TransLiteral Foundation

कथाकल्पतरू - स्तबक ५ - अध्याय ३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


अध्याय ३

॥ श्री गणेशाय नम: ॥

ब्राह्यण ह्यणे गा विष्णुदुता ॥ काहीं सागावी धर्मवार्ता ॥ तुह्यी आचरोनि कोणे सुकृता ॥ झालेति ज्ञानी ॥१॥

जें पुढील भविष्य होणार ॥ तें तुह्यीं वर्तविलें समद्र ॥ येवढें कायजी केलें थोर ॥ पुण्य तुह्यीं ॥२॥

मग सांगे हरिकिंकर ॥ कांतीनगरींचा नृपवर ॥ चोलचक्रवर्ती महावीर ॥ हरिभक्त तो ॥३॥

तो ताम्रपर्णी नदीचे तीरीं ॥ अनंतशयनाची निर्धारी ॥ नवरत्नी पुजा करी ॥ चोळरावो ॥४॥

तंव विष्णुदास नामें ब्राह्यण ॥ तो आला तेथे पुजा घेवोन ॥ तयानें धुपदीप दावोन ॥ वाहिल्या तुळसी ॥५॥

तेणें रत्नपुजा लोपली ॥ मग राव येवोनि सायंकाळी ॥ देखे तंव पुजा झांकली ॥ तुळसीपत्रें ॥६॥

ह्यणोनि क्रोधें विष्णुदासा ॥ राव चढलासे आवेशा ॥ ह्यणें रत्नें झांकोनि कैशा ॥ वाहसी तुळसी ॥७॥

तुं तती नेणसी हरि भक्ती ॥ रत्नें झांकोनि वाहसी पातीं ॥ तरी तुं दंड पावसी दुतीं ॥ नरहरीचे ॥८॥

तुज करितों शिक्षा जाण ॥ परि सोडिलें विप्र ह्यणोन ॥ येरव्ही हस्तपादांचे खंडण ॥ करितो आतां ॥९॥

मग विप्र जाहला बोलता ॥ ह्यणे देव भावाचा भोक्ता ॥ रत्नें काय त्या अनंता ॥ दुर्लभ होती ॥१०॥

देवाद्चये महाद्घारी ॥ रावरंक हे नाही कुसरी ॥ हे आह्यातुह्यां दुसरी ॥ जाहली भ्रांती ॥११॥

मुसे आटलिया धातु ॥ मग कैंचा अलंकार पदार्थु ॥ गंगे नदीचा कलितार्थु ॥ उदधी परियंत ॥ १२॥

दंभाचिये मदत्कीं ॥ उगेचि वाढविजे ख्याती ॥ परि सदावाची रीती ॥ अनारिसी ते ॥१३॥

मग राव ह्यणे रे धीटा ॥ येणें न पाविजे वैकुंठा ॥ रत्नांसरिसा गारगोटा ॥ करिसी काय तुं ॥१४॥

कैं तुळसी आणि रत्न॥ कर्दळी आणि कै चंदन ॥ कैं लोष्ठ आणि कांचन ॥ कैसी सरी ॥१५॥

ऎसा तु रे मंदमती ॥ काय जाणसी हरिभक्ती ॥ तरी जासी ल अधोगती ॥ येणें विचारे ॥१६॥

आता अगा ये ब्राह्यणा ॥ तुवा न यावें देवस्थाना ॥ पालावाहोनिया रत्नां ॥ नकरी लोप ॥१७॥

मग बोलिला ब्राह्यण ॥ राया दोघे करुं गा पण ॥ कोणाचे भक्तीसी नारायण ॥ तोषेल आधी ॥१८॥

असो दोघा जालिया पैजा ॥ मग गेले द्घिज आणि राजा ॥ सेवा करिती गरुडध्वजा ॥ नानापरींची ॥१९॥

तव मुदंल नामे द्घिजवरु ॥ तो राजयाचा कुळगुरु ॥ तेणें उपदेशिला मंत्रु ॥ विष्णुछत्रयागाचा ॥२०॥

म ग राव मांडी विष्णुछत्र ॥ नानापरींचे ऋषी जपती मंत्र ॥ होमहवनें निरंतर ॥ देती अवदानें ॥२१॥

ऎसें करी चक्रवर्ती ॥ अर्पीं अन्नदान सर्वाभुतीं ॥ रत्नें वाहे विपुलहर्तां ॥ अनंतासी ॥२२॥

आणि तो देवदास विप्र ॥ करी एकादशी सोमवार ॥ तुळसीनीं पुजोनि पढे मंत्र ॥ द्घादशाक्षरांचा ॥२३॥

कार्तिकस्नान माघ स्नान ॥ हीं पाच व्रते आचरे पुर्ण ॥ ऎसें करिता आचरण ॥ क्रमिले दिवस ॥२४॥

तंव द्घादशीचे पारणी ॥ उपहार नेला देवस्थानीं ॥ इतुक्यांत भोजन नेलें कोणी ॥ चोरुन त्याचे ॥२५॥

देवासि अर्पोनि उपहार ॥ ब्राह्यण आला बाहेर ॥ तो अन्न न देखे अणुमात्र ॥ विचारी पडे ॥२६॥

मग न करीच रंधन ॥ तेणें जाहले दुसरे लंघन ॥ ऎसें सात दिवस अन्न ॥ नेले त्याचे ॥२७॥

ऎसा जाहला क्षुधाक्रांत ॥ मग चोरा बैसला राखित ॥ तंव अन्न नेतसे अनंत ॥ रंकरुपे ॥२८॥

धरोनि कुश्वळाचा वेष ॥ हातें उचलिला अन्नपाक ॥ तो झाडाआडोनि अवलोक ॥ करी विप्र ॥ २९॥

तो दृष्टींने देखोनि रंक ॥ हुणे कोरडा पाक ॥ मग घृत घेई हुणोनि हाक ॥ फोडिली तेणें ॥३०॥

तंव तें पळालें भ्यालेपणें ॥ रंक धावता पडले ते क्षणे ॥ विप्र ह्यणे जळो जिणें ॥ आता माझें ॥३१॥

मग धावोनि शिंपी नीरा ॥ छाया करोनि घाली वारा ॥ ह्यणे टाळी गा सर्वेश्वरा ॥ अपेश माझें ॥३२॥

ऎसी करिता चिंतवणी ॥ तंव रंक जाहला चक्रपाणी ॥ जया आयुधांचे मांडणी ॥ भुजा चारी ॥३३॥

कंठी कौस्तुभ वैजंयती ॥ कमलनेत्र मेघकांती ॥ वरी पीतांबर माजि दीप्ती ॥ ब्रह्यपदाचीं ॥३४॥

शंख चक्र गदा कमळ ॥ दृष्टीं देखे तमाळनीळ ॥ मग मन जाहलें व्याकुळ ॥ विष्णूदासाचें ॥३५॥

सात्विकपणें दाटला पुर ॥ नेणवे आपपर विचार ॥ तटस्थ जाहला द्घिजवर ॥ देखॊनि मुर्ती ॥३६॥

पाहों देव दाटलें गगनीं ॥ पुष्पक आणिलें हरिगणीं ॥ द्घिज वाहोनिया विमानीं ॥ निघाले ते ॥३७॥

वाजवी घंटा कोट्यानकोटी ॥ तें चोळराव देखॊनि दृष्टी ॥ पाहे तंव हरिगणांनिकटीं ॥ विप्रराव तो ॥३८॥

मग रायासि उपजली खंती ॥ ह्यणे येवढी काय याची भक्ती ॥ जो वाहिला विष्णुदुती ॥ विमानामाजी ॥३९॥

आतां धिग् धिग् जिणें माझें ॥ विप्रे पण जिंकिला पैजें ॥ तरी जनलोकाचिया लाजे ॥ त्यजुं प्राण ॥४०॥

मग होमकुंडाचे निकटी ॥ राव ठाकला उठाउठी ॥ ह्यणे जिणे कासया सृष्टीं ॥ बहुकाळ आतां ॥४१॥

तापें जाहलेम उद्घिग्न मन ॥ भक्तीच श्रेष्ठ बोलिला वचन ॥ मग उडी घाली तत्क्षण ॥ होमकुंडी ॥४२॥

तंव त्याचे पुरोहितें ॥ शिखा उपटिली वामहस्तें ॥ कुंडी घातली आपुले हातें ॥ रायासरिसी ॥४३॥

ऎसा विपाय घडला विप्रा ॥ ह्यणोनि मुदलाचिया गोप्रा ॥ व्रतबंधापुर्वी समग्रा ॥ शिखा वर्जिती ॥४४॥

तंव जाहला हाहा:कार ॥ अग्नीत नासला राजेंद्र ॥ परि प्रगटला सर्वश्वर ॥ कुंडामाजी ॥४५॥

अग्नी जाहला शीतळ ॥ देवें आलिंगिला राव चोळ ॥ ह्यणें भलाभला निर्मळ ॥ होसी भक्ता ॥४६॥

मग तो घातला विमानी ॥ देव वर्षती दिव्यसुमनीं ॥ वैकुंठी नेले भक्त दोनी ॥ चोळ आणि विष्णुदा स ॥४७॥

हरिदुत ह्यणती गा ब्राह्यणा ॥ ऎसी पुर्वील विवंचना ॥ तेचि हे आह्यी विष्णुभुवना ॥ जाहलों हरिकिंकर ॥४८॥

तोचि हा विप्र सुशीळ ॥ आणि मी असे राजा चोळ ॥ तरी तुज कथिला चावळ ॥ दशरथाचा ॥४९॥

अगा हरि भक्तीचे कारण ॥ आह्यी जाहलों देवगण ॥ मग ते राक्षसी वाहोन ॥ निघाले दोघे ॥५०॥

तरी ऎसी ही भारता ॥ कलह उद्घरिली देखता ॥ ह्यणोनि कार्तिकाचे साम्यता ॥ नाहीं पुण्य ॥५१॥

भक्तीभावें कार्तिकमासी ॥ स्नान करोनि पुजी तुळसी ॥ त्याचे पुण्य ब्रह्ययासी ॥ नकळे जाण ॥५२॥

गायन करी हरिजागरीं ॥ रात्रीचिये मागील प्रहरीं ॥ तो शत यागाचे शिखरी ॥ बैसेल जाण ॥५३॥

नृत्य करी हरिकीर्तनीं ॥ कथा नाम ऎके श्रवणी ॥ निश्चये वैकुंठीची निश्रेणी ॥ पावला जाण ॥५४॥

देउळी सरसावी दीपवाती ॥ वीणा वाजवी देवाप्रती ॥ तया पुण्या गा अमरावती ॥ ठेंगंणी जाण ॥५५॥

कार्तिकी पुजी हरिहरा ॥ भोजन देतसे भुतमात्रां ॥ तया पुण्यासी गा नरेंद्रा ॥ नाहीं पार ॥५६॥

जरी न मिळती हरिहर ॥ तरी पुजावे तरुवर ॥ वट आणि पिंपळ परिकर ॥ तिजा पळस ॥५७॥

अर्चन आणि पुजन ननन ॥ त्यांजवळी करावें कीर्तन ॥ परि कार्तिकमासी मौन ॥ न धरावें कोणीं ॥५८॥

तंव ह्यणे जन्मेहयो ॥ एक असे जी संदेहो ॥ वट पिंपळी बोलिजे देवो ॥ कैसियापरी ॥५९॥

मग ह्यणे ऋषीश्वर ॥ बरवा पुसिला गा विचार ॥ तरी पार्वती आणि ईश्वर ॥ होती एकांती ॥६०॥

तेथें रतिरंगी पंचानन ॥ काम न होता संपुर्ण ॥ तंव देवी मिळोनिया कृशान ॥ धाडिला कार्यार्थ ॥६१॥

तेणें कोपली हेमवती ॥ की कामाची न होता पुर्ती ॥ तेव्हा शापिलें देवाप्रती ॥ कोपें तेणें ॥६२॥

तुह्यी कळही सुरवर ॥ उद्घिज व्हाल रे स्थावर ॥ मग कामसुखाचे अंकुर ॥ नासतील तुमचे ॥६३॥

तेथें वृक्षांचिये जाती ॥ रासरंग कैचीं रीती ॥ ऎसी बोलीली पार्वती ॥ सकळ देवां ॥६४॥

मग देवी मिळॊनि समस्तीं ॥ प्रार्थिली ते हेमवती ॥ कीं आह्या झालिया वनस्पती ॥ राहतील कार्ये ॥६५॥

ऎसें ऎकोनि बोले भवानी ॥ माझी लटिकी नव्हे वाणी ॥ तरी अंशे व्हावे देवगणी ॥ वृक्षरुप ॥६६॥

ऎसा ऎकरा विचार ॥ तंव वट जाहला ईश्वर ॥ पिंपळ तो शारंगधर ॥ पळस विरिंची ॥६७॥

आम्र तो बोलिजे सुरेश्वर ॥ निंब लक्ष्मेचा अवतार ॥ ऎसे देव जाहले समग्र ॥ वनस्पती पैं ॥६८॥

ह्यणोनिया गा भारता ॥ कार्तिकी सर्ववृक्ष देवता ॥ हरिहर हे सर्वथा ॥ पिंपळ वट ॥६९॥

तंव ह्यणे नृपवर ॥ एक सांगा जी विचार ॥ पिंपळ विष्णु असोलि अपवित्र ॥ कवणेगुणें ॥७०॥

मग सांगती मुनीश्वर ॥ कीं देवी मंथिला सागर ॥ तैं शेजे होता ऋषीश्वर ॥ उद्दालोक तो ॥७१॥

तंव रत्ने निघाली चमदा ॥ तीं वाटली सर्व विबुधा ॥ त्यांत लक्ष्मी द्यावी गोविंदा ॥ हा निर्धार जाहला ॥७२॥

परि हरिसी बोले कमळजा ॥ विनंती ऎकें गरुडध्वजा ॥ मी न बांधी गळसर तुझा ॥ वडिली आधीं ॥७३॥

पैल पहा ते अवलक्ष्मी ॥ ज्येष्ठभगिनी प्रीतिकामी ॥ ते न येतां लज्जाहोमीं ॥ न बैसे मीं ॥७४॥

इशी मेळवा आधीं वर ॥ हा धर्मशास्त्रींचा विचार ॥ तंव देखीला ऋषीश्वर ॥ उद्दालिक तो ॥७५॥

तयासि ह्यणे श्रीहरी ॥ तुह्यी असा जी ब्रह्यचारी ॥ तरी हे सालंकृत नोवरी ॥ तुह्यां योग्य ॥७६॥

हे लक्ष्मीची बहिणी ॥ अंगिकारीं गा येचिक्षणी ॥ मग आणोन्यां कामिनी ॥ लाविलें लग्न ॥७७॥

ते अवलक्ष्मी उद्दालिके ॥ कमळजा वरिली वैकुंठनायकें ॥ ऎसी रत्ने वाटोनि अशेषें ॥ गेले देव ॥७८॥

ते सर्वे घेवोनि नोवरी ॥ उद्दालिक आला मंदिरी ॥ तव स्त्रिया भ्याल्या शेजारी ॥ देखोनि तिसी ॥७९॥

ऊर्ध्वस्तन लाजती कंठी ॥ विशाळनेत्र बाबरओंठी ॥ श्यामवर्ण उग्रदृष्टी ॥ पाहणें तिचें ॥८०॥

उदर असे महाविशाळ ॥ दात जणु लोहफाळ ॥ तावन्मात्र उंच कपाळ ॥ कुंकुमहीन ॥८१॥

जव आश्रमी आणिली ब्राह्यणें ॥ तंव ते देखे वृंदावनें ॥ आणि ऎकतसे श्रवणें ॥ वेदश्रुतीचीं ॥८२॥

रंगमाळिका देखे द्घारीं ॥ देवपुजा नाना मंत्री ॥ हें देखोनिया नोवरी ॥ बोले काय ॥८३॥

ह्यणे अगा ये प्राणनाथा ॥ येथें मज लागली व्यथा ॥ चला जाऊ येकतां ॥ आणिके स्थानीं ॥८४॥

घेऊनिया त्या ऋषीश्वरा ॥ अवदशा निघाली सत्वरा ॥ ऎसी आली एक्या नगरा ॥ हिंडत हिंडत ॥८५॥

मग दु:खे बोले ब्राह्यणी ॥ येथे मी नेघे ग्रासपाणी ॥ ऎसा हिंडवला मेदिनी ॥ विप्र तयेने ॥८७॥

श्रमोनि ह्यणे ऋषीश्वर ॥ स्त्री नव्हे हा महाव्याघ्र ॥ जळॊजळोजी घराचार ॥ इचेनि संगे ॥८८॥

भले केले गा गोपाळा ॥ मज बांधिले व्याघ्राचे गळा ॥ सामासांचा तरी भुकेला ॥ उदकेंविण ॥८९॥

नाहीं स्नान ना आचार ॥ संध्या वंदनादि अणुमात्र ॥ परम कंटाळला विप्र ॥ क्लेशेंकरोनी ॥९०॥

तयेसि पुसे ऋषीश्वर ॥ तुझें मन कोठें स्थिर ॥ तो सांग पां विचार ॥ मनोधर्मे ॥९१॥

मग तयासि ह्यणे नोवरी ॥ अनाचार असे जे नगरीं ॥ स्त्री भ्रतार कलहकारी ॥ तेथें मी राहीन ॥९२॥

पितापुत्रांचा होय झगडा ॥ न्याय नसे शंठ पाखंडा ॥ धर्म नाहीं ज्याचिया वाडां ॥ तेथें मी राहीन ॥९३॥

जेथें नाहीं होमदान ॥ भुतदया हरिकिर्तन ॥ अमंगळ जेथें भुवन ॥ तेथें राहीन मी ॥९४॥

मज नावडे संध्यास्नान ॥ अमृत वेव्हार आवडे पुर्ण ॥ तये स्थानीं असे परिपुर्ण ॥ वास्तव्य माझें ॥९५॥

नेणे कदा विष्णुव्रता ॥ तप पुजन अन्न अतीता ॥ तेथें राहणें प्राणनाथा ॥ आवडे मज ॥९६॥

ऎकोनि चिंतावला मानसीं ॥ ह्यणे स्त्री नव्हे हे महाविंवशी ॥ बरवे केलेंगा ऋषीकेशी ॥ व-हाड माझें ॥९७॥

जैसें सुदर्शन दुर्वासा ॥ कीं ब्रह्यकपाटें महेशा ॥ तैसें हिंडविलें तापसा ॥ उद्दालिकासी ॥९८॥

ऎसें हिंडला त्रिभुवन ॥ परि तिजयोग्य नव्हे स्थान ॥ आणि कुश्वळठाई मन ॥ न लागे ऋषींचे ॥९९॥

तम आणि दिनकरा ॥ उदक आणि अंगारा ॥ मृग अणि महाव्याघ्रा ॥ संगती कैंची ॥१००॥

तमासि नावडे भानु ॥ उदक नाशी कृशानु ॥ तैसा निंदक नाशी सज्जनु ॥ निंदोनिया ॥१॥

असो मग कोणे एके काळीं ॥ तें स्त्री बैसली पिंपळातळी ॥ तंव आपण गेला आंघोळी ॥ मावमिसें ऋषी ॥२॥

जैसा प्राण सांडी शरीरा ॥ कीं गर्भ सांडवी व्यभिचारा ॥ तैसी त्यजिली ते सुंदरा ॥ उद्दालिकें ॥३॥

जैसीं नारशिंहमंत्रें भुतें ॥ कीं सिंहगंधींनें गजयुथे ॥ तैसा सांडोनिया कांतेतें ॥ पळाला ऋषी ॥४॥

इकडे मनीं चिंती कामिनी ॥ कीं पति न ये कां अजुनी ॥ मग बोभाइली वचनीं ॥ ऋषीप्रती ॥५॥

तंव अस्तमानीं पावला सविता ॥ तेणें भ्याली ते ऋषीकांता ॥ मग बोभाइली गोपिनाथा ॥ धावं हुणोनी ॥६॥

ऎसा तिनें मांडिला शोक ॥ तेणें त्रिभुवनीं उठिला घोष ॥ तंव वैकुठीं आदिपुरुष ॥ पहुडलासे ॥७॥

लक्ष्मी करीतसे चरणसेवन ॥ तंव तिनें ऎकिलें वचन ॥ ह्यणे कां भगिनी रुदन ॥ करीतसे ॥८॥

मग मात जाणवी देवा ॥ कीं बहिण करितसे धांवा ॥ कां त्यजोनिया स्वभावा ॥ गेला ऋषी ॥९॥

जाऊं चल तेथवरी ॥ वनीम येकली सहोदरी ॥ मग निघाला श्रीहरी ॥ लक्ष्मीसहित ॥११०॥

तैं दीनमुखी देखता दुर्दशा ॥ कृपा आली ह्रुषीकेशा ॥ ह्यणे नाभी नाभी हो सरिसा ॥ राहेन जाण ॥११॥

येरी ह्यणे तये वेळीं ॥ म्यां रहावें कवणें स्थळीं ॥ तंव देव ह्यणे पिंपळी ॥ रहावें तुंवा ॥१२॥

मग ते पिंपळी दुर्दशा ॥ राहणें तेथेंचि ह्रुषीकेशा ॥ कोणी न येती स्पर्शा ॥ देव तेथें ॥१३॥

देवीं मिळोनिया समस्तीं ॥ मंत्र मांडिला येकांती ॥ कीं विष्णुविणें भाव भक्ती ॥ कैंची आह्यां ॥१४॥

देव येकवटले समद्र ॥ आले पिंपळीं पैं शीघ्र ॥ मग विनविली सत्वर ॥ दुर्दशा ते ॥१५॥

ह्यणती तुजपाशीं हो श्रीपती ॥ राहंता वोस होईल त्रिजगती ॥ तरी करीं पां निर्गती ॥ गोविंदाची ॥१६॥

आणि बोलिला ब्रह्यकुमर ॥ वारांमाजी मंदवार ॥ तैं राहील सर्वेश्वर ॥ स्थानीं तुझिये ॥१७॥

जरी ह्यणती काय कैसें ॥ तरी पिंवळ हा हरीच असे ॥ जें बोलिलें ह्रुषीकेशें ॥ तें सत्य जाण ॥१८॥

तिये मानवलें तें वचन ॥ मग देवा घेवोनि गेले सुरगण ॥ तैं पासोनि सहादिवस स्पर्शन ॥ वर्जिले अश्वत्थासी ॥१९॥

मंदवाराचिये सकाळीं ॥ विष्णु राहरसे पिंपळी ॥ तो पवित्र भुंमडंईं ॥ येणेगुणें ॥१२०॥

मुनी ह्यणे गा भारता ॥ त्वां पुसिली हरिकथा ॥ तरी अपवित्रता अश्वत्था ॥ ऎशियापरी ॥२१॥

तरी पिंपळीं आणि तुळसीं ॥ येथें वसे ह्रुषीकेशी ॥ तंव जन्मेजय करी पुशी ॥ वैशंपायना ॥२२॥

ह्यणे तुळशींपाशीं गोविंद ॥ हा कैसा जाहला संबंध ॥ तो करावा अनुवाद ॥ मुनिरायाजी ॥२३॥

मग बोले ऋषीश्वर ॥ जांलधर नामें असुर ॥ तेणें पळविले हरिहर ॥ झुंजता रणीं ॥२४॥

शेंवटीं तो कपटपणें ॥ रणीं वधिला नारायणें ॥ मग काष्ठें भक्षिलीं अंगनेनें ॥ त्याचेनि दु:खे ॥२५॥

मग तयेचे अंगदीप्तीं ॥ विष्णु पिसाटला भ्रांती ॥ ह्यणोनि राहे दिनराती ॥ स्मशांनी तो ॥२६॥

तेथें निघाली सती तुळसी ॥ वृंदा ह्यणोनि नामेंसीं ॥ परी राहिला ह्रुषीकेशी ॥ सदैव तेथें ॥२७॥

मग ह्यणे राजा भारत ॥ जालंधर कवणाचा सुत ॥ तया कोपला कां अनंत ॥ तें सांगा मग ॥२८॥

आतां असो हे पुढती ॥ मुनी सांगेल वित्पत्ती ॥ ती ऎकवी संत श्रोतीं ॥ ह्यणे कृष्णयाज्ञवल्कीं ॥२९॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ अश्वत्थआख्यान परिकरु ॥ तृतीयोsध्यायीं सागितलें ॥१३०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-03-03T21:11:20.1570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

cricothyroid artery

 • मुद्रिका-अवटु धमनी 
RANDOM WORD

Did you know?

श्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा? त्याचे पुण्य काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,490
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,863
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.