सायंकाळची पूजा

घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणजे ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे.

Navratri is a Hindu festival, during which nine days and nights, nine forms of Shakti i.e. female divinity are worshipped.


सायंकाळची पूजा

सायंकाळची पूजा ही पंचोपचार असते. सायंकाळी शुचिर्भूत होऊन देवीसमोर बसून आचमन,प्राणायाम इत्यादी केल्यावर संकल्प करावा.

तिथिर्विष्णुस्त्थावारो नक्षत्रं विष्णुरेवच । योगश्च करणं चैव सर्व विष्णुमयं जगत् ॥

अद्य पूर्वोच्चरित वर्तमान एवंगुण विशेषण - विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मन: श्रुतिस्मृति

पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां क्षेम - स्थैर्य - विजय - अभय-आयुरारोग्य- ऐश्वर्यभिवृध्दयर्थ

द्विपदचतुष्पदसहितानां शांत्यर्थपुष्ट्यर्थतुष्टर्थ समस्त मंगलावाप्त्यर्थ समस्ताभ्युदपार्थच श्रीमहाकाली - महालक्ष्मी -

महासरस्वती - नवदुर्गा देवता प्रीत्यर्थ पंचोपचारपूजनमहं करिष्ये ॥

ध्यान -

ॐ नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम: । नम: प्रकृत्यै भद्रायै निलता: प्रणता: स्म ताम् ॥

श्री महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम:। ध्यायामि ॥

गंध- श्रीखंड चदनं दिव्यं गंधाढयं सुमनोहरम्‍ । विलेपनं सुरश्रेष्ठि चंदनं प्रतिगृह्यताम ॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्व्ती-नवदुर्गा देवताभ्यो नम: ।विलेपनार्थ चंदन समर्पयामि ॥

गंध लावावे

फुले -

माल्यादीनि सुगंधीनि मात्सत्यादिनी वै प्रभो । मयार्पितानि पूजार्थ पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ॥

श्री महाकाली - महालक्ष्मी-महासरस्वती- नवदुर्गा देवताभ्यो नम: । पूजार्थे पुष्पाणि समर्पयामि ॥

फुले वाहावी

धूप- वनस्प्तिरसोदभूतो गंधाढयो गंध उत्तम: । आघ्रेय सर्व देवानां धूपोयं प्रतिगृह्यताम् ॥

श्रीमहाकाली- श्रीमहालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा- देवताभ्यो नम: । सुवासार्थे धूपं समर्पयामि ॥

धूप,उदबत्ती ओवाळावी

नीरांजनदीप-

आज्यं च वतिंसंयुक्तं वन्हिना योजितं मया । दीपं गृहाण देवशि त्रैलोक्यतिमिरापह ॥

श्रीमहाकाली-श्रीमहालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: । दीपार्थे नीरांजनदीपं समर्पयामि ॥

उजव्या हाताने नीरांजनदीप ओवाळावा व डाव्या हाताने घंटा वाजवावी

नैवद्य -

नैवद्यं गृह्यतां देवि भक्तिं मे ह्यचलां कुरु । ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम्‍।

श्रीमहाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: ।नैवेद्यार्थे यथाशत: दुग्ध- शर्करा- नारिकेलफलचूर्ण - पंचखाद्य-नैवेद्यं - समर्पयामि ॥

दूध-साखर-नारळाचे चूर्ण, पंचखाद्य इत्यादी जे पदार्थ अर्पण करावयाचे असतील ते एका वाटीत ठेवून व पाण्याने चौकोनी मंडल करुन त्यावर ठेवावे .

त्याभोवती पळीभर पाणी फिरवून ताम्हनात तुलसीयुक्त पाणी सोडावे व आपला डावा हात स्वत:च्या डोळ्यावर धरुन उजव्या हाताने जणू आपण

देवीला भरवीत आहोत अशा प्रकारे कृती करावी

ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा ।

ॐ ब्रह्मणे स्वाहा । नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि ॥

पळीभर पांणी अर्पण करुन पुन्हा स्वाहाकार म्हणावे व नंतर तीन पळ्या पाणी ताम्हनात सोडावे.

उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि

नंतर गंधजल अर्पण करुन म्हणावे.

करोद्वर्तनार्थ चंदनं समर्पयामि ॥

यानंतर महानीरांजनदीप-कर्पूरदीप - पंचारती ओवाळून आरत्या म्हणाव्या. राष्ट्रीय प्रार्थना म्हणावी . मंत्रपुष्प श्री देवीला समर्पण करावे. नंतर प्रदक्षिणा घालावी, नमस्कार करावा व पूजासमाप्तीचे पूढील मंत्र म्हणून प्रार्थना करावी .

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम्‌ । पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरि ।

मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरि यत्पूजितं मया देवि परिपूर्ण तदस्तु मे ॥

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम । तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वरि ॥

अपराधसहस्त्राणि क्रियंतेऽहर्निशं मया। दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरि ॥

क्षमस्व परमेश्वरि ॥ क्षमस्व परमेश्वरि ॥

अनेन कृतपंचोपचार पूजनेन भगवती श्रीमहाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवता: प्रीयताम्।

ॐ तत्सत ब्रह्मार्पणमस्तु । विष्णवे नमो । विष्णवे नमो । विष्णवे नम: । उदयोऽस्तु । जय जगदंब ॥

नंतर दोन वेळा आचमन करावे आणि तीर्थग्रहण करावे .

नऊ दिवस श्री देवीची व घटाची दिवसा षोडशोपचार व सायंकाळी पंचोपचार पूजा करावी. अंगपूजा करण्याची आवश्यकता नाही. निर्माल्य काढताना फुले तेवढी काढावी . स्नान प्रोक्षणाद्वारे घालावे . रुजत घातलेल्या धान्यावर पूजेच्या वेळी रोज पाणी शिंपडावे . नंदादीपाकडे अहोरात्र लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

नवरात्रौत्थापन कुलाचाराप्रमाणे करावयाचे असते.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP