संत कान्हो पाठक अभंग भावार्थ – ४

कान्होबा महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. जगद्गुरू श्री तुकोबारायांचेनंतर कान्होबा महाराजांचा जन्म झाला. आत्मसत्तेचा खेळ माहीत असल्यामुळे त्यांनी लौकिक खेळाचे रूपांतर आध्यात्मिक खेळामध्ये केले. कान्होबा महाराज कुणी मेले तर त्याचे दु:ख मानत नाहीत आणि जिवंत झाल्याचा आनंद मानत नाहीत ; म्हणूनच ते एका अभंगामध्ये म्हणतात , ' मरण माझे मरोनि गेले। मज केलें अमर। '


जेथें जेथें मन जाय । तेथें नागनाथ आहे ॥१॥
म्हणवोनि पाहे । मन गुंतलें नागेश पाये ॥२॥
सुखसोहळा भोगियले । भोग भोगणें नागेश जेणें ॥३॥
कान्हो पाठक आनंदला । सद्गुरु नागेश भेटला ॥४॥

कान्हुराज महाराज या अभंगातून आपली अनुभूती सांगतात. परमार्थाचा नकाशा उभा करतात.
जेथें जेथें मन जाय । तेथें नागनाथ आहे ॥१॥

मी चिंतन करीत असता या साधनाचा आश्रय केला असता मन ज्या ज्या विषयाचे चिंतन करेल तो तो विषयच परमात्मा रुपाने नागेश आहे. “यो मां पश्यति सर्वत्र सर्वच मयि पश्यति । तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥६॥३०॥”

म्हणवोनि पाहे । मन गुंतलें नागेश पाये ॥२॥

हा अभ्यास अर्थात् सर्व जगत परमात्म स्वरूप आहे.

कोणत्याही विषयाचे ध्यान, चिंतन, मन करू लागले तरी त्या विषयाच्या रूपाने देवच आहे म्हणून ते ही देवाचे चिंतनच आहे.

आता मनाला देवाच्या स्वरूपाशिवाय दुसरे कांहीच प्रतीतीला येत नसल्यामुळे सहजच अव्यभिचारी भक्ती बहु लागली.
सुखसोहळा भोगियले । भोग भोगणें नागेश जेणें ॥३॥
कान्हो पाठक आनंदला । सद्गुरु नागेश भेटला ॥४॥

अशी अवस्था झाल्यानंतर सर्व त्रैलोक्यच आनंदरूप आहे असा अनुभव आल्यामुळे

तो आनंद सोहळा काही काळ भोगून नंतर ते द्वैतही नाहीसे झाले. अर्थात सर्व परमात्मा आहे.

मी ही परमात्मा आहे. जीव-देव-जगत ही भेदभ्रांती निवृत्त होऊन सर्वत्र अभेद प्रतीती,

सद्गुरुनागेशनाथांच्यामुळे प्राप्त झाली असे कान्हुराज महाराज सांगतात.

N/A

References : N/A
Last Updated : August 22, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP