TransLiteral Foundation

गणेश गीता - आरंभ

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


श्रीगणेशगीतारंभ

(ओवी)

श्रीगाजाननाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥

श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीमातापितृ० ॥

व्यास म्हणे ब्रह्मदेवा । जनसमूह पावन व्हावा ।

ऐसा उपाय सांगावा । विज्ञति हे परिसावी ॥१॥

विधी म्हणे ऐकें व्यासा । वरेण्य राजा भक्त ऐसा ।

दुजा न दिसे त्रिजगीं सा । गजाननासी तेधवां ॥२॥

पूर्वापर संक्षिप्त इतिहास । श्रवण करीं स्थिर मानस ।

इष्टफल साधावयास । सुलभ असे सर्वांसी ॥३॥

पूर्वीं महिष्मती पुण्यनगर । तेथें वरेण्य नृपवर ।

पुष्पिता राणी पतितत्पर । असे सुंदर रंभेपरी ॥४॥

संतान नाहीं तयांसी । शिवें जाणून मानसीं ।

निद्रित असतां राणी निशीं । कुशीं ठेववी स्वपुत्र ॥५॥

गजापरी नासीक कर्ण । चतुर हस्त इभवर्ण ।

विचित्र बालक परिपूर्ण । म्हणून त्यजिलें सरित्तीरीं ॥६॥

पराशर जातां सरित्तीरीं । बालक पाहून घेतलें करीं ।

आणून दिधलें कांते सत्वरीं । संतान लाधलें म्हणोनी ॥७॥

आनंदें लावी स्तनीं कुमारा । पय वाहे बत्तीस धारा ।

प्राशी गजानन सरसरा । तृप्त झाला निजांतरीं ॥८॥

पराशर पत्‍नी उभयतां । लालनपालन करिती सूता ॥

पुत्रस्नेहें जाणोन तत्त्वतां । सांभाळिती आनंदें ॥९॥

कांहीं काल तेथें क्रमितां । बालक बोले उभयतां ।

आज्ञा द्यावी कार्याकरितां । शुभाशीर्वादपूर्वक ॥१०॥

पहिलें कार्य सिंधूरहनन । दुजें वरेण्यदर्शन ।

दोनी कार्यें करोन । धरामर तोषवी ॥११॥

वरेण्यास अभय देऊन । उपदेश तया करुन ।

उद्धारुन सायुज्य सदन । द्यावें तया त्वरित पैं ॥१२॥

वरेणोपदेश पावन । गणेश गीता तया नाम ।

विख्यात त्रिजगीं होऊन । मुक्त करी साधकां ॥१३॥

वरेण्य गणेश संवादास । सविस्तर कथी कव्यासांस ।

त्यास तें कथी सूतास । गणेशपुराणीं प्रख्यात ॥१४॥

सूत कथिती शौनकादिकां । गणेशपुराणींचे भाग ऐका ॥

सविस्तृत करुन सकळिकां । श्रवणपठण याअर्थी ॥१५॥

गणेशगीतेचें अध्ययन । करुन स्वयें अध्यापन ।

गणेशभजनीं लावावें मन । कार्य योजिलें स्वयंस्फूर्ती ॥१६॥

गणेशपुराणीं गीतें वाचून । तें खंड दिसे मजलागुन ।

केलें असे पद्यमय कथन । अखंड करावें हा अर्थ ॥१७॥

महान्‌ महान्‌ कवीश्वर । त्यांत काय हा पामर ।

वर्णील कायसा चतुर । तें सज्जनीं जाणावें ॥१८॥

गजाननभक्ति आवडी । धरुन काव्यें करी कोडी ।

वेडींवाकुडीं अशीं रुपडीं । लवड सवडी रचितसे ॥१९॥

सज्जन चतुर पंडित । हंसक्षीरन्यायें सेवोत ।

प्रार्थीतसे तयांप्रत । नमन करोन यथामति ॥२०॥

बलभीम नामें पायपोस । गजाननचरणींचा खास ।

काव्यसुमनें पूजनास । भाषोद्यानीं आणीतसे ॥२१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-15T15:08:06.2500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सकृत् ‍

  • क्रि.वि. एकदां ; एकवेळ ; एकवार ; ताबडतोब . ज्यांसि सकृत् ‍ ताडुनिया ध्वनिला जन एक मास वरि परिसे । - मोसभा १ . ८९ . [ सं . ] 
  • ०ग्राही वि. ताबडतोब ग्रहण करणारा ; चाणाक्ष ; चलाख ; तीक्ष्ण बुध्दीचा . 
  • ०दर्शनीं क्रिवि . १ पाहतांक्षणींच ; प्रथमदर्शनीं ; पाहिल्याबरोबर . २ प्रथमच ; मूळारंभीं ; प्रारंभींच . 
  • ad  Once. सकृद्दर्शनीं 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

स्पंदशास्त्र हे काय आहे?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,751
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,781
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.