TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
रिकामी आगपेटी

दिवाकर - रिकामी आगपेटी

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.

रिकामी आगपेटी

'' ..... हायरे दैवा ! सत्तर मुलें ! - पण सगळीं मला टाकून गेलीं ना ! बाळांनो ! अरे माझ्या छबकड्यांनो ! या ! जेथें असाल तेथून धांवत येऊन मला - आपल्या आईला - एकदां तरी कडकडून भेटारे ! - काय ! काय म्हणतां ? माझी सगळी लेंकरें मरुन पडलीं आहेत ! - हाय ! अहो आणा ! मी आपल्या पायां पडतें ! पण कसेंही करुन त्यांची व माझी एकदां तरी भेट करवा ! त्यांच्या मुखाचें मला शेवटचें चुंबन घेऊं द्या ! - मरायच्यापूर्वी त्यांचे दोन गोड शब्द तरी माझ्या कानी पडूं द्या ! - हाय ! त्यांची व माझी आतां मुळीच भेट व्हायची नाहीं ? ते स्वर्गाला जायला निघाले आहेत ? कोठें आहेत ? अरे बाळांनो ! थांबा ! आपल्या आईशीं जातां जातां दोन शब्द तरी बोला ! - अगबाई ! एकाएकी कसला बरें गोंगाट सुरु झाला ? काय ? माझीं मुलें आली ? कोठें आहेत तीं ? मला नाहीं का - हो दिसायची तीं ? नुसतें त्यांचें बोलणेंच मला ऐकूं येईल ? थांबा ! बाळांनो ! अरे, असा गलका करुं नका ! एक एक जण बोला ! - काय म्हटलेंत ? जगामध्यें गेलां होतां ? अस्सें कां ? जगामध्यें काय पाहिलें ? कसें आहे जग ? बाळांनो ! अशी गर्दी करुं नका ! - सांगा ! नीट सांगा !

' १ - जग कसें आहे म्हणतेस ? अग बाई ! जग म्हणजे भयंकर काळोख आहे काळोख ! आणि काय सोसाट्याचा वारा तो ! अरे राम ! नको रे बुवा पुन्हा आपल्याला तें जग !

२ - नाहीं ग आई ! हा कांही तरीच सांगत आहे झालें ! मी सांगूं का तुला जग कसें आहे तें ? जग म्हणजे निव्वळ चंद्रप्रकाश आहे चंद्रप्रकाश ! काय ती रमणीय बाग ! अहाहा ! पुष्पांच्या मधुर सुवासानें माझा जीव कसा अगदी आनंदानें गुंग होऊन गेला होता !

३ - खरेंच ! जगांतल्या विड्यांच्या धुरानें व शौचकुपांतील नरकाच्या घाणीनें माझा जीवसुद्धां अगदीं गुंग होऊन गेल होता ! ओकून ओकून माझी कोण पुरे वाट झाली ! आणि हा म्हणतो जग मधुर सुवासानें भरलेलें आहे !

४ - कांही नाहीं ! सगळें खोटें आहे ! जिकडे तिकडे पाणीच पाणी ! आणि मध्यें एक दीपगृह ! याशिवाय जगांत दुसरें तिसरें कांहीसुद्धां नाहीं !

५ - अरे काय सांगत आहांत तरी काय तुम्ही ! आई, यांचें तूं कांहीसुद्धं ऐकूं नकोस ! अबब ! काय ती लक्षावधि माणसांची धांवपळ ! सारख्या आगगाड्या येत होत्यां आणि जात होत्या ! त्यांच्या त्या कर्कश ओरडण्यानें व माणसांच्या गोंगाटानें ती प्रचंड इमारत कशी अगदीं गुदमरुन गेली होती ! छे ! छे ! माझें डोकें तर अगदी फिरुन गेलें होते !

६ - ठेवलीं आहेत लक्षावधि माणसें ! जगामध्यें काय तो एकच मनुष्य आहे ! आई, जगांत जिकडे तिकडे डोंगरच डोंगर आहेत ! अहाहा ! काय तें सुंदर व लहानसें देऊळ ! प्रत्यक्ष शांततादेवीच तेथें वास करीत आहे !

७ - कांहीं नाही ! जग म्हणजे निवळ सडकी घाण आहे घाण ! अनंत रोगांनीं कुजविलेल्या देहांतील घाण उपसणें किंवा प्रेतें फाडणें येवढेंच काय ते जगामध्यें आहे !

८ - नाही - नाहीं ! जग म्हणजे दारु आहे दारु ! बिभत्स गाणीं, हसणें - खिदळणें - नाचणें -

९ - अरे वा ! हा तर नाचायला लागला की ! अरे वेड्या ! जगांत तुरुंगाशिवाय दुसरें तिसरें कांहींसुद्धा नाही ! अरे बापरे ! काय तो आरडाओरडा ! आणि काय ते रक्ताच्या चिळकांड्या उडविणारे - व उघड्या देहावर तडातड उडणारे भयंकर फटकारे ते ! नको रे बुवा ! आठवण झाली कीं कसे शहारे येतात अंगावर !

१० - आई ! जग म्हणजे नाटक आहे नाटक ! पोटाची खळगी भरण्याकरितां हंसणें खोटें - रडणें खोटें - आणि प्रेम करणेंही पण खोटें ! समजलीस !

११ - छे ! छे ! भलतेंच कांहीं तरी ! सुस्वर वाद्यें - मधुर गायन आणि शुद्ध पतिपत्नीप्रेम - यांनीच सर्व जग व्यापले आहे ! हार्मोनियम वाजविणार्‍या पतीच्या मानेभोंवती प्रेमानें आपला उजवा हात टाकून व डाव्या हातानें मुलाला कडेवर घेऊन, मधुर कंठांतून सकल विश्वावर गायनामृत सिंचन करणार्‍या त्या प्रेमळ पत्नीला पाहून मला किती आनंद झाला म्हणून सांगूं तुला ! आई ! -

१२ - संपलें कीं नाहीं चर्‍हाट अजून तुझें ? खून ! विश्वासघात ! यांनी सगळें जग भरलें आहे ठाऊक आहे ! अरे, मॅकबेथ नाटकाच्या दुसर्‍या अंकांतील दुसरा प्रवेश वाचून पहा, म्हणजे समजेल मी काय म्हणतो तें ।

१३ - कांही नको वाचायला ! अरे भाऊ, श्रीरामचंद्राशिवाय या जगांत दुसरें कांहीं तरी आहे का ? अहाहा ! काय तें भव्य देवालय ! हजारों स्त्रीपुरुषांच्या हदयांतून बाहेर पडलेला केवढा तो रामनामाचा प्रचंड गजर !

१४ - निवळ कत्तलखाना ! निर्दय खाटकांनी - रक्तांनी भरलेल्या मोठमोठ्या सुर्‍यांनीं - व दुष्ट मांसाहारी लोकांनी सर्व जग व्यापले आहे ठाऊक आहे ! नको ! माणसाच्या तीव्र क्षुधेवर कापायला आणलेल्या निरुप्रदवी पशूच्या आत्म्यांनी काढलेला भयंकर रुदनस्वर ऐकणें नको !

१५ - हा ! हा ! हा ! अरे वेडयांनो ! जग म्हणजे एक सर्कस आहे सर्कस ! पशूंनीच काय, पण माणसांनींसुद्धां, त्या लहानशा वर्तुळामध्यें जगाच्या नियमाप्रमाणें वावरलें पाहिजे ! जरा कोठें चुकायचा अवकाश, कीं बसलेच चाबकाचे फटकारे अंगावर ! तेथें स्वच्छंदीपणाला यत्किंचितसुद्धां वाव नाहीं ! हो !

१६ - कांहीं तरी सांगत आहेस झालें ! सद्गुणी आत्म्यांचा छळ आणि आत्महत्या, यांनींच सगळें जग भरलें आहे ! ' नाहीं रे देवा आतां मला हा छळ सोसवत ! ' असें रडत रडत म्हणून त्या गरीब बिचार्‍या बालविधवेनें कशी धाडकन् विहिरीमध्यें उडी टाकली पण ! जग म्हणजे छळ, निराशा -

१७ - आग ! आग ! अरे बाबा, सगळें जग आगीमध्यें होरपळून - भाजून - मरत आहे ! मनाला - जिवाला - शेवटी देहालासुद्धां आग लागते आग ! शिव ! शिव ! केवढा तो भयंकर अग्नीचा डोंब ! - चार - पांचशे माणसें कशी ओरडून - ओरडून - तडफडून - अखेरीं मेलीं पण !

१८ - नाहींग आई ! ईश्वरभक्तीशिवाय जगांत दुसरें कांहीसुद्धां नाही ! महात्मा ख्राइस्टच्या तसबिरीजवळ गुडघे टेकून - हात जोडून - आणि नेत्र मिटून बसलेली व शांत अशा ईश्वरी प्रेमामध्यें बुडून गेलेली ती चौदा - पंधरा वर्षाची बालिका मीं पाहिली मात्र ! - अहाहा ! त्या वेळेस मला केवढी धन्यता आणि किती आनंद झाला म्हणून सांगूं तुला ! आई -

१९ - अहो धांवा ! डेस्डिमोनेचा खून झाला ! कॉडेंलिया फांसावर चढली ! पांखरें मेलीं - वणवा पेटला ! धांवा ! धांवा !! हाय ! जगांत अन्याय ! अन्याय ।

२० - हा ! हा ! हा ! अरे वेडयांनो ! जग मुळीं नाहींच आहे ! हं ! कसला अन्याय ! आणि कसची ईश्वरभक्ति !

इतर मुलें - नाहीं ! तूं खोटे बोलतोस ! जग आहे ! आम्ही सांगतों जग कसें आहें तें ! ऐका ! ऐका ! गलका करुं नका ! ऐका ! '

आगपेटी - बाळांनो ! अरे थांबा ! असा गोंगाट करुं नका ! हं ! सांगा ! नीट पुनः एक एक जण सांगा ! कसें आहे म्हटलेंस जग ? - सगळाच गोंधळ ! एकाचेंही सांगणें दुसर्‍याच्या सांगण्याशीं मुळींच जुळत नाहीं ! खरें तरी कोणाचें मानूं ! - आणि खोटें तरी कोणाचें समजूं ! काय म्हटलेंस ? तूं सांगतोस खरें जग कसें आहे तें ? बरें तर, सांग पाहूं - आई ! मेलें ! मेलें ! कोणी चांडाळानें मला पायाखाली चिरडली ! मी मेलें !!.....''

१३ मे १९१२

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-09-17T02:51:03.3400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

foul play

  • पु. दगाफटका 
  • पु. खोटा डाव 
  • पु. कपटपूर्ण व्यवहार 
RANDOM WORD

Did you know?

जन्मानंतर पाचवी पूजनाचे महत्व काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.