी म्ह० स्वतंत्रपणें राहणारी’ हा. केवलनिरवयवा उपमेचीं शेंकडों उदाहरणें पूर्वी दिलीं आहेत. आतां मालारूपनिरवयवा उपमा ही-
“ चंद्राच्या प्रभेप्रमाणें डोळ्यांना आल्हाद देणारी, आलिंगिली असतां, अत्यंत थंड अशा कमलाच्या मालेप्रमाणें वाटणारी, व ह्लदयांत ठेवली असतां रसास्वादाप्रमाणें आनंद देणारी जी, तिचा मला बिलकूल विसर पडत नाहीं.  ”
अथवा मालारूपनिरवयवा उपमेचे हें दुसरें उदाहरण:-
“ राक्षसांच्या घरांतून बाहेर पडलेली सीता, सूर्यांतून बाहेर पडलेय्ला चंद्राच्या नव्या स्वच्छ कलेप्रमाणें, किंवा अग्नीच्या राशींतून बाहेर पडलेल्या सोन्याच्या प्रतिमेसारखी शोभली ”

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:56.0470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जौळ

  • न. १ ( कों . ) अभ्र ; अभ्राच्छादित आकाश . २ ( राजा . ) सपाटयाचें वादळ ; जोराचा वारा . याचा वेग दर ताशीं ५० मैल असतो . [ फा . जौलान = फिरता ? ] 
  • न. ( महानु . ) समूह . आनंदरसाचें जौळ । - भाए ६६१ [ सं . जाल ] 
  • ना. चक्रीवादळ , झंझावात , तुफान , प्रभंजन , वादळी वारा , वावटळ , सपाटयाचे वादळ , सोसाटयाचा वारा . 
  • n  Clouds. A sudden and impetuous storm. 
RANDOM WORD

Did you know?

विविध देवदेवतांचे आकार, रंग, रूप ही कल्पना कशी आणि कोणी निर्माण केली?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.