मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचक| संतपंचक पंचक भक्तिपर अभंगपंचक कलियुगपंचक मूर्खपणपंचक भ्रांतिपंचक अभिभानपंचक उन्मत्तपंचक आळसपंचक बंधनपंचक पराधीनपंचक मलिनपंचक प्रस्ताविकपंचक वेडसरपंचक क्षोभपंचक वोसणपंचक विवेकपंचक वैराग्यपंचक संशयपंचक नीतिपंचक उपासनापंचक भक्तिपंचक कथापंचक निष्ठापंचक शिकवणपंचक निश्चयपंचक अलिप्तपंचक ज्ञानपंचक ध्यानपंचक सख्यपंचक संवादपंचक अर्थसार्थपंचक सुंदरपंचक व्यर्थपंचक होळीपंचक वादपंचक भ्रमपंचक झटपणीपंचक गंधपंचक संतपंचक स्फुट पंचक - संतपंचक समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ संतपंचक Translation - भाषांतर ॥१॥ मूर्ति त्रिलोकीं सांवळी ।दृष्टि विश्वाची चुकली ॥१॥भाग्यें आले संतजन ।जालें देवाचें दर्शन ॥२॥देवजवळी अंतरीं ।भेटी नाहीं जन्मवरी ॥३॥रामदासीं योग जाला ।देहीं देव प्रगटला ॥४॥॥२॥ जन्मोजन्मींचा सांगात ।भेटी झाली अकस्मात ॥१॥आतां सांडितां सुटेना ।संतु प्रीतीचा तुटेना ॥२॥सदा नित्य निरंतरीं ।देह सबाह्य अंतरीं ॥३॥त्याग करितां संयोग ।नव्हे कल्पांतीं वियोग ॥४॥॥३॥ देव अभक्ता चोरला ।आम्हां भक्तां सांपडला ॥१॥भेटी जाली सावकाश ।भक्ता न लागती सायास ॥२॥पडे विवेकवेत्रपाणि ।वरी दृष्टीची दाटणी ॥३॥रामदासाचें अंतर ।देवापाशीं निरंतर ॥४॥॥४॥ भेटी देईना जनासी ।पाठी लागे सज्जनासी ॥१॥ऐसें प्रीतीचें लक्षण ।भेटीवीण नाहीं क्षीण ॥२॥नसे साधन सायासीं ।तो हा आम्हां अनायासीं ॥३॥रामीं रामदास म्हणे ।संग संगाचेनी गुणें ॥४॥॥५॥ देव आम्हांसी जोडिला ।संतसंगें सांपडला ॥१॥कडाकपाटीं शीखरीं ।धुंडिताती नानापरी ॥२॥नाना शास्रीं धांडोळिती ।जयाकारणें कष्टती ॥३॥रामदास म्हणे भावें ।वेगीं संतां शरण जावें ॥४॥॥६॥ ब्रह्मादिकांसी दुर्लक्ष ।देव भक्तांसी सुलभ ॥१॥थोरपणें आकळेना ।जाणपणासी कळेना ॥२॥नाहीं योगाची आटणी ।नाहीं तपीं तीर्थाटणीं ॥३॥दास म्हणे साधूवीण ।नाना साधनांचा शीण ॥४॥॥ अभंगसंख्या ॥२४॥ N/A References : N/A Last Updated : March 31, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP