TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

उपमालंकार - लक्षण ९

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


लक्षण ९
कर्मक्यच आधारक्यच्‍ व क्यड्‍ ह्या रूपांत असणार्‍या वाचकलुप्ता-उपमेचें उदाहरण हें-
“ विरहामुळें जिचें ह्लदय व्याकुळ झालें आहे अशा ह्या स्त्रीला, मलयपर्वतावरून येणारा वारा अग्नीसारखा वाटत आहे; रत्नाच्या महालांतही तिला रानांत असल्यासारखें क्षणोक्षणीं वाटत आहे; आणि ‘ जीवनावीण मासोळी ’ प्रमाणें ती ( तडफडत ) आहे. ”
ह्या श्लोकांत अग्नीसारखा भासत आहे, ह्या अर्थी अनल ह्या शब्दाला ‘ उपमानादाचारे ’ ह्या पाणिनिसूत्राप्रमाणें , कर्मक्यच्‍ प्रत्यय लागला आहे; रानांतल्यासारखें वाटतें, ह्या अर्थी कानन ह्या शब्दाला ह्याच सूत्रा-वरील ‘ अधिकरणाच्चेति वक्तव्यम्‍ ’ ह्या वार्तिकाप्रमाणें, आधार ह्या अर्थीं क्यच्‍ प्रत्यय लागला आहे. त्याचप्रमाणें निर्जलमीन ह्या शब्दाला, ‘ कर्तु:क्यड्‍ सलोपश्च ’ ह्या सूत्रानें, क्यड्‍ झाला आहे.
कित्येकांच्या मतें, “ क्यच्‍ व क्यड्‍ ह्या प्रत्ययाचा अर्थ ‘ वागणें, आचरण करणें’ एवढाच आहे. त्यामुळें ‘ अमक्याप्रमाणें ’ ह्या अर्थाचा बोध होण्याकरितां , प्रत्ययाच्या पूर्वींची जी प्रकृति ( म्हणजे क्यड्‍ वगैरे प्रत्यय ज्याला लावायचे, तें मूळचें प्रातिपदिक ) तिची स्वसादृश्य ह्या अर्थावर लक्षणा करणें भाग आहे. ” हें मत मानणारांच्या दृष्टीनें, वरील श्लोकांत सादृश्यवाचक पद नसल्यानें, हें वाचकलुप्ता उपमेचें उदाहरण समजावें. दुसर्‍या कित्येकांच्या मतें, ‘ अनलीयति ’ इत्यादि सबंध रूपाचा , ‘ अनल इत्यादि-कांचें सादृश्य दाखविणारें आचरण करतो ’ असा अर्थ होतो. हें मत मान्य केलें तरी सुद्धा, सादृश्य किंवा सादृश्यानें युक्त ( म्ह० सदृश ) ह्यापैकीं कोणत्याही एका अर्थाचें वाचक पद ह्या ठिकाणीं नसल्यानें, हें सुद्धां वाचकलुप्ता उपमेचें उदाहरण आहे, असें समजावें.
कर्तरि व कर्मणि णमुल्‍ द्वारा होणार्‍या उपमेचीं उदाहरणें-
‘ हे भागीरथी, जे लोक तुझें पाणी, अमृत प्यावें तसें, यथेच्छ अड-थळा न येतां पितात, ते लोक ह्या भूलोकावर देवासारखे राहतात. ”

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-17T19:36:07.1100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

vegatative growth

  • वनस्पतिक वृद्धि 
RANDOM WORD

Did you know?

mahameruyantrachi shastrashudh mahiti sangavi. Gharat thevnyasathiche mahameruyantra pokal ki bhariv ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.