सरस्वती व्रत - अध्याय चौथा

सरस्वती व्रताची कथा योगवासिष्ठ या ग्रथांत ’लिलोपाख्यान’ मध्ये सांगितली आहे


क्षण दिवस पक्ष ऋतु वर्ष या क्रमाने फिरतो ।

काळचक्र त्यानुसार लोटला काळ आनंदात ।

वसंत ऋतुतील फुलला होता मंदार पसरवित सुगंध ।

चित्रविचित्र रंगाच्या गवताचे पसरले होते गालिचे ।

अशा रमणीय उपवनात पद्मलीला रमले होते क्रिडेत ।

झाडावरील पाने व्हावे शुष्क रस जाता त्याचा निघून ।

तैसा त्या क्षणी झाले रुपांतर क्षणार्धात ।

पतीच्या देहातील चैतन्यशक्‍ती पावली लोप ।

त्याचे झाले रुपांतर लिंगदेहात अंतर्धान पावले ।

राजाचा देह मृत होऊन पडला अंतपूरात क्षणात ।

जैसी कमलिनी होत जळाच्या अभावी ग्लान ।

दीपाची ज्योत होता क्षीण होते नाहीशी शोभा ।

तैशी झाली स्थिती लीलेची पती निधनाने ।

जैशी चक्रवाक पक्षाच्या वियोगाने होते तशी ।

चक्रवाकी होते अखेर मुकी तशी झाली तिची स्थिती

तशी झाली लीलेची पतिवियोगाच्या दुःखामुळे ।

लीलेची पाहून ही स्थिती देवी आली आकाशातून ।

देवी सरस्वती शरीरासहित राहिली उभी महालात ।

वर्षाकाळाच्या आरंभी पडणार्‍या वृष्टी देते समाधान ।

त्याचप्रमाणे सहृदय अंतःकरणाने लिला दिला धीर ।

देवी सरस्वती करीत शांत लीलेस म्हणते ।

वत्से, ठेवी फुलाच्या राशीत पतीच्या शवाते ।

आच्छादिलेली फुले असावी सदैव ताजी स्थितीते ।

जोवरी फुले ताजी तोवरी नष्ट न होईल कलेवर ते ।

नाही होणार देह नष्ट पुन्हा होईल प्राप्त कालांतरे ।

आत्मा नाही जाणार बाहेर शांत हो तू सत्वरे ।

ऐसी वाणी प्रसवली तेवीच झाली फुले टवटवीत ।

जमले सारे आप्तजन करीत नानापरी सांत्वन ।

होता रात्र सारे गेले आपआपल्या घरी आप्‍तजन ।

उलटून गेली मध्यान्ह रात्र लीला बैसली ध्यानस्थ ।

तैशा स्थितीत तिने मारली हाक ज्ञाप्‍तिदेवीते ।

तेव्हा आली देवी तिच्या समिप येऊन तेथे ।

वत्से ! अशा मध्यारात्री का केले मज स्मरणाते ।

तुझ्या शोकाचे कारण या संसाराची भ्रांताते ।

ते भासमान मृगजळाप्रमाणे फसविते जनाते ।

देवी माझा भ्रतार आहे कोठे त्याची स्थिती काय ते ।

आहे मी असमर्थ त्याशिवाय जगण्यात येथे ।

तद्‌नंतर केला तत्त्वाचा उपदेश स्ववाणीने तिने ।

अशा रितीने करुन संभाषण देवी गेली दिव्यस्थानी ।

देवीचे ऐकून भाषण लीलेची झाली ती स्थिती ।

होऊन निर्विकल्प समाधीमध्ये झाली एकाग्र ।

त्याक्षणी तिने त्यागिला स्थूल देह गेली आकाशात ।

तेथिल पाहून दृश्य हरकली मनात विसरली दुःखाप्रत ।

एक राजा बसला आहे सिंहासनी दरबारात ।

अशा तर्‍हेचा देखावा त्या लीलेने केला अवलोकन ।

वासनारुप देहाने तिने केला प्रवेश दरबारगृहात ।

बैसली इष्टमित्र सखीजन स्नेही परमहर्ष झाला ।

चंद्र शोभते शितल किरणे तेसा आनंद मरणापर ।

तेव्हा सरास्वती वदली बाळे, स्वप्नातील भ्रामक सृष्टी

पाहिलीस तू आपल्या लोचनी आत्ताच प्रत्यक्षे ।

या जगताचा भ्रम कसा होतो ते तुला सांगितले ।

वसिष्ठ ब्राह्मणाचे वर्णन करुन तुला कथियले ।

तो झाला आहे राजा तो आता होईल तुझा पती ।

त्याची पत्‍नी अरुंधती तिची घे जागा तू हो राणी ।

स्वरस्वतीच्या ह्या आदेशाने लीला झाली भ्रासमाते ।

शंका केली निरसन अतिशय शांत चित्ताने देवीने ।

दोन्ही पोहचल्या आकाशमार्गे त्या गिरीग्रामे ।

वसिष्ठाच्या घरी होती शोककळा ग्रस्त होत दुःखाने ।

पाहून स्थिती लीलेला वाटले अति वाईट त्या दृष्याने ।

तेव्हा तिच्या मनात आला असा विचार प्रेमभराने ।

दिसावे मी व ज्ञाप्‍तिदेवी आकाररुपाने ।

येता विचार त्या साध्वीच्या मनात घडले तसे ।

त्या दोन्ही झाल्या प्रगट स्त्री रुपात दिसतसे ।

लक्ष्मी गौरीप्रमाणे देवी आणि लीलाचे ते दिव्य तेज ।

फाकले सार्‍या घरात शोभू लागले एक वेगळे तेज ।

गळ्यात दिसती त्यांच्या फुलांच्या माळा शोभिवंत ।

त्या दृश्याने सर्व झाले विस्मित जोडी हात नकळत ।

लीला-सरस्वती दोघी जणी क्षणात पावल्या अंतर्धान ।

अशा रितीने त्यांनी मोठा करुन अनुग्रह केले पावन ।

या प्रसंगाने लीलेला झाले पूर्वजन्माचे स्मरण ।

प्रसवणार्‍या भूवनातून निघून चिदाकांश संचारित

लीला आणि सरस्वती देवीने केला प्रवेश क्षणात ।

दृश्य पाहिले अंतःपुरात लीलेच्या पतीचे शव निवांत ।

आच्छादलेल्या ताज्या फुलांत जणू गाढ निद्रेत ।

शेवटी आल्या दोघी लीलेच्या पतीच्या राज्यात

लीलेच्या दृष्टीस पडले तेव्हा पतीचे राज्य क्षणात ।

सिद्ध देशाचा उन्मत्त राजा तयारित युद्ध क्षेत्रात ।

घनघोर युद्ध सुरु झाले दोन्ही महान राज्यांत ।

दोन्ही पहात होत्या आकाशातून अदृश्य स्वरुपात ।

दिवसा चालत असे सैनिकांचा भयानक धांगडधिंगा ।

रात्री स्वैर चालल्या होत्या चेष्टा पिशांच्या बहुवेगा ।

या युद्धात झालेल्या क्षिनाने विदुरस्थ झोपला शांत ।

लीला सरस्वती आकाशातून शिरल्या त्याच्या मंदिरात ।

देवीच्या दिव्य अंगकांतीने जळे प्रकाश रातमंदिरात ।

त्याने जागा झाला विदुरथ करितो प्रणाम हात जोडून

घेऊन फुले ओंजळीत बैसला सेवकाप्रमाणे पद्मासनात

नम्रपणे केली देवीची स्तूती सुमने वाहून चरणकमलात

देवी सरस्वतीने केला प्रधान जागा तो होता शेजारी ।

विचारती झाली प्रश्‍नाते प्रधान देई उत्तरे पोपटापरी

उत्तर देण्यास आहे मी समर्थ तुमच्या कृपाप्रसादे ।

सांगितली कथा इक्ष्वांकुवंशातील विदूरथ राजाची ।

प्रधानाने करुन चरित्र कथन आसनी बैसला स्वस्थ ।

विदुरथाच्या मस्तकी केला स्पर्श देवी सरस्वतीने ।

त्याक्षणी म्हणाली करी स्मरण आपल्या पूर्वजनाचे ।

हृदयातील मायेचे आवरण झाले दूर स्मरे पूर्वजन ।

आठवले त्याला लीले बरोबर केलेले नाना भोग विलास ।

त्या बरोबर स्मरे पूर्वीचा देह कसा त्यागिला विनासायास ।

लीले केली स्वरस्वतीची उपासना झाले आत्मज्ञान ।

हा संसार भरला आहे ओतप्रोत मायेच्या विलासे ।

देवीच्या प्रसादे कळले त्याचे स्वरुप महद प्रयासे ।

अशा आपल्या उद्धारानंतर सहजपणे तो म्हणाला ।

हे देवींनो माझा पूर्वीचा पद्मराजारुपी देह पडला गळून ।

भासे एक दिवसाचा मी भोगले सत्तर वर्षे पुरुन ।

अनेक मधूर वचने समजाविले सरस्वती देवीने ।

ऐकून सरस्वतीचे मधूर भाषण विदुरथ निविदले

माझ्या सारख्या पामरा झाले तुझे दर्शन ।

झालो मी कृतार्थ न होई निष्फळ महात्मादर्शन ।

मी आलो आहे शरण तुला इच्छा माझी पूर्ण करा ।

मी मागतो वर तुझ्या पाशी कृपा मजवरी करा ।

जेथे जेथे जाईल मी संगत द्यावी मंत्री आणि कुमारिका ।

तेव्हा वदली सरस्वती होईल तुझी कामना पूर्तीते ।

पुढे म्हणाली सरस्वती उद्या पडशील संग्रामी ।

नंतर तू जा तुझ्या मंदिरी तेथे आढळेल फुलराशी ।

तू करशील प्रवेश तुझ्या पूर्वी पद्मराजाच्या कुशी

आम्ही जशा आलो जातो परत आमच्या आश्रमी ।

सरस्वती देवी आणि विदुरथ असा चालला संवादा ।

आला तेवढयात दूत म्हणे सुरु झाला संग्राम ।

सरस्वतीच्या वरानुसार सांगते मी लीलाप्रत ।

तुझा पती देहत्याग करील प्रविष्ठेल पद्मराजाच्या देहात ।

हे ऐकून लीला विरुरथ झाली उभी हात जोडीत ।

मागीतला वर माझा पती जाईल तेथे त्या ठिकाणी ।

व्हावे मी त्याची पत्‍नी त्या ठिकाणी सदासर्वकाळी ।

ज्ञाप्‍तिदेवी वदली तथास्तू । लीलेची मुद्रा झाली प्रफुल्लीत ।

लीले सोबत दिली स्वकन्या कुमारी म्हणाली सत्वर ।

विदुरथ आला मृत्युपथापद पोहचला पद्माच्या शरीराला

पुष्प राशीतून उभा राहीला पद्मराजा प्रसन्न उल्हासित

लीलेला कळले समाधी अवस्थेत आतुर झाली मिलनास ।

दोन्ही आले समोरा समोर देती अलिंगत एकमेकास ।

राजा झाला जीवंत आनंद उल्हास भावेना प्रजाजनात ।

लीला आणि पद्मराजा जीवन मुक्‍ती मुखाने भोगतात ।

अशी ही कथा सरस्वती व्रताची झाली प्रतीत ।

ऐशी कथा योगवसिष्ठाच्या उत्पत्ति प्रकरणात ।

कथिली वसिष्ठे राजाच्या शंकेच्या निरसनार्थ ।

व्रताने झाली प्रसन्न सरस्वती लीलेस ।

लाभले तिला अविधवा मरण तिच्या भाग्येस ।

सदैव भोगती झाली भीमा म्हणे भोग पतिसमवेत ।

या व्रताचे फळ समाधाने नांदते तिच्या संसारात ।

। इति लीलापाख्याने समाप्त ।

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP