TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ४४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


दंभासुरविचारः
श्रीगणेशाय नमः । देवेंद्र गणेशासन्निध जात । तिकडे दंभासुर शुक्रा पाचारित । महाबुद्धि मुनिवरा त्या साष्टांग नमित । कर जोडून उभा राहे ॥१॥
शुक्रें त्यास सुवर्णासनावर । बसवूनि विचारला प्रश्न सत्वर । मज कां बोलाविलें दानववीर । सांग सत्वरी निःसंकोच ॥२॥
भय हर्ष समन्वित । दंभ त्यासी तेव्हा सांगत । मानस त्याचे भक्तियुत । मुद्‌गल सांगती कथाभाग ॥३॥
स्वामी मजसह लढण्या येईल । सिद्धिबुद्धिपति सबल । ब्रह्मयाचा मानस पुत्र अमल । तपोबळें जो निर्माण झाला ॥४॥
हे सर्वज्ञा मुनिसत्तमा । पुरवा माझ्या मनींची कामना । त्या सिद्धिबुद्धिपतीची कल्पना । सर्वभावें सांगा मज ॥५॥
सिद्धी कोण बुद्धि कोण । त्यांच्या पतीची कोणती खूण । कोणते सामर्थ्य करी तो धारण । तें सर्वही मज सांगा ॥६॥
दंभाची प्रार्थना ऐकून । शुक्र त्यासी सांगे रहस्य पावन । गणेशतत्त्वाचें ज्ञान । गणेशभक्ती जेणें वाढे ॥७॥
शुक्र म्हणती दैत्येंद्रा ऐकावें । त्या देवाचें महिमान बरवें । जें ऐकून गाणपत्य तत्त्वीं व्हावें । अतिनिपुण तूं ज्ञाणयुक्त ॥८॥
सिद्धी मोहकारी तया । सर्वत्र दिसे ती सदया । ती सिद्धी मिळवया । प्रयत्न करिती सर्व लोक ॥९॥
इहलोकीं स्वर्भोगाची इच्छा । म्हणोनि सिद्धींची वांछा । परलोक प्राप्तीस्तव स्वेच्छा । ब्रह्मभूय पदाची ॥१०॥
इहलोक स्वर्गलोक । वांछिती जन ब्रह्मलोक । त्रिविध ब्रह्मपर प्राप्ति मोददायक । मोहसंज्ञित सिद्धिरुप ॥११॥
तो गणपतीची माया असत । भ्रांतिरुपा वाम भागीं स्थित । त्या देवीच्या साहाय्यें क्रीडा करित । वक्रतुंड गजानन ॥१२॥
ब्रह्मा विष्नु आदित्यास । योग्यांस मानवादिकांस । ब्रह्मभूत स्वरुपास । स्वाधीन राहून फिरवी सर्वां ॥१३॥
दुसरी बुद्धिरुप माया असत । ह्या महात्म्याची जगांत । ती ऐक महादैत्या अद्‌भुत । जाणता सर्वज्ञ होशील ॥१४॥
जें जें दिसतें जगांत । तें तें मनो वाणीमय असत । मनोवाणी विहीन जें असत । तें तें सारें बुद्धिमय ॥१५॥
क्षिप्त मूढ विक्षिप्त । एकाग्र निरोधक पंचविध उक्त । बुद्धिरुप जें तें चित्त । त्या पांचांचे भेद नाना ॥१६॥
ते भेद वर्णनातीत । ती बुद्धी एक परी अनेक होत । मोहधारक रुपें विलसत । सर्वत्र ती जगांत ॥१७॥
ती बुद्धी जेव्हां सुभ्रान्त । ज्ञानरुपा हृदयांत । ब्रह्माकारा ती होत । बुद्धियुक्ता मात्र गम्य ती ॥१८॥
त्या बुद्धिनेच इह परत्र । योग ज्ञानीजन जोडिती सुपात्र । ऐशी ती दक्षिणांगी सर्वत्र । राहते योगेश्वर गणेशाच्या ॥१९॥
क्रीडेसाठी निर्मित । ह्या दोन माया हा भगवंत । स्थान त्यांसी आपुल्या अंगांत । देई ब्रह्मरुप तो योगलभ्य ॥२०॥
स्वानंद नाम परब्रह्म । तेंच नगर मनोरम । तेथ नित्य वसे तो आत्माराम । सिद्धिबुद्धि समन्वित ॥२१॥
ब्रह्मदेवें ब्रह्म आराधिलें । पुत्रभावार्थ याचिलें । तेणें हे गणराज झाले । ब्रह्मदेवाचें सुत सांप्रत ॥२२॥
मात्यापित्याचे बंध हरितो । तो पुत्र धन्य होतो । गणराजपुत्रामुळें लाभतो । सौख्य ठेवा देवांसी ॥२३॥
धर्मसंरक्षणार्थ तुज मारील । गजानन जगा उद्धरील । त्यासी शरण जरी जाशील । तरी जीविताशा तुज असे ॥२४॥
मुद्‌गल म्हणती दंभें ऐकिलें । शुक्राचार्याचें वचन भलें । काव्य मुनीचें जें ब्रह्मदायक असलें । वेदांत सारसंभूत ॥२५॥
तें ऐकून दंभ म्हणत । स्वामी ऐकिलें तुमचें बोलणें युक्त । परी माझ्या हृदयांत बसत । एक संशय तो दूर करावा ॥२६॥
जरी गणेश परब्रह्म असेल । तुम्ही जैसें मानतां सबल । त्याच्या पासून अधर्म धर्म अमल । उभयही निर्माण झाले ॥२७॥
गणेश योगरुपें वसत । सर्वत्र यांत संशय नसत । धर्माचें संरक्षण तो करित । कोणत्या विकारानें वश? ॥२८॥
अधर्माचा का नाश करित । हा संशय उपजला मम चित्तांत । तो दूर करावा आपण त्वरित । विनंती माझी ही मानावी ॥२९॥
शुक्र तेव्हा त्यासी सांगत । ऐक दंभा गणेशाचें चेष्टित । ज्यानें संशय समस्त क्षणांत । नष्ट होईल दंभा तुझा ॥३०॥
गणेशानें निर्मिलें सर्व । नानाभेदमय जग अपूर्व । आपापल्या स्थानाचा गर्व । वाहती ते ऐसें करी ॥३१॥
प्रत्येकाची योजिली स्थिती । धर्माची अधर्माची सर्वही कृती । लोभवशे धर्मासी जगती । अधर्म जिंकितो बलपूर्वक ॥३२॥
सुरांचें तेज क्षीण होत । असुरांचें तेज तें वाढत । जेव्हां गणराज देवपक्ष घेत । असुर विनाशा तेव्हां करी ॥३३॥
देवगणांच्या हस्तें संहारित । असुरांचे सैन्य समस्त । धर्मासि स्वस्थानीं स्थापित । सर्व प्रयत्नापूर्वक ॥३४॥
जेव्हां धर्म अधर्माचें बळ हरी । तेव्हा दैत्यांचा होत सत्वरी । मूलोच्छेद ऐसी मायाकरी । गजानन वक्रतुंड ॥३५॥
देवांचें तेज होतें उदित । रुप घेतें महा अद्‍भुत । तेव्हां दैत्यांसी वरद होत । अनेक रुपें धरुन ॥३६॥
असुर वर लाभतां माजती । तेव्हां धर्माची क्षीण स्थिती । पुनरपि देवसाहाय्य करिती । अधर्मासी दंडावया ॥३७॥
जे कोणी लोभसमायुक्त । सुर अथवा दैत्य होत । त्यांच्या विनाशार्थ यन्न करित । गणेश धर्मप्रवर्तक ॥३८॥
त्याच्या विचारें स्वपर । नाही कोणी जगीं नर । क्रीडार्थ आत्मभावपर । स्थापितो सार्‍या जनांत ॥३९॥
शुक्राचें वचन ऐकून । दंभ बोले प्रतापवान । गणेशासी मनीं ध्याऊन । उपासना करी स्वनगरांत ॥४०॥
एकांती महा तेजस्वी विचार करी । गणेश नामक ब्रह्म खरोखरी । पूर्ण ब्रह्म सनातन उद्धरी । शरण जाता तयास ॥४१॥
शरणागता यश देत । सर्वांत समरुप स्थित । यांत संशय कांहीं नसत । ऐसा चित्तीं विचार करी ॥४२॥
सिद्धिपतीस सोडून । सिद्धि इच्छील जो दुर्मति जन । असिद्धि त्यासी लाभून । मित्रही त्याचा त्याग करिती ॥४३॥
बुद्धिपति गणेशा त्यागून । कुशल इच्छी ज्याचें मन । ज्याचें अकुशलची अशोभन । होतें दुष्टभावानें ॥४४॥
सिद्धिबुद्धि विहीन । न दिसें अन्य काही समान । म्हणोनि त्यासी जाईन शरण । सुरासुरसम विभूस ॥४५॥
ऐसा संकल्प निश्चित । दंभ करी स्वचित्तांत । तेणें निर्भय निद्रासुख घेत । मनीं ध्यात गणेशासी ॥४६॥
भक्तिभावें संपूजित । चिंतन ध्यान करी हृदयांत ।  त्या गणेशप्रभूचें अविरत । व्रत दंभासुर ऐसें करी ॥४७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते दंभासुरविचारो नाम चतुश्चवारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाजनार्पणमस्तु ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:49:51.5670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

venesection

 • नीलावेध 
RANDOM WORD

Did you know?

मृत माणसाचा पिंड भाताचा कां करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.