सरस्वती व्रत - अध्याय पहिला

सरस्वती व्रताची कथा योगवासिष्ठ या ग्रथांत ’लिलोपाख्यान’ मध्ये सांगितली आहे


योगी वसिष्ठ बैसिले ध्यानस्थ आपल्या आश्रमात ।

पवित्र मंगलमय वातावरणात प्रसन्न अशा चित्तात ॥

त्याच्या समोर राम उभा हात जोडून विनयाने ।

चिंता त्याच्या चेहर्‍यावर पसरली निळ्या ढगाप्रमाणे ॥

वाट पहात होता आपल्या शंकेच्या निरसनाची ।

अनावर ऐकण्या उपदेशाची वाणी गुरु वशिष्ठाची ॥

प्रसन्न आनंदीत वदनाने सांगावयास केली सुरुवात ।

धीर गंभीर आवाजात गुरुवाणी संथपणे प्रसवत ॥

रामा ! जग ब्रह्मच आहे हा आहे एक सिद्धांत ।

भासमान होत अस्तित्व या ब्रह्मामध्ये जगताचे ।

या विषयी दृष्टान्त सांगतो ऐक तो शांत चित्ताने ॥

आटपाट नगरात राजा पद्म नांदत होता सुखात ।

राणी त्याची लिला शोभत असे अप्सरा या भूतलात ॥

त्याचे प्रेम अनन्य साधारण एकमेकांवर ।

नानाप्रकारे विलास भोगत होते आपुल्या महालावर ।

पद्म राजाच्या प्रेमळ सुंदर भार्याच्या मनात ।

सहजगत्या विचार आला बैसली असता महालात ॥

माझ्या प्राणाहूनही माझा पती आहे मला प्रिय ।

तो जगाचा स्वामी संपत्तीवान सुंदर तरुण ॥

त्याच्या शिवाय मी न जगू शके या भूतलावर ।

नाना विलास भोगावयाची इच्छा आहे त्याच्या बरोबर ॥

युगे युगे हवा आहे मला त्याचा रमणीय सहवास ।

जपतप करावयास मी सदैव आहे निश्चयासह ॥

ऐसा विचार आला तिच्या मनात आधीर होऊन ।

लीला राणीने बोलाविले विद्या वृंद ब्राह्मणांना ॥

यथासांग पूजा करती झाली मनोभावे तेव्हा।

शोभत असे विनम्र भाव तिच्या सुंदर मुखावरी ।

सांगितली आपली मनोकामना त्या गुरुजनांना ॥

हे विप्रांनो मानवा सुटण्या मृत्युच्या तडाक्यातून ।

कोणता उपाय योजना सांगा मला अंतःकरणातून ॥

प्रश्न ऐकता लीला राणीचा ब्राह्मण झाले चिंतातूर ।

स्तब्ध होऊनी पहाती एकमेका मुखाकडे धीरगंभीर ॥

त्याची हि पाहून स्थिती लिला विचारी पुन्हा पुन्हा ।

तिच्या प्रश्‍नाला उत्तर सापडेना ब्राह्मणवृंदाना ॥

अखेरीस सर्व विचार करुन ज्येष्ठ ब्राह्मण म्हणाला ॥

जे आहे सृष्टीच्या न्यायाच्या विरुद्ध तसे होणे नाही ।

जपतप अनुष्ठाने सिद्धि होते प्राप्‍त प्रयासाने ॥

परंतु अमरत्व प्राप्‍त होणे सर्वथा आहे अशक्यप्राय ।

ऐसे वचन ऐकून त्या द्विजाच्या तोंडचे भाषण ।

आपल्या प्रीय पतीचा सहन करावा लागेल वियोग ।

या भितीने ती स्वतःशी विचार करु लागली येणे ।

माझ्या सुदैवाने मला मरण पतीच्या मृत्युपूर्वी यावे ।

मिळेल मला अविधवा मरण जे आहे भाग्यवान ।

तयामुळे जाईन परलोकी सोडून या इहलोकी ।

तेथे होईल माझी स्मृती नष्ट या इहलोकीची ।

होईन मी सुखी त्या लोकी पती सुखाच्या जोरावर ।

तिच्या मनात आला विचार ती झाली अति अधीर ।

जर सुदैवाने पती गेला माझ्या अगोदर स्वर्गलोकी ।

काही तरी युक्‍ति योजीन पाचारण करीन या लोकी ।

वर मागील ऐसा तपाच्या योगाने वियोग न व्हावा ।

आत्मा पतीचा राहील माझ्या अंःतपुरात सदैव सान्निध्यात ।

सांगा विप्रजन ब्रह्मानो उपाय यासाठी मला सत्वर ।

यासाठी आहे उपाय परंतु त्यासाठी हवा निश्‍चय ।

आम्ही सांगतो त्याप्रमाणे करावे सरस्वती व्रत ।

व्रताची आहे सोपी कथा ऐक ती शांत चित्ता ।

असे बोलून सांगू लागले कथा व्रताची आपल्या मुखे ।

महर्षि वाल्मिकाने ही कथा आपल्या शिष्यास कथिली ।

तिचा होऊन बोध वसिष्ठाने कथिली रामास ।

तिच कथा सांगतो सविस्तर वदले ब्राह्मण ।

शांतचित्ताने करुन ग्रहण त्याप्रमाणे करावे आचरण ।

असे वदता ब्राह्मण नमस्कार करिती झाली लिला ।

हे कृपाळा सांगा मला ते व्रत मी करीन मनोभावे ।

राणीच्या विनंतीला मान देऊन सांगू लागला विप्र ।

जर करशील व्रत श्रद्धा ठेवून तुझे होईल कल्याण ॥

॥ इति अध्याय पहिला लीलापाख्यान समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP