TransLiteral Foundation

देवी पूजा विधी

घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणजे ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे.

Navratri is a Hindu festival, during which nine days and nights, nine forms of Shakti i.e. female divinity are worshipped.


देवी पूजा विधी

पूजा सामग्री

हळ्द, कुंकू , सिंदूर, काजळ, गंध, आंब्याची पाच पाने, आंब्याच्या पाच पानांचा टहाळा , कापूर, धूप, उदबत्ती, कुंकुममिश्रित अक्षता, विड्याची पाने, सुपार्‍या , खोबर्‍याची वाटी, गूळ, ५ नारळ, ५ खारका, ५ बदाम, साखर, फुले, तांबडी फुले, झेंडूची फुले, गुलाब, तांबडे कमळ, दूर्वा, दूर्वाग्म ( दूर्वाची जुडी), शमी, बेल, तुलसी, पाच फळे, केळी, दूध, दही, तूप, साखर, मध हे पाच पदार्थ पंचामृतासाठी. दोन कार्पास वस्त्रे, चंदन ( सहाण व खोड ) .

देवीसाठी चोळी, मंगळसूत्र, हिरव्या बांगडया, पळी पंचपात्र, तीर्थासाठी भांडे, ३ पाट, २ पाण्याने भरलेले कलश ((घटस्थापनेसाठी ), शंख , घंटा , निरांजन , समई , वाती , कापूरारती , धूपारती, उदबत्तीचे घर, नंदादीप, सुंगंधी द्रव्ये, सुटी नाणी, गोडतेल, तुप-वाती निरांजनासाठी , फुलांचा हार , घटस्थापना करण्यासाठी दोन पाण्याने भरलेले कलश, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने, कलशात टाकण्यासाठी वारुळ , गोठण इत्यादी पवित्र ठिकाणची माती , कलशात टाकण्यासाठी हळद, आंबेहळद , नागरमोथा इत्यादी औषधी द्र्व्ये , कलशावर ठेवण्याकरिता पाच आंब्याची पाने, त्यावर नारळ, देवीला नैवेद्यासाठी नारळाचे चूर्ण, साखर , दूध आणि महानैवेद्य.

हवनासाठी

यज्ञकुंडासाठी चार विटा, नवीन चार पाट, तांदूळ १ किलो, २ कलश पाण्याने भरलेले, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने,

पाच प्रकारची फळे, खारीक,बदाम , खोबरे, गूळ, २० सुपार्‍या, विडयाची पाने, फुले, आंब्याची पाने, गणपतीची मूर्ती, देवीची मूर्ती, गुरुजींना देण्याकरिता चांदीची गायीची मूर्ती व वस्त्रे. शिवाय लाकूड, तूप, लोणी, चंदनाची व आंब्याची वृक्षाची काष्ठे, भात, सातू, तीळ, समिधा, उसाचे तुकडे, सुगंधी पुष्पे, दूर्वा, गोमूत्र, पंचगव्य, पांढरी मोहरी, रुप्याचे नाणे, कोहळा इत्यादी. दारावर लावण्यासाठी झेंडूचे तोरण. होमासाठी नैवेद्य. रुजवणासाठी लाल माती भरलेली एक परडी, नऊ प्रकारची धान्ये. याप्रमाणे घटस्थापनेची पूजा व हवन विधी यासाठी साहित्य जमा करावे आणि प्रसन्न मनाने पूजेला बसावे. देवी आपले मनोरथ पूर्ण करील.

देवी पूजा विधी

महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती या त्रिशक्तिंबरोबर दुर्गा देवीची पूजा करण्याची प्रथा अनेक कुटुंबात आहे. अनेक कुटुंबाची दुर्गा ही कुलदेवता आहे. या पूजाविधीत कुलाचारांना प्राधान्य असते.

नवरात्र हे एक महान व्रत आहे. आश्विन शुध्द प्रतिपदेपासुन नवमीपर्यंत हे व्रत प्रतिवर्षी करतात. हे व्रत म्हणजे राष्ट्रीय उत्सव आहे.

आश्विन शुध्द प्रतिपदेस घरात अत्यंत शुचिर्भूत अशा जागी घटस्थापना करावी. एका तांब्याच्या कलशावर ताम्हन ठेवून त्यात मंडलाकार मुख्य देवता

महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती यांची व त्याच्या अनेक परिवार देवतांची स्थापना करावी.

दुसरा एक तांब्याचा कलश शुध्द पाण्याने भरून त्यात सुगंधी द्रव्ये , सव्वा रुपया व सुपारी ठेवावी. कलशाच्या मुखावर पाच आंब्याची पाने ठेवावी व त्यावर मध्यभागी नारळ ठेवावा. या कलशाच्या पायथ्याशी एका परडीत लाल माती टाकून त्यामध्ये नऊ प्रकारची धान्ये पेरावीत. या पेरलेल्या धान्यावर रोज पाणी शिंपडावे. ते छोटेसे शेत फुलून येईल. घरामध्ये धनधान्याची समृध्दी होईल. याच हेतूने हे धान्य रुजत घालतात.

या रुजवणाच्या एका बाजूला घंटा , दुसर्‍या बाजूला शंख इ मधोमध निरांजन प्रज्वलित करुन ठेवावे. देवीसमोर नंदादीप नऊ दिवस अखंड पेटत ठेवावा. दीपाच्या ज्योतीतून निघालेला प्रकाश हे देवीच्या तेजाचे प्रतीक आहे. देवीच्या शक्तीचे स्वरुप आहे. कलशाला पुष्पहार घालावा. कतशावर झेंडूच्या फुलांची माळ सोडावी. घराच्या मुख्य दरवाजावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे.

नवीन रेशमी वस्त्र नेसुन पूजेच्या वेळी पाटावर बसावे. सर्व पूजासाहित्य जवळच ठेवावे. तेलवात घातलेली समई प्रज्वलित करावी. स्वत:ला कुंकू लावून पूजेला आरंभ करावा.

आचमन -

दोनदा आचमन करावे. भगवान श्रीविष्णूच्या चोवीस नावांपैकी पहिली तीन नावे उच्चारुन एकेक आचमन करावे.

त्यानंतर हात धुऊन चौथ्या नावापासून पुढील नावे हात जोडून म्हणावीत.

ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: । ॐ गोविंदाय नम: । ॐ विष्णवे नम: ।

ॐ मधुसूदनाय नम: । ॐ त्रिविस्र्माय नम: । ॐ वामनाय नम: । ॐ श्रीधराय नम: । ॐ हृषीकेशाय नम: ।

ॐ पद्मनाभाय नम: । ॐ दामोदराय नम: । ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम: । ॐ प्रद्युम्नाय नम: ।

ॐ अनिरुध्दाय नम: । ॐ पुरुषोत्तमाय नम: । ॐ अधोक्षजाय नम: । ॐ नारसिंहाय नम: । ॐ अच्युताय नम: ।

ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: ।

प्राणायाम -

प्राणायाम करताना म्हणावे -

ॐ प्रणवस्य परब्रम्ह ऋषि। परमात्मा देवता । दैवी गायत्री छंद: । गायत्र्या गाथिनो विश्वामित्र ऋषि : । सविता देवता ।

गायत्री छंद: । प्राणायामे विनियोग: । ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यम्‍ ॥

ॐ भूर्भुव: स्व: । ॐ तत्सवितुर्वरेण्यम्‍ । भर्गो देवस्य धीमहि । धियो यो न: प्रचोदयात्‍ । ॐ आपोज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम ‍

देवादिकांना वंदन - श्रीमन्महागणाधिपतये नम: । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरुभ्यो नम:। वेदाय नम: । वेदपुरुषाय नम: ।

इष्टदेवताभ्योअ नम: । कुलदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम:।वास्तुदेवताभ्यो नम: ।

शचीपुरंदराभ्यां नम: । उमामहेश्वराभ्यां नम: । श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नम: ॥

कालकामपरशुरामेभ्यो नम: । मातृपितृभ्यां नम: । आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नम:।

सर्वेभ्यो ब्राम्हणेभ्यो नम: । उपस्थितसर्वलोकेभ्यो नम: । एतत्कर्मप्रधानदेवताभ्योअ नम: ॥ अविघ्नमस्तु ॥

प्रार्थना -

आरंभलेली पूजा निर्विघ्न पार पडावी यासाठी गणपती,सरस्वती , ब्रम्हा-विष्णू-महेश, गुरुदेव इत्यादींना हात जोडून प्रार्थना करावी .

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटीसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।१॥

या कुंदेन्दुतुषारहार धवला या शुभवस्त्रावृता । या वीणावरदण्ड्मंडित करा या श्वेतपद्मास्ना

या ब्रह्मच्युतशंकर प्रभृतिभिदैवै: सदा वंदिता । सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्या पहा ॥२॥

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्रीगुरुवे नम: ॥३॥

सर्वत सर्वकार्येषु नास्ति तेषाम मंगलम्‍ । येषां हृदिस्थो भगवान मंगलायतनं हरि: ॥४॥

तदेव लग्न सुदिनं तदेव । ताराबलं तदेव विद्याबलं दैवबं तदेव । लक्ष्मीपते तेङघ्रियुगं स्मरामि ॥५॥

सर्वेष्वारब्ध्कार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा: । देवा दिशन्तु न: सिध्दि ब्रह्मोशानजनार्दना: ॥६॥

देशकालादिंचे उच्चारण -

ॐ श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मण: द्वितीये परार्धे विष्णुपदे,श्रीश्वेतवाराहकल्पे

वैवस्वतमन्वन्तरे , भरतवर्षे भरतखंडे, जंबुद्विपे इषुपाद्रामक्षेत्रे गोदावर्या: ( दक्षिणे। उत्तरे ) तीरे, कलियुगे । कलिप्रथमचरणे। अष्टविंशतित्मे युगे ।

बौद्बावतारे । शालिवाहन शके । ... नाम + संवत्सरे । दक्षिणायने । शरदऋतौ ।

आश्विनमासे शुक्लपक्षे... तिथौ ... + वासरे + अद्य .... दिवस नक्षत्रे + विष्णुयोगे विक्ष्णुकरणे ..... + स्थिते वर्तमाने चन्द्रे ।

.... स्थिते श्रीसूर्ये । .... स्थिते देवगुरौ ग्रहेषु यथ:यथंराशिस्थितेषु सत्सु एवंगुणविशेषविशिष्टायां शुभपुण्यतिथौ ।

+ जे दिनमान असेल त्याचे उच्चारण करावे

संकल्प -

ममं आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थ, अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां क्षेम- स्थैर्य-विजय - अभय - आयुरारोग्य- ऐश्वर्याभिववृध्दयर्थ

द्विपद-चतुष्पादानां शांत्यर्थ: पुष्ट्यर्थ तुष्टुयर्थ । समस्त मंगलावाप्त्यर्थ। समस्त दुरितोपशांत्यर्थ । समस्ताभ्युदयार्थ च इष्टकामसंसिध्दयर्थ ।

कल्पोतफलावात्प्यर्थ । ... मम सहकुटुंबस्य त्रिगुणात्मका श्रीदुर्गाप्रीतिद्वारा सर्वापच्छांतिपूर्वक दीर्घायुधर्नन - पुत्रदिवृध्दि - शत्रुपराजय -

किर्तिलाभ- प्रमुख - चतुर्विध- पुरुषार्थ - सिध्दयर्थ - अद्यारभ्य नवमीपर्यंत महाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती नवदुर्गा प्रीत्यर्थ

मालाबंधनं अखंड दीपप्रज्वालनपूर्वकं

कुलाचार असेल त्याप्रमाणे उच्चारावे -

चंडिकास्तोत्र -

तन्मंत्र जप- ब्राम्हणकुमारी पुजन-उअपवास-नक्तैभुक्तान्यतम-नियमादिरुपं शारदानवरात्रपूजां करिष्ये ।

तदंगत्वेन प्रतिपदा विहितं कलश स्थापनादि करिष्ये ।

( असे म्हणून उजव्या हातात पळीने पाणी घेऊन ताम्हनात सोडावे. पूजेच्या वेळी प्रज्वलित केलेला हा दीप नऊ दिवस अखंड तेवत ठेवावा. )

तथाच आसनादि कलश-शंख - घंटापूजनं - दीपपूजनं करिष्ये । शरीरशुध्दयर्थ ( श्रीपुरुषसूक्तेन ) षडंगन्यास च करिष्ये ।

आदौ निर्विघ्नतासिध्दयर्थ श्रीमहागणपतिपूजनं करिष्ये ।

( असे म्हणून उजव्या हाताने ताम्हनात पळीभर पाणी सोडावे.)

श्रीमहागणपति पूजन -

श्रीगणपतीचे प्रतीक म्हणून तांदुळ किंवा गहू यांच्या छोट्याशा राशीवर नारळ किंवा सुपारी ठेवावी किंवा

श्रीगणपतीची छोटीशी मूर्ती ठेवावी त्यावर गंध,अक्षता इ फु्ले वाहून पूजा करावी.

' सकलपूजार्थे गंधाक्षतापुष्पं समर्पयामि'।

नमस्कार करावा, नंतर म्हणावे -

गणानां त्वा शौनको गृत्समदो गणपतिर्जगती । गणपत्यावाहने विनियोग: । ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे ।

कवि कवीनामुपमश्रवस्तमम‍। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन: । शृण्वन नूतिभिं: सीदसादनं ।

श्रीमन्महागणपतये नमो नम: । श्रीमहागणपतयै नम: आवाहनं समर्पयामि ॥

गणपतीवर अक्षता वाहाव्या. नंतर आसन - अर्ध्य इत्यादी उअपचार अर्पण करावे.

दोन पानांवर सुपारी ठेवून दक्षिणा अर्पण करावी. गणपतीची पूजा पूर्ण झाल्यावर

'कार्य मे सिध्दिमायातु प्रसन्ने त्वयि धातारि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनाय । '

अशी प्रार्थना करावी आणि

' श्रीमहागणपतये नमो नम: ।'

असे म्हणून हात जोडावे.

आसन व वातावरणशुध्दी _ ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुनां धृता । त्वं च धारण मां देवि पवित्र कुरु चासनं ॥१॥

अपक्रामन्तु भूतानि पिशाचा: सर्वतो दिशम्‍ सर्वषाम विरोधेन पूजाकर्म समारभे ॥२॥

अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: । ये भूता विघ्नकर्तारस्तेनश्यन्तु शिवाज्ञया ॥३॥

असे म्हणून अक्षता घेऊन आपल्याभोवती चारी दिशांना फेकाव्यात.

षडंगन्यास - ॐ यत्पुरुषं व्यदधु: कातिधाव्यकल्पयन्‍ मुखं किमस्य कौ बाहू का उरु पादा उच्येते । हृदयाय नम:।

हृदयाला हात लावावा

ॐ ब्राह्मणोऽस्य मुखमासीत बाहू राजन्य: कृत: उरु तदस्य यद‍ वैश्य: पद्‍भ्यां शूद्रो अजायत । शिरसे स्वाहा।

मस्तकाला स्पर्श करावा

ॐ चंद्र्मा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायत । मुखदिंदुश्चाग्निश्च प्राणाद्‍वायुरजायत । शिखायै वषट्‍।

शेंडीला स्पर्श करावा

ॐ नाभ्या आसीदन्तरिक्षं शीष्णौद्यौ: समवर्तत पदभ्यां भूमिर्दिश: श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन्‍ । कवचाय हुं ।

दोन्ही हातांनी हृदयाच्या खालच्या बाजूला स्पर्श करावा

ॐ सप्तास्यासन्‍ परिधयस्त्रिसप्त समिध: कृता:। देवा यज्ञज्ञं तन्वाना अबघ्नन्‍ पुरुषं पशुं । नेत्रत्रयाय वौषट्‍ ।

डोळ्यांना स्पर्श करावा

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवस्तानि धर्माणि प्रथमान्यासन । तेह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा: अस्त्राय फट्

असे म्हणून टाळी वाजवावी व 'इति दिग्बंध:' असे म्हणावे

कलशपूजा - कलशस्य मुखे विष्णु: कंठे रुद्र: समाश्रित: मूले त्त्राअस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा: स्मृता: ॥

कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुधरा । ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वण: । अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिताः ।

अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी तथा । आयांतु देविपूजार्थ दुरितक्षयकारकाः ॥

गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वती । नर्मदे, सिंधु, कावेरि जलेऽस्मिन्‌ सन्निधिं कुरु ॥

श्रीवरुणाय नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि ॥

शुद्ध पाण्याने भरलेल्या कलशाला गंध, अक्षता व फुले वाहावी.

शंखपुजा - शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता । पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगासरस्वती ॥

त्वं पुरा सागरोत्पन्नौ विष्णुना विधृतः करे । अग्रतः सर्वदेवानां पांचजन्य नमोऽस्तुते ॥

शंखदेवयायै नमः । सर्वोपचारार्थे गंध-पुष्प-तुलसीपत्रं समर्पयामि ॥

गंध, फुले, तुलसी शंखाला अर्पण करावी.

घंटापूजा -

आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां । कुरु घंटाएवं तत्र देवताऽव्हानलक्षणम्‌ ॥

घंटायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥

घंटेला गंध, अक्षता, फुले वाहावी व घंटा वाजवावी.

दीपपूजा -

भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः । अतस्त्वां स्थापयाम्यत्र मम शांतिप्रदो भवो ॥

दीपदेवतायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥

समईला गंध, अक्षता, फूल वाहावे. नमस्कार करावा.

मंडप पूजा -

घटस्थापना करावयाच्या जागी वर लहानशी मंडपी आंब्याचे डहाळे वगैरें नीट सुशोभित अशी तयार करतात.

या मंडपीला देवतास्वरूपी मानून तिची पूजा करतात.

श्री मंडपदेवतायै नमः । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥

(मंडपाला गंध, अक्षता, फुले वाहावी.)

प्रोक्षण -

अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरः शुचिः ॥

(स्वतःच्या मस्तकावर व पूजासाहित्यावर तुलसीपत्राने किंवा फुलाने पाणी शिंपडावे.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-05-24T14:13:57.1630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

maximal ergodic theorm

  • महत्तमीय स्थलकालनिरपेक्ष प्रमेय 
RANDOM WORD

Did you know?

आत्मतत्व ही काय संकल्पना आहे?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.