मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
सुखिं निद्रा करी आतां स्व...

शेजारती अवधूताची - सुखिं निद्रा करी आतां स्व...

निरंजनस्वामीकृत आरती


सुखिं निद्रा करी आतां स्वामी अवधूता । सद्गुरु स्वामी अवधूता ।
चिन्मय सुखधामीं जाउनि । पहुडा एकांता ॥धृ॥
वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडला ।
त्याचेवर्ते सप्रेमाचा शिडकावा केला ।
पायघड्या घातल्या सुंदर नववीधा भक्ती ।
ज्ञानाच्या समया उजळुनि लाविल्या दीप्ती ॥१॥
द्वैताचें कपाटं लोटुनि एकत्र केलें ।
दुर्बुद्धीच्या गाठी तोडुनि पडदे सोडिले ।
भावार्थाचा मंचक हृदयाकाशीं टांगला ।
मनाचीं सुमनें जोडुनि केलें सेजेला ॥२॥
आशातृष्णा कल्पनेचा सांडूनि गलबला ।
दयाशांतिं - क्षमा दासी उभ्या सेजेला ॥
अलक्ष उन्मनि घेउनि नाजुक दुशाला ॥
निरंजन सद्गुरुस्वामी नीजीं नीजेला ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP