कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय १

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ निर्विघ्रमस्तु ॥

ओं नमोजी नारायणा ॥ तूं सर्वज्ञा कार्यकारणा ॥ त्रिजगतीमाजी परिपूर्णा ॥ अनंता तूं ॥१॥

जयजयाजी ब्रह्मांडाधीशा ॥ साक्षात् तूं परमहंसा ॥ चतुरंगणीं गुणप्रकाशा ॥ ज्योतिरुपा तूं ॥२॥

तूं चहूंमुक्ती चे कारण ॥ तूं प्रळयकाळीचें निजनिर्वाण ॥ तूं सत्वादिकांचे प्रावर्ण ॥ त्रिविक्रमरुपा ॥३॥

तूं योगमायेचें विश्रामस्थान ॥ सत्रावीचें शुद्ध जीवन ॥ ब्रह्मांडीचें आदिस्थान ॥ भोक्ता तूंची ॥४॥

जयजयाजी श्रीअनंता ॥ लक्ष्मीविलासा गुणभरिता ॥ शेषशयना जगन्नयदाता ॥ केशवा तूं ॥५॥

जय अनादि अक्षरा ॥ तूं अव्यक्ता आदिकुमरा ॥ तूं प्रकृतिपर गा गाभारा ॥ ज्योतिलिंगा ॥६॥

तूं शब्द ना समरस ॥ तूं स्थूळ ना सूक्ष्मांश ॥ तूं गंध रुप ना रस ॥ परमहंसा ॥७॥

तूं परम प्रेमानंद ॥ तूं परमात्मा विश्वकंद ॥ तूं निर्वादिया अभेद ॥ निरंतरीं ॥८॥

तूं प्रळयांचे आदी ॥ तूं ज्ञानमयें सर्वसिद्धि ॥ तूं सर्वज्ञें तत्त्वबुद्धी ॥ श्रीनृसिंहा ॥९॥

तूं ज्ञानाचा कनकनिधी ॥ तूं सर्वदेवांमाजी उदधी ॥ तूं सर्वज्ञें त्यक्तउपाधी ॥ वेगळा तूं ॥१०॥

व्यापूनियां चराचरी ॥ तूं अलिप्त भूतमात्री ॥ जेवीं पद्मिणीपत्र नीरीं ॥ निरंतर ॥११॥

तूं जीवनाचे जीवन ॥ तूं ज्ञाननेत्रांचे अंजन ॥ तूं मोक्षाचें निजभूवन ॥ श्रीहरी गा ॥१२॥

तूं मनमोक्षाचें सुमन ॥ तूं तत्त्वमस्यादि साधन ॥ तूं वेदगभीचें आहारत्न ॥ नारायणा ॥१३॥

जयजयाजी भक्तवत्सला ॥ कृपाळुवा महाशीळा ॥ धर्मश्रुतिप्रतिपाळा ॥ गोविंदा तूं ॥१४॥

आतां असो हे स्तुतिस्तवन ॥ मापें केवीं मोजवे गगन ॥ श्रोती केलें श्रवणमनन ॥ वानितां तुज ॥१५॥

शब्द स्पर्श ना अर्थु ॥ हा ज्याचेनि आधारें तंतु ॥ तो ब्रह्मादिकां अशक्तु ॥ वानितां तुज ॥१६॥

जैसें बोबडें बोले बाळक ॥ परि माता करी तयाचें कौतुक ॥ कीं लिंग पूजावया अर्भक ॥ आपुलेशक्तीं ॥१७॥

ह्नणोनि तूंचि मातापिता ॥ तूं ब्रह्मायणी कुळदेवता ॥ तुझेनीच भेटे सुश्रोता ॥ गुरुवक्ता तूंची ॥१८॥

तूं कैवल्यश्रुतिश्रवण ॥ तूं सर्वकार्याचें कारण ॥ जैसें तरुमूळीचें सिंचन ॥ पोषी पल्लवांते ॥१९॥

तरी आतां नमूं श्रोता ॥ जो रुपरेखा करी ग्रंथा ॥ पदगर्भीचिया पदार्था ॥ जो आणी गौरव ॥२०॥

होकां मूढ अथवा ज्ञाता ॥ परि तो उपकार करी सर्वथा ॥ आणि हरिकथेची अवस्था ॥ लावी अहनिशीं ॥२१॥

पंचइंद्रियामाजी उंच ॥ हेचि उपमा वाचे साच ॥ ह्नणोनि वाक्पुष्पींचा रस ॥ तुह्मांयोग्य ॥२२॥

नातरी चंद्राची दृष्टी ॥ मध्यें मलयानिळाची घरटी ॥ रश्मिकणांची भीरमिठी ॥ निववी जेवीं ॥२३॥

परि यांचेनि शीतळयोगें ॥ ऋतुकाळीं रमणे लागे ॥ तरी श्रोतयांचेनि संगें ॥ निविजे सदा ॥२४॥

आतां असो हा श्रोता ॥ हें खळासि नावडे सर्वथा ॥ जैशी सुखबोलें शिरोव्यथा ॥ चढे बिडाळासी ॥२५॥

तया खळाचेनि बोलें ॥ मांडियेला रस वितुळे ॥ जैंसे पय नासे परिमळें ॥ कूष्मांडाचे ॥ ॥२६॥

कीं गंधभागाच्या गंधस्पर्शा ॥ फुटी पडे कनकरसा ॥ तैसें पांगुळपण कथारसा ॥ खळाचेनी ॥२७॥

परंतु उलूकाचे नेत्रव्यथें ॥ उदयो सांडिजे केविं सवितें ॥ आणि करीरें अभाग्यें वर्ततें ॥ कीं लोपिजे ऋतुवसंत ॥२८॥

ह्नणोनि खळाचेनि शब्दें ॥ केवीं सांडिजे पां हरिपदें ॥ वडवानळाभेणें अगाधें ॥ कीं सांडिजे ऊमीं ॥२९॥

ह्नणोनि करिजे जी हेवा ॥ हा जन्मजन्मांतरींचा ठेवा ॥ तरी प्राप्तीविणें सदैवा ॥ होइजे केवी ॥३

जैसा व्यायनु दिसे मोठा ॥ परि तो वाहे नदीच्या लोटा ॥ तेथें मीन चाले उफराटा ॥ धारवसां जैसा ॥३

चंद्रकळा पूर्ण अंबरी ॥ तें अमृत घेइजे चकोरीं ॥ परि दीर्घचंचूचिया घारीं ॥ असाधे तें ॥३

सुग्रीव आणि काग बगळा ॥ या पक्षिजाती सकळा ॥ परि गृहरचनेची कळा ॥ सुग्रीवचि जाणे ॥३

अजाकंठीचे उन्मय स्तन ॥ समसादृश्य दीर्घ घन परि वत्सजीवाचें जीवन ॥ तेथें कैसें ॥३

क्षता आणि मधुमक्षिका ॥ पक्षपादुकीं समतुका ॥ परि दुर्गधी मधुपाका ॥ रचूंशके केवी ॥३

पिपीलिका चाले प्रतिदिनी ॥ ते सागरउल्लंघी नानाप्रयत्नी ॥ आंणि तरुणानदीचें पाणी ॥ दूरी तियेतें ॥३

तरी कविते आगळा भक्तिरंग ॥ कीं मेघमस्तकीं फुटले श्रृंग ॥ ह्नणोनि ज्ञातीचेनि अंग ॥ दिसे भानु ॥३

व्याघ्र असे महाआहारी ॥ तो जरी क्षुवेनें पीडला भारी ॥ परि मातृस्तन न विदारी ॥ घेतां पय ॥३

असो गुण नाहीं दुर्जना ॥ सदा निंदी साधुजना ॥ हरिपदा करी विदारणा ॥ खळ व्याघ्र तो ॥३

की माळियाचा गारगुंडा ॥ नातळे कोणाचिया रुंडा ॥ तैसा साधु निंदितां घडे३ आपदा ॥ खळासि केवीं ॥४

आतां सावधान व्हावें श्रोता ॥ येर होय कैं मदोन्मता ॥ आणि मशक केवी पर्वता ॥ लोटूं शके पैं ॥४

असो आतां हा खळनष्ट ॥ अश्वत्थशाखे जैसा मर्कट ॥ कीं नगरासवें मिरवे मठ ॥ अनामिकाचा ॥४

ह्नणोनि खळ आणि श्रोता ॥ हे समसाम्यें दुष्टां उभयतां ॥ हळाहळ कर्पूर गा भारता ॥ जैंसें स्वातिजळे ॥४

पाहें पां अनिळाचिये भ्रमरीं ॥ तरुपत्र नेले नभोदरीं ॥ तें तें नेऊनियां सागरीं ॥ थोर केलें ॥४

ह्नणोनि साधुसमान भागीरथी ॥ जे कविपात्रां मेळवी भक्ती ॥ केवळ दानाचा सरितापती ॥ पाविजे तेणें ॥४५

आतां असो हें सर्वथा ॥ येणें वाउगीच वाढे कथा ॥ ग्रंथकथा पति विनवितां ॥ श्रृंगारे जैसी ॥४६

आतां बोलूं कार्याकारण ॥ जें ग्रंथकथेचें पोखण ॥ तेथें पदोपदीं स्मरण ॥ हरिहरांचे ॥४

तरी असो हे विज्ञापना ॥ मधुरा दाविजे केविं प्रेरणा ॥ ह्नणोनि पूर्वभाग्याच्या सुमना ॥ होवोनि ठाके ॥४

आतां सावधान व्हावें श्रोतां ॥ श्रवणीं घ्यावी हरिकथा ॥ जेणें भवभयाची व्यथा ॥ हरोंशके ॥४

जैसी नानारसांची पक्कान्नें ॥ स्वादु विस्तारीं रायासि बोणें ॥ कीं कर्ता घडी कांकणें ॥ सदैवा जैसी ॥५

तैसा हा कथाकल्पतरु ॥ श्रोतयां केला मनोहरु ॥ वाक्पुष्पांचा रम्यहारु ॥ नानाजातिलतांचा ॥५

मागें कथिलें पंचमस्तबका ॥ आता षष्ठस्तबकाचिये विवेका ॥ ते ऐकावी अर्थकूपिका ॥ श्रोतेजनीं ॥५

असो आतां हे वर्णना ॥ आरसा केवी पाहिजे कंकणा ॥ तरी प्रत्यक्षासि प्रमाणा ॥ काय करणें ॥५

जन्मेजयराजा भारती ॥ वैशंपायन वेदमूर्ती ॥ या दोहीची सुखसंगती ॥ घडली येकीं ॥५

या दोहींचा संवादु ॥ जो हरि कथारससिंधु ॥ तोचि केलासे अनुवादु ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥५

इति श्रीकथाकल्पतरु ॥ षष्ठस्तबक मनोहरु ॥ मंगलाचरणप्रकारु ॥ प्रथमोऽध्यायीं कथियेला ॥५

श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP