मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|नागपंचमीची गाणी|संग्रह १|
एक हुत जी नगारु । वसुदेव ...

नागपंचमी - एक हुत जी नगारु । वसुदेव ...

श्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे


एक हुत जी नगारु । वसुदेव राज करी । त्येची रुकमीन अस्तुरी । सरवन बाळ त्येंचा । मायबाप बोलती झाली । आरं तूं सरवना बाळा । आमाला काशीला जायाचं । सरवन तिथूनी निघाला । गेला अस्तूरी जवळी । त्येची जवान अस्तूरी । आग आग अस्तूरी । आमांला काशीला जायाचं । न्हाई संगत सोबत । तुमची कवळी उम्मत । नका जाऊं वो काशीची । काशीची म्हईन्याची वाट । जाऊं सनगाराच्या वाड्या । आना दोन जी कांबळं । बांदा दोनीची ती मोट । यावो तिरीत लुटूनी । येत्याल काशीला भेटूनी । आग आग अस्तूरी । माज्या माय बापाला । द्वाड गत चितीली ।

तिथून सरवन निगाला । गेला सुताराच्या वाड्या । आर तूं सुतारदादा । माजा मैतर हूशील । कावड बनवूनी देशील । त्येचा मैतर बा झाला । कावड वो बनवीली । सरवन तिथूनी निगाला । गेला बुरुडाच्या आळी । आर तूं बुरूडदादा । करंड बनवूनी देशील । माजा मैतर हूशील । त्येचा मैतर बा झाला । करंड बनवूनी वो दिला । सरवन घरायाशी आला । सरवनानं आंगूळ बा केली । घातलीं कापडं चोपडं । सरवन भोजना बसला । कावड आठीली येठीली । उचलून खांद्याव घेतीली । राम राम जी बोलला । गेला वाड्याच्या भाईरी । गेला येशीच्या जवळी । गेला येशीच्या भाईरी । लागला वनाच्या मारगीं । एक वन वलांडिलं । दोन वनं वलांडिलीं । तीन वनं वलांडिलीं । चवथ्या पांचव्या वनायाला । माता तान्याली जानकी । आरं तूं सरावना बाळा । मला तान जी लागली । मायबापाची कावड । ठेवली बेलाच्या फांदीला । गेला पान्याच्या शोदाला । गवत्या पुचूड्या बांदित । दगडी कमानी रचीत । सरवन खुनाजी मांडीत । गेला तळ्याच्या जवळी । हातीं पानी घिया गेला । हातीं पानी जी येईना । पायां पानी घिया गेला । पायां पानी जी येईना । सोडला कंबरचा कांचा । लावला झारीच्या गळ्याला ।

झारी बुडबुडां बोलली । दशरथाच्या कानीं गेली । करकर बान जी जोडीला । येऊन हुरदीं भिडला । सरवन धरनीला पडला । दशरथ तिथूनी आला । आर तूं कुनायाचा कोन । रुकमीन माजी माता । विठू माजा पिता । आरं माज्या हातायानी । बाळा अपघात झाला । भाचा मारूनी टाकीला । झारी भरूनी घेतीली । गेला बेलाच्या जवळी । का र बाळा बोलनास । कुनीं बोटाला लावील । त्येचं बोट मी तोडीन । कुनीं डोळ्याला लावील । त्येचा डोळा मी फोडीन । सरवन बाळ न्हवं मी । मी ग दशरथ राजा । तुजा बाळ माज्या हातीं । बान हुरदीं भिडला । माता करुंद ग आला । बोलली दशरथ राजाला । तुला चौघजन पुत्र । तुला पानी न्हाई मिळायाचं ।

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP