संग्रह २०१ ते २२०

लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.


२०१.

रुप्याचा चौफुला त्याला लवंगा वेलदोडयांचा सांठा

x x x रावांच्या विडयांत माझा आहे वांटा.

२०२.

गंगेची वाळू चाळणीनं चाळूं, घरीं गेल्यावर

x x x राव आपण सारीपाट खेळूं.

२०३.

सोन्याच्या सोंगटया, रुप्याचे फांसे, जज्यांच्या कचेरींत

x x x राव खासे.

२०४.

वाटल्या डाळीचं केलं पिठलं, त्यांत खोबरं घातलं किसून

x x x राव गेले रुसून तेव्हां सावित्रीनं तें खाल्लं चाटून पुसून.

२०५.

कोर्‍या घागरींत ठेवला लिंबांचा सार

x x x रावांच्या राणीच्या गळ्यांत मोत्यांचा हार.

२०६.

रुप्याच्या ताटांत रायपुरी साखर

x x x रावांना भूक लागली आतां जाऊं द्या मला लवकर.

२०७.

पिवळ्या पितांबरामध्यें सोडले सोगे

x x x राव गणपतीच्या पुजेला उभे.

२०८.

रत्‍नखचित डबी, त्यांत मोत्यांचा दाणा

x x x रावांच्या स्वारीबरोबर सरस्वतीचा आला मेणा.

२०९.

प्रभातकाळीं निळ्या आभाळांत उगवतो सूर्यकांत, मनाचा लागत नाहीं थांग पण

x x x राव दिसतात शांत.

२१०.

कुरुंदाची सहाण, चंदनांचं खोड

x x x रावांचा शब्द अमृतापेक्षां गोड.

२११.

चंद्राची जशी चंद्रिका वशिष्ठांची अरुंधती तशीच मी आहें

x x x रावांची आवडती.

२१२.

पुण्यास जन्मलें, मुंबईस शिकलें

x x x रावांच्या जिवासाठीं नागपूर पाहिलें.

२१३.

घोडयावरला स्वार उंटावरला जोजला

x x x रावांचें नांव घेण्यास जाऊं द्या मला.

२१४.

पेशव्यांचे फौजेंत बिनीचे स्वार

x x x रावांचें नांव घेतलें उघडा आतां दार.

२१५.

पेशव्यांच्या फौजेंत हत्तीवर निशान

x x x राव मला चाहतात जीव की प्राण.

२१६.

चंदनी पलंग, चांदीचे खूर

x x x रावांचे नांव सर्वांना मशहूर.

२१७.

पूर्वदिशा फाकली, उदयास आला रवी, आमच्या कुलांत

x x x राव जन्मले कवी.

२१८.

दिल्लीचें सिंहासन पेशव्यांनीं फोडलें

x x x रावांच्या जिवाकरतां मी माहेर सोडलें.

२१९.

स्वतःचा धर्म परधर्माहून मानावा श्रेष्ठ

x x x रावांना मी ठेवीन सदा संतुष्ट.

२२०.

चांदीच्या ताटांत दहींभाताचा काला

x x x रावाचं नांव घेतें जयहिंद बोला.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP