मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|नागपंचमीची गाणी|संग्रह १|
चांदीची घागर बाई मोत्यांच...

नागपंचमी - चांदीची घागर बाई मोत्यांच...

श्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे


चांदीची घागर बाई मोत्यांची चुंबळ

चुंबळ तरंगती बाई घागर बुडवीती

सासर्‍याची पायरी ग कवा मला सुटल

बाप माजा विठ्ठल ग कवा मला भेटल

सासूची पायरी ग कवा मला सुटल

आई माजी रुक्मिणी ग कवा मला भेटल

नणंदेची पायरी ग कवा मला सुटल

भैन माजी मुक्ताई ग कवा मला भेटल

दिराची पायरी ग कवा मला सुटल

भाऊ माजा ज्ञानदेव ग कंवा मला भेटल

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP