TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन १३१ ते १३५

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन १३१ ते १३५

भजन - १३१

सुखकर कर सत्संगा मनुजा !

पावन हा नरदेह करूनी, सहज करी भवभंगा मनुजा ! ॥धृ॥

सुख-दुःखे ही किति भोगावी ? शांति नसे संसारी मनुजा ।

विमल सुखा दे माउली ही, देइल भक्तिसुरंगा मनुजा ! ॥१॥

'सत्संगाविण मार्ग न लाभे', श्रुति स्मृतिचे हे कोड मनुजा ! ।

तुकड्यादास म्हणे सुखी हो, त्यागुनि सकळ कुसंगा मनुजा ! ॥२॥

भजन - १३२

जिवलग गुरुविण कोणि न मनुजा !

जग हे स्वार्थ-सुखाचे सगळे, शेवटि साथि न येई मनुजा ! ॥धृ॥

धनद्रव्यावर नाती टपती, द्रव्य जाय मग झुकुनि न बघती ।

सकळ जगाची ऎसी रीती, हीन-दिना कुणि जाणि न मनुजा ! ॥१॥

देह साजरा तोवरि कांता, रोगि होय मग घेई माथा ।

सांग सांग मग कोण अनाथा ? पाजिल तिळभर पाणि न मनुजा ! ॥२॥

दीनाचा एक सदगुरु दाता, दावुनि बोध देतसे संथा ।

तुकड्यादास म्हणे भ्रम आता, सोडी गुरुविण मानि न मनुजा ! ॥३॥

भजन - १३३

साधुनि घे काहि जरा, कीर्ति व्हावया ॥धृ॥

नाहितरी जाशि फुका, कोणी नच देइ रुका ।

खाशिल यमद्वारि धका, नाहि त्या दया ॥१॥

अखिल विश्व हे अचाट, कठिण जन्म-मृत्यु-घाट ।

काम-क्रोध यांचि वाट, दाविते भया ॥२॥

शरण जाइ संत-पदा, करुनि घेइ बोध सदा ।

चुकवुनि घे आपदा ही, मुक्ति घ्यावया ॥३॥

तुकड्याची हाक ऎक, नाहितरी होय शोक ।

पावशील लोकि दुःख, थोर कष्ट या ॥४॥

भजन - १३४

अवचित हा संत-संग, लाभल अम्हा ॥धृ॥

पावन हा देह होय, क्षणभरि जरि बोध लाहे ।

उघडुनि घे कर्ण जरा, सोडुनी भ्रमा ॥१॥

दूर प्रभू राहतसे, पाप-पुण्य पाहतसे ।

कर्म-फळा देत तसे, करुनिया जमा ॥२॥

चुकविति हे कर्मबंध, लावुनिया कृष्ण छंद ।

दुर्दैवहि होत मंद, दाविती सिमा ॥३॥

तुकड्याची मात ऎक, घे गुरुचे बोध-सौख्य ।

तोडी भव-क्लेश दुःख, पुण्य-पथ क्रमा ॥४॥

भजन - १३५

जाइल हा नरदेह गड्या ! मग काय पुढे करशील मजा ? ॥धृ॥

चार दिवस हे हौसेचे, समजोनि राहशी अंतरी तू ।

अति दुःख पुढे यम देइ जिवा, मग कोण तुला देईल रजा ? ॥१॥

करशील जसे भरशील तसे, चुकते न कसे कोणीही असे ।

तुकड्यादास म्हणे काय अम्हा करणे ? हुशियार रहा भरशील सजा ॥२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-10-02T22:34:29.3900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आयूची व्होंकॉल, फाल्या रांड

  • (गो.) आजची नवरी मुलगी उद्या रांड. आय(=आज) 
RANDOM WORD

Did you know?

What is the Sati Practice?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site