बृहद्देवता - माहिती

बृहद्देवता संस्कृत भाषेतील छंदशास्त्र ह्या विषयातील शौनकऋषींनी रचलेला एक प्राचीन ग्रंथ आहे.
The Bruhaddevatā (Sanskrit: बृहद्देवता), is a metrical Sanskrit work, traditionally ascribed to Shaunaka.


बृहद्देवता संस्कृत भाषेतील छंदशास्त्र ह्या विषयातील शौनकऋषींनी रचलेला एक प्राचीन ग्रंथ आहे.
6 वेदांगां व्यतिरिक्त वेदांतील ऋषि देवता, छन्द पद इत्याही विषय या ग्रंथात लिहीले गेले आहेत, त्यातीलच हा एक सर्वश्रेष्ठ, प्रसिद्ध और प्राचीन ग्रन्थ आहे. या ग्रंथात प्रत्येक देवतांचे स्वरूप, स्थान आणि वैलक्षण्य ह्यांचे वर्णन केले गेले आहे. महाभारत आणि बृहद्देवता यांतील कांही कथांमध्य साम्य आढळते. श्लोक आणि अध्याय यांबद्दल असे अनुमान आहे कि ईसवी सनापूर्वी आठव्या शतकात, अर्थात् पाणिनीच्या पूर्वी किंवा यास्कच्या नंतर ह्याची रचना झाली असणार. मैकडोनलच्या मतानुसार हे शौनेक ऋषी पुराणोक्त शौनक ऋषींपासून भिन्न आहेत. वैदिक देवतांची नावे कशी ठेवली असणार ह्याचा विचार या ग्रंथात झाला आहे.
अध्याय आणि श्लोक
या ग्रंथात १२०० श्लोक आणि ८ अध्याय आहेत. ग्रंथातील पहिल्या आणि दुसर्‍या अध्यायात भूमिका आहे. ह्यात प्रत्येक देवतांचे स्वरूप, स्थान आणि वैलक्षण्यचे वर्णन आहे. भूमिकेच्या शेवटी निःपात, अव्यय, सर्वनाम, संज्ञा, समास ईत्यादी व्याकरण विषयक चर्चा आहे.
देव उल्लेख
तिसर्‍या अध्यायांनंतर ऋग्वेदातील देवतांचा क्रमश: उल्लेख आहे, शिवाय कथा पण आहेत, ज्यातून देवतांचे महत्व प्रकट होते. अनेक विद्वानांचे मत आहे कि महाभारतातील कथा बृहद्देवता ग्रंथातून घेतल्या गेल्या आहेत. कात्यायन ऋषींनी ‘सर्वानुक्रमणी’ तथा सायणचार्य ह्याचा उल्लेख केला आहे. ह्यात मधुक, श्वेतकेतु, गालव, यास्क, गार्ग्य इत्यादी अनेक आचार्यांची मते दिली आहेत. अनेक देवतांचा उल्लेख करण्याच्या पश्चात् ह्या भिन्न-भिन्न देवता एकाच महादेवताचे विविध रूप आहे, अशी बृहद्देवताकाची धारणा आहे.

The Bruhaddevatā (Sanskrit: बृहद्देवता), is a metrical Sanskrit work, traditionally ascribed to Shaunaka. It is an enlarged catalogue of the Rigvedic deities worshipped in the individual suktas (hymns) of the Rigveda. It also contains the myths and legends related to the composition of these suktas.

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP