संग्रह ८१ ते १००

लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.


८१.

इकडून वारा तिकडून वारा मध्यें पावसाच्या धारा

x x x राव बसले कचेरीला वरुन पडती गारा.

८२.

मला नाहीं कळत मी आहें साधी

x x x रावांचें नांव घेतें सर्व मैत्रिणींच्या आधी.

८३.

माझा नमस्कार फुकाचा मिळालेला आशिर्वाद लक्ष मोलाचा

x x x रावांचा संसार होवो सुखाचा.

८४.

काळी चंद्रकळा खसखशी कांठ

x x x रावांच्या नावांसाठीं केला समारंभाचा थाट.

८५.

चौकोनी टेबलावर रुमाल टाकतें विणून

x x x रावांच्या नांवासाठी आग्रह केला म्हणून.

८६.

देव मंदिरांत रत्नांच्या राशी

x x x रावांचं नांव घेते समारंभाच्या दिवशी.

८७.

पंगतींतल्या पानापुढें उदबत्तीचा वास

x x x रावांचं नांव घेत मी देतें जिलेबीचा घास.

८८.

सोन्याची वाटी, चांदीचा गडू

x x x रावांना घांस देतें बुंदीचा लाडू.

८९.

देवाची करणी नारळांत पाणी माझें मन

x x x रावांच्या चरणीं.

९०.

आंबाच्या झाडाला कोवळीं कोवळीं पत्रीं

x x x रावांच्या डोक्यावरती मोत्यांची छत्री.

९१.

चोहोकडे चार लावल्या समया मध्यें आंथरलें आसन

x x x राव बसले पुजेला तर लक्ष्मी झाली प्रसन्न.

९२.

गंधानीं भरले कचोळे त्यांत पडली मसूर त्यांच्या घराण्यांत

x x x राव चतूर.

९३.

आवळीच्या झाडावर पंचरंगी पक्षी

x x x रावांचं नांव घेतें चंद्र्सूर्य साक्षी.

९४.

रत्नजडित सिंहासन भोंवताली मरवा

x x x राव बसले पुजेला मी देतें दुवा.

९५.

समोर होतें तळें, त्यांत होतीं कमळें, त्यावर होता भुंगा, माझा निरोप

x x x रावांना सांगा.

९६.

रंगीत पाट, चांदीचे ताट

x x x रावांचं नांव घेतें सोडा मला वाट.

९७.

विष्णूला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी

x x x रावांचं नांव घेण्यास अशीच यावी संधी.

९८.

सोन्याची वाटी, चांदीचा चमचा

x x x रावांचं नांव घेण्यास आग्रह फार तुमचा.

९९.

हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे

x x x रावांचं नांव घेतें सत्यनारायणापुढें.

१००.

फुलांची वेणी गुंफीतो माळी

x x x नांव घेतें हळदीकुंकवाच्या वेळीं.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP