मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
जय देवा दत्तराया । स्वामी...

दत्ताची आरती - जय देवा दत्तराया । स्वामी...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


जय देवा दत्तराया । स्वामी करुणालया ।

आरती ओवाळीन । तुज महाराजया ॥ धृ. ॥

प्रपंचताट करीं । त्रिविधताप निरंजनी ॥

त्रिपुण शुभ्रवाती । उजळिल्या ज्ञानज्योति ॥ १ ॥

कल्पना मंत्रपुश्प । भेददक्षिणा वरी ।

अहंभाव पूगीफल । न्यून पूर्ण सकळ ॥ २ ॥

श्रीपाद श्रीगुरुनाथा । सरणी ठेवुनि माथा ।

विनवितो दास हरि । अवघा त्रास दूर करी ॥ जय देवा. ॥ ३ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP