मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचक| ज्ञानपंचक पंचक भक्तिपर अभंगपंचक कलियुगपंचक मूर्खपणपंचक भ्रांतिपंचक अभिभानपंचक उन्मत्तपंचक आळसपंचक बंधनपंचक पराधीनपंचक मलिनपंचक प्रस्ताविकपंचक वेडसरपंचक क्षोभपंचक वोसणपंचक विवेकपंचक वैराग्यपंचक संशयपंचक नीतिपंचक उपासनापंचक भक्तिपंचक कथापंचक निष्ठापंचक शिकवणपंचक निश्चयपंचक अलिप्तपंचक ज्ञानपंचक ध्यानपंचक सख्यपंचक संवादपंचक अर्थसार्थपंचक सुंदरपंचक व्यर्थपंचक होळीपंचक वादपंचक भ्रमपंचक झटपणीपंचक गंधपंचक संतपंचक स्फुट पंचक - ज्ञानपंचक समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ ज्ञानपंचक Translation - भाषांतर ॥१॥ आम्ही समाधान गावें ।तुम्हीं सावध ऐकावें ॥१॥सकळ सृष्टीचा गोसावी ।त्याची ओळख पुसावी ॥२॥स्वयें बोलिला सर्वेशु ।ज्ञानेविण अवघे पशु ॥३॥दास म्हणे नाहीं ज्ञान ।तया नरकों पतन ॥४॥॥२॥ ज्ञानेंवीण जी जी कला ।ती ती जाणावी अवकळा ॥१॥ऐसें भगवंत बोलिला ।चित्त द्यावे त्याचे बोला ॥२॥एक ज्ञानचि सार्थक ।सर्व कर्म निरर्थक ॥३॥दास म्हणे ज्ञानेंविण ।प्राणी जन्मला पाषाण ॥४॥॥३॥ जेणें ज्ञान हें नेणवे ।पशु तयासि म्हणावें ॥१॥जेणें केलें चराचर ।कोण विश्वासि आधार ॥२॥ब्रह्मादिकांचा निर्भिता ।कोण आहे त्यापरता ॥३॥अनंत ब्रह्मांडाच्या माळा ।विचित्र भगवंताची कळा ॥४॥रामदासाचा विवेक ।सर्वाघटीं देव एक ॥५॥॥ अभंगसंख्या ॥१३॥ N/A References : N/A Last Updated : March 30, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP