उदकवहस्त्रोतस् - तृष्णारोधज उदावर्त

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.

तृष्णा निग्रहज उदावर्त

कण्ठास्यशोष: श्रवणावरोधास्तृष्णाविघाताद्‍हृदये व्यथा च
मा.नि. उदावर्त पान २२७

शोषाड्ग सादबाधिर्यसम्मोह भ्रमहृद्गदा: ॥
तृष्णाया निग्रहात्तत्र शीत: सर्वो विधिर्हित: ॥
वा.सू. ४-१० पान ५५

तोंड व घसा कोरडा पडणें, कानाची श्रवणशक्ति उणावणें हृदयामध्यें वेदना होणें, मोह उत्पन्न होणें, अंग गळून ज़ाणें अशीं लक्षणें होतात.

चिकित्सा-
चिकित्सा म्हणून शीत उपचार करावें [शीतवीर्य़] द्रव्यांनीं सिद्ध केलेलें ज़ल प्राशनासाठी वापरावें.

N/A

References : N/A
Last Updated : July 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP