उदकवहस्त्रोतस् - अतिसार

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या

सोऽतिसारोऽति सरणात् ।
वा.नि. ८-१७

सरत्यतीवातिसारं तमाआहु:
मा.नि. अतिस्त ४

गुदेन बहूद्रवसरणं अतिसार:
मा.नि. अतिसार ४ म. टीका पान ७३

अतिसरण (द्रवाचें गुदद्वारां) होतें म्हणून या व्याधीस अतिसार असें म्हणतात.

स्वभाव
आशुकारई स्वभावत: ।
वा.नि ८-१७

व्याधीचें स्वरुप गंभीर व शरीरावर त्वरित परिणाम करणारें असतें.

मार्ग
अभ्यंतर

प्रकार
षडविधं तं वदन्ति । एकैकश: सर्वशश्चापि दौषै: शोकेनान्य:
षष्ठ आमेन चोक्त: ॥
मा.नि. पान ७३

दोषैर्व्यस्तै: समस्तैश्च भयाच्छोकाच्च षड्‍विध: ।
वा. ८-१ पान ४९५

वाग्भट, चरक यांच्या मतांप्रमाणें अतिसाराचे सहा प्रकार आहेत. सुश्रुतानेंहि अतिसाराचे प्रकार सहाच मानले असले तरी गणन पद्धति निराळी आहे. वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक, शोकज, आमज असे सहा प्रकार माधव-सुश्रुत यांचे आहेत. चरकानें तीन दोषांचे तीन, सान्निपातिक, शोकज व भयज असे सहा प्रकार मानले आहेत. टीकाकार नेहमीप्रमाणेंच त्यांचा समन्वय करीत आहे.

ननु, चरकादौ दोषैरेकैकशस्त्रय:, सन्निपातेनैक: भयशोकजौ
द्वौ, एवं षड्‍विध: अत्र त्वन्यथेति कोऽभिप्राय: ? उच्यते
भयशोकजौ लक्षणसंज्ञाकार्यभेदाद्भिन्नावुक्तौ, आमजस्त्व-
न्नाजीर्णकुपितत्रिदोषजत्वेन सन्निपातेनावरुद्ध इति न
संख्यातिरेक:; सुश्रुते तु हेतुप्रत्यनीकचिकित्सार्थ पृथक्
पठितौ; सुश्रुते तु भयज केवलवातिकेऽवरुद्ध: मानसत्वा-
विशेषाद्धा शोकजेवरुद्ध इति जेज्जट: ।
ननु, षष्ठ आमेन चोक्त इति पृथक्करणमसंगतं; यत:
सर्वेषामेवातिसाराणां प्रागवस्था आमशब्दवाच्या;
जीर्णावस्था पक्वशब्दवाच्या अतएव सर्वातीसारगोचरमुदाहरन्ति, -
``आमपक्वक्रमं हित्वा नातिसारे क्रिया हिता ।
अत: सर्वातिसारेषु ज्ञेयं पक्वामलक्षणम्'' (सु.उ.ते.आ. ४०)-इति ।
नैवं, आमेनैवारभ्यते इति आमज:, दोषास्तु संसर्गिण: प्रेरयितारश्च,
नत्वारम्भका: ।
आमज:, दोषास्तु संसर्गिण: प्रेरयितारश्च, नत्वारम्भका: ।
आमश्च दुष्टान्नकार्यो दोषधातुमलव्यतिरिक्तो वातादिसंसृष्टो
वातादिप्रेरितो वा रक्तादिवद्‍व्याध्यारम्भक इति ।
द्वन्द्वजास्त्वतीसारा: प्रकृतिसमसमवायारब्धत्वान्न
पृथग्गणिता:, विकृतिविषमसमवायारब्धास्तु न भवन्त्येव,
व्याधिस्वभावात् ।
शैली चेयमाचार्याणां प्राय: प्रकृति-
समसमवायारब्धान् द्वन्द्वान् सन्निपातांश्च न गणयन्ति,
विकृतिविषमसमवायारब्धांश्चावश्यं लिखन्ति ।
म. टीका-मा. ४-अतिसार. पान ७३

सुश्रुते तु - ``तैस्तैर्भावै: शोचतोऽल्पाशनस्य बाष्पोष्मा वै
वह्निमाविश्य जन्तो'' (सु.उ.त.अ. ४०) इत्यादिना
शोकजा: प्रबन्धेनोक्ता:, स इहोक्त शोकजादन्य एव विशिष्ट-
हेतुजन्य इह त्वसौ सन्निपातिकेनवारुद्धो ज्ञेय: ।
तथा हितत्र बाष्पोष्मणोऽपि कारणत्वमुक्तं तेन शोकानशनतो
वायु: बाष्पोष्मणा च पित्तकफावपि तत्र कारणत्वेन दर्शितौ,
अत एव च तस्यासाध्यत्वमपि तत्रोक्तं, अत्रापि च त्रिदोषजे
शोकोऽपि कारणत्वेनोक्त: ।
यस्तु सुश्रुते `अन्नाजीर्णात्प्रद्रुता:' (सु.उ.त.अ. ४०) इत्यादिनाऽजीर्णज:
पृथगुक्त: तस्येहोक्तत्रिदोषजेऽवरोधो व्यक्त एव; यतस्तत्रैव `दोषा:'
इति बहुवचनेन अन्नाजीर्णस्य त्रिदोषकारणत्वमुक्तं इहापि च
`व्यापन्नेऽग्नौ' इत्यनेन अग्निमान्द्यजनिताजीर्णस्य त्रिदोष-
जातिसारे कारणत्वमुक्तमेव; तेन सुश्रुतोक्तसर्वातिसारावरोधोऽत्र ज्ञेय: ।
टीका च.चि. १९-१७ पान १२७२

चरकानें जो शोकज अतिसार सांगितला आहे तो सुश्रुतानें सांगितलेल्या शोकज अतिसारापेक्षां निराळा आहे. लक्षणांचा विचार करतां सुश्रुताचा शोकातिसार हा चरकाच्या सान्निपातिकातिसारामध्यें समाविष्ट होतो तर चरकाचा शोकातिसार हा सुश्रुतोक्त वातजातिसारामध्यें समाविष्ट होतो. आमातिसार असें वेगळें वर्गीकरण सुश्रुतानें केलें आहे तें मार्मिक आहे. चरकाच्या वर्णनाप्रमाणें तो सन्निपातातिसार आहे. सुश्रुतानें आम हें स्वतंत्र उत्पादक कारण मानून अतिसार वर्णन केला आहे. हा विकार अतिसाराच्या आमावस्थेपेक्षां निश्चितच वेगळ्या स्वरुपाचा आहे. आमावस्था ही सर्व प्रकारच्या अतिसाराला सामान्य अशी स्थिति आहे. ती येथें अभिप्रेत नाहीं. येथील आम हा दोषधातुमलापेक्षां वेगळा असा शरीरामध्यें न पचलेल्या अन्नामुळें उत्पन्न होणारा असात्म्य, शल्यरुप, विषसदृश असा निराळाच पदार्थ आहे. हा उत्पन्न होऊन ज्यावेळीं अतिसारास कारणीभूत होतो त्यावेळीं वेगळा प्रकार भेद मानून त्यास आमातिसार असें स्वतंत्र नांव दिलें आहे.

हेतू
गुर्वतिस्निग्धरुक्षोष्णद्रवस्थूलातिशीतलै: ।
विरुद्धाध्यशनाजीर्णैर्विषमैश्चापि भोजनै: ॥
स्नेहाद्यैरतियुक्तैश्च मिथ्यायुक्तैर्विषैर्भयै: ।
शोकाद्‍दुष्टाम्बुमद्यातिपानै: सात्म्यर्तुपर्ययै: ॥
जलाभिरमणैर्वेगविघातै: क्रिमिदोषत: ।
नृणां भवत्यतीसारो
सटीक म. म. मा. नि. अतिसार, पान ७१, १ , २, ३, सूत्रें.

पित्तज्वरेऽतीसारपाठाज्ज्वरातीसारयोरन्योन्योपद्रवत्वाच्च
ज्वरानन्तरमतीसारमाह - गुर्वतिस्निग्धेत्यादि ।
गुरुशब्देन मात्रागुरुर्गृह्यते, यथाऽतिमात्रोपयुक्तो रक्तशाल्यादि:, तथा
स्वभावगुरु च माषादि:, अथवा गुणत: पाकतश्च ।
अतिशब्द; स्थूलान्तै: सह संबध्यते ।
स्थूलं संहतावयवं, यथा लड्डुकपिष्टकादि । शीतलं स्पर्शाद्वीर्याश्च ।
विरुद्धमिति संयोगदेशकालमात्रादिभिर्विरुद्धं, यथा क्षीरमत्स्यादि;
तच्च बहुप्रकारं सुश्रुते हिताहितीयेऽध्याये (सु.सू.स्था.अ.२०)
चरके चात्रेयभद्रकाप्यीयध्याये (च.सू.स्था. अ. ६५) द्रष्टव्यम् ।
अध्यशनं पूर्वादिनाहाराजीर्णे भोजनम् ।
उक्तं हि चरके, भुक्तं पूर्वान्नशेषे तु पुनरध्यशनं मतम्''
(च.चि. स्था.अ. १५) इति । एवं सर्वत्र । अजीर्णमपक्कमन्नम् ।
विषममकालभोजनादि । उक्तं हि सुश्रुते; - `बहुस्तोकमकाले
च तज्ज्ञेयं विषमाशनम्'' (सु.सू. स्था. अ. ४६) इति ।
`विषमै:' इत्यत्र स्थाने `असात्म्यै:'' इति पाठान्तरम् ।
भोजनैरिति विरुद्धादिभि:सर्वै: संबध्यते ।
स्नेहाद्यैरिति स्नेह; स्नेहपानं स्नेह आद्यो येषां ते स्नेहाद्या:
स्वेदवमनविरेचनानुवासननिरुहा:, तैरतियुक्तैरिति अतियोगयुक्तै: ।
एतच्च यथायोग्यं बोध्यं, वमनातियोगस्यातिसारकारणत्वायोगात् ।
मिथ्यायुक्तैरिति हीनयोगयुक्तै: वमनादिकर्मणां मिथ्यायुक्तैरिति
हीनयोगयुक्तै: वमनादिकर्मणां मित्यायोगाभावात्, हीनयोगात्तु ते
दोषानुत्लेश्यातीसारायं स्यु: ।
नंनु कदाचिद्वमनं प्रयुक्तं विरेकं करोति, विरेकश्च वमनमिति
दर्शनात्तेषां मिथ्यायोग: संभवत्येव ।
न, सोऽप्ययोग एवेति सिद्धान्त: यदुक्तं चरके, `योग: सम्यक्
प्रवृत्ति: स्यादतियोगोऽतिवर्तनम् ।
अयोग: प्रातिलोम्येन न चाल्पं वा प्रवर्तनम् - इति (च.चि.स्था.अ.६) ।
विषमत्र स्थावरमुच्यते, अधोगत्वात् , कार्तिककुण्डस्त्वाह -
विषं दूषीविषं तल्लक्षणेष्वतीसारपाठात् ।
दुष्टाम्बुमद्यातिपानैरिति दुष्टं व्यापन्नं, दुष्टयोरम्बुमद्ययो: पानात्
अदुष्टयोरप्यतिपानात् ।
तथाह चरक:, - ``दुष्टमद्यपानीयाति पानात्'' इति (च.चि.स्था.अ. १९) ।
सात्म्यर्तुपर्ययैरिति सात्म्यविपर्यऋतुविपर्ययैश्च, सात्म्यविपर्ययोऽसात्म्यम् ।
नच पूर्वोक्तेन असात्म्यैरित्यनेन पौनरुक्त्यं, उक्तं हि चरके
आत्रेयभद्रकाप्यीये ``द्विविधं हि सात्म्यं प्रकृतिसात्म्य मभ्याससात्म्यं च''
(च.सू.स्था.अ.२५) इति।
आहाराचारभेदादन्नपानभेदाद्वा न पौनरुक्त्यामित्यन्ये ।
जलाभिरमणैरिति जलक्रीडादिभि: । वेगविधातैरिति मूत्रपुरीषादीनाम् ।
क्रिमिदोषत इति क्रिमिभि: पक्वामाशयदूषनात्, क्रिमिजनितवातादिकोपाद्वा ।
एतानि च निदानानि यथासंभवं वातादीनां बोद्धव्यानि,
दोषव्याधिहेतुत्वख्यापनार्थ पठितानि ।
एवमन्यत्रापि निदानविशेषपाठे प्रायो द्रष्टव्यमिति ।
साटीक म. मा. नि. अतिसार पान ७१ १, २,३ सूत्रें.

अत्यंबुपानत:, कृशशुष्कामिषात्, तिलपिष्टविरुढै ।
(विरुद्धै) अर्शोर्भि: ।
वा.नि. ८-१ ते ३

मात्रेनें व गुणानें गुरु असें पदार्थ अति स्निग्ध, अति रुक्ष, अति उष्ण, अति स्थूल ( लाडू), अति शीतल अशा पदार्थांच्या सेवनानें, विरुध्द अन्नामुळें, अशक्ततेमुळें, अजीर्णामुळें, विषमाशनामुळें, स्नेहनामुळें विशेषत: स्नेहनादींच्या अतियोगामुळें किंवा मिथ्या योगामुळें, विषामुळें (दूषी विष) भय, शोक, यामुळें, दुष्ट जल व दुष्ट मद्य यांच्या सेवनामुळें, ऋतु विपर्यय झाल्यामुळें असात्म्य असे आहार-विहार घडल्यामुळें, पाण्यामध्यें फार पोहल्यामुळें, आहारामध्यें कृश प्राण्यांचें वा वाळलेले मांस, तीळ, आणि मोड आलेलीं धान्यें यांचें सेवन केल्यामुळें, मूळव्याध या रोगानें, किंवा कृमींनीं अतिसार नांवाचा व्याधि उत्पन्न होतो.

संप्राप्ति
संशम्यापांधातुरन्तु: कृशानं वर्चोमिश्रो मारुतेन प्रणुन्न: ।
वृद्धोऽतीवाध: सरत्येष यस्मा-द्‍व्याधिं घोरं तं त्वतीसारमाहु: ॥
लक्षणं तस्य वक्ष्यते इत्यभिधाय संप्राप्तिरपि लक्षणं भवत्यतो
हेतोर्निरुक्तिद्वारेण संप्राप्तिमाह - संशम्यापांधातुरित्यादि ।
यस्मादन्तरग्निं संशम्य अपांधातुरेवम्भूतोऽतीवाध: सरति
तस्मादतीसारमाचार्या आहुरिति पिण्डार्थ: ।
संशम्य मन्दीकृत्य । अपांधातु: कायद्रव: श्लेष्मापित्तरसादिक: ।
अन्ये तु कफदुष्टं रसं स्वेदं चापांधातुशब्देनाहु: । वर्चोमिश्र;
पुरीष युक्त: । प्रणन्न: प्रेरित: । वृद्धो वृद्धिं गत; ।
सटीक: सु. उ. ४०-६ पान ६९६

कुपितोऽनिल: ।
विस्त्रंसयत्यधोऽब्धातुं हत्वा तेनैव चानलम् ॥
व्यापद्यानुशकृत्कोष्ठं पुरीषं द्रवतां नयन् ।
प्रकल्पतेऽतिसाराय ।
वा.नि. ८-३ पान ४९५

वायु प्रकुपित होऊन तो निरनिराळ्या कारणांनीं आधींच वृद्ध झालेल्या अप्‍धातूला स्वस्थानांतून खेंचून कोष्ठामध्यें आणतो. या अप्‍धातूमुळें अग्नि मंद होतो, पुरीषाला द्रवता येते, वायूच्या प्रेरणेनें कोष्ठामध्यें आलेला व पुरीष मिश्रित अप्‍धातु गुदद्वारानें अधिक प्रमाणांत बाहेर पडतो. या ठिकाणीं कोष्ठ शब्दानें ग्रहणी हाच अवयव गृहीत धरला पाहिजे. कारण अतिसाराचा स्थानसंश्रय ग्रहणी या अवयवांतच होतो.

कट्‍वादिभी रसै: क्रुद्धै: प्रवृद्धौ पित्तमारुतौ ।
आसाद्य (व्यासाद्य) ग्रहणी नृणाम् अतिसारकरौ मतौ ॥
वंगसेन अतिसार २२६ पान १०३

अतिसारामध्यें ग्रहणीं हा अवयव दुष्ट असतो हें चरकाच्या आणखी एका वचनावरुन स्पष्ट होतें. तीं सूत्रें अशीं

विरेचयन्ति नैतानि क्रूरकोष्ठं कदाचन ।
भवति क्रूरकोष्ठस्य ग्रहण्यत्युल्बणनिला ॥
उदीर्णपित्ताऽल्पकफा ग्रहणी मन्दमारुता ।
मृदुकोष्ठस्य तस्मात् स सुविरेच्यो नर: स्मृत: ॥
च.सू. १३-६८-६९

पित्तबहुलेतराल्पा ग्रहणी भवति मृदुकोष्ठिनां तस्मात् ।
सुविरेच्या मृदुकोष्ठा: प्राय: पित्तं ह्यधोभागि ॥
का.सं. स्नेहाध्याय पान २२

विरेचन होणें, न होणें वा थोडया प्रमाणांत होणें. या सर्वाला ग्रहणी हा अवयव व त्यांतील दोष हे कारण असतात. ग्रहणीचें स्वरुप असेल त्या प्रमाणें मृदु किंवा तीक्ष्ण द्रव्यें उपयोगी पडतात. या वचनावरुन विरेचनाशीं समगुण असलेल्या अतिसार व्याधीचें अधिष्ठान हें ग्रहणीच असतें हें लक्षांत येईल.

पूर्वरुप
हृन्नाभिपायूदरकुक्षितोदगात्रावसादानिलसन्निरोधा: ।
विट्‍सड्ग आध्मानमथाविपाको भविष्यतस्तस्य पुर:सराणि ॥
सर्वातीसारपूर्वरुपमाह - हृन्नाभीत्यादि । तोद: सर्वैर्ह्र्दादिभि:
संबध्यते, अत्र कुक्षिशब्द उदरैकदेशवाची; तेन न पौनरुक्त्यम् ।
अनिलसन्निरोध इति वायोरप्रवृत्ति: ।
विट्‍सड्ग: पुरीषाप्रवृत्ति:, एतच्च दोषदूष्यसंमूर्च्छानावस्थाप्रतिनियत
पूर्वरुपं, तेन रुपावस्थानां नानुवर्तते, यद्यनुवर्तेत तदा तत्र
व्याधिरेव नोत्पद्येत, विट्‍सड्गातिप्रतिषेधात् ।
अविपाकोऽन्नस्य । पुर:सराणि पूर्वरुपाणीति ।
मा.नि. अतिसार - ५. म. टीका पान ७४

हृदय, नाभिप्रदेश, गुद, उदर, कुक्षी या ठिकाणीं टोंचल्यासारखी वेदना होते. अंग गळून जातें, वायू सरत नाहीं, मलावष्टंभ असतो, पोट गुबारतें. अन्न नीट पचत नाहीं अशीं लक्षणें अतिसाराची पूर्वरुपें म्हणून होतात.

रुपें
अतिसाराचीं रुपें स्वतंत्रपणें सांगितलेलीं नाहींत परंतु प्रकारांत वर्णिलेल्या लक्षणांवरुन आणि व्याधिमुक्तीच्या लक्षणांवरुन अतिसाराचीं रुपें पुढीलप्रमाणें असतात असें सांगतां येतें. दिवसांतून सहा सात वेळां वा अधिक वेळाहि द्रवस्वरुप मलप्रवृत्ति असते. मलप्रवृत्ति अत्यंत द्रव, कित्येक वेळां अगदीं पाण्यासारखीहि असते. व्याधीच्या आरंभीचे दोन चार वेग मलयुक्त असले तरी पुढें पुढें मलाचें प्रमाण कमी होऊन द्रवता वाढत जाते. वात, मल व मूत्र यांच्या प्रवृत्ती एकदम होतात. मूत्रप्रवृत्तीच्या वा वातप्रवृत्तीच्या वेळेला मलप्रवृत्ते होतें व ती नियंत्रित करतां येत नाहीं. मलाचा वेग आवरत नाहीं. नाभीसमंतांत शूल, श्रम, क्लम, पिंडिकोद्वेष्ट, मुखताल्लशोष, तृष्णा, रौक्ष्य, उर:शूल, शब्दासहिष्णुता अशीं लक्षणें दिसतात.
===============
वातज अतिसार
अथावरकालं वातलस्य वातापव्यायामातिमात्रनिषेविणो
रुक्षाल्पप्रमिताशिनस्तीक्ष्णमद्यव्यवायनित्यस्योदावर्तयतश्च
वेगान् वायु: प्रकोपमापद्यते, पक्ता चोपहन्यते; स वायु:
कुपितोऽग्नावुपहते मूत्रस्वेदो पुरीषाशयमुपहृत्य, ताभ्यां
पुरीषं द्रवीकृत्य, अतिसाराय प्रकल्पते ।
सटीक च.चि. १९-५ पान १२६८.

वात प्रकृतीचा मनुष्य विशेषत: ऊन, वारा यामध्यें बसणें, व्यायाम करणें, रुक्ष पदार्थ खाणें, थोडेसें वा वेळ टळल्यानंतर जेवणें, तीक्ष्ण गुणाचे पदार्थ वा मध सेवन करणें, नित्य मैथुन करणें, उत्पन्न न झालेले वेगहि मुद्दाम प्रवृत्त करणें अशीं अपथ्यें करतो. त्यावेळीं वात प्रकोप होतो. अग्निमांद्य होतें. प्रकुपित झालेला वायु अग्निमांद्य झाल्यानंतर मूत्र व स्वेद यांना पुरीषाशयामधें (पक्वाशयामध्यें) खेंचून आणतो, मूत्र स्वेदाच्यामुळें पुरीषाला द्रवता येते व नंतर अतिसार होतो. चरकानें प्रकार भेदानें सांगितलेल्या अतिसाराच्या संप्राप्तींत जरी अप्‍ धातूच्या दुष्टीचा प्रत्यक्ष उल्लेख नसला तरी कफपित्त हें स्वत:च द्रव धातू असल्यामुळें (कफपित्ते द्रव धातु सहेते लंघनं महत्) व वात हा स्वेद मूत्र या सर्व शरीराला व्यापून असणार्‍या (स्वेदस्य क्लेदविधृति: मूत्रस्य क्लेदवाहनं ।) मलरुप द्रव द्रव्यांना खेंचून आणीत असल्याचा उल्लेख असल्यानें आणि अतिसरणाचें वर्णन सर्व प्रकारांत चरकानेंहि केलें असल्यामुळें त्यासहि या वर्णनामध्यें अपधातुदुष्टी असल्याचेंच अभिप्रेत होतें असें स्पष्ट दिसतें.

तस्य रुपाणि विज्जलमामं विप्लुतमवसादि रुक्षं द्रवं सशूल
मामगन्धमीषच्छशब्दं वा विबद्धमूत्रवातमतिसार्यते
पुरीषं, वायुश्चान्त:कोष्ठे सशब्दशूलस्तिर्यक् चरति विबद्ध
इत्यामातिसारो वातात् ।
च.चि. १९-६ पान १२६९

पक्वं वा विबद्धमल्पाल्पं सशब्दं सशूलफेनपिच्छापरिकार्तिकं
हृष्टरोमा विनि:श्वसञ्‍ शुष्कमुकिह: कट्य़ूरुत्रिकजानुपृष्ठपार्श्व
शूली भ्रष्टगुदो मुहुर्मुहुर्विग्रथितवर्चस्त्वात् ।
च.चि. १९-७  पान १२६९

तत्र वातेन विड्जलम ।
अल्पाल्पं शब्दशूलाढयं विबद्धमुपवेश्यते ॥
रुक्षं सफेनमच्छं च ग्रथितं वा मुहुर्मुहु: ।
तथा दग्धगुडामासं सपिच्छापरिकर्तिकम् ॥
शुष्कास्यो भ्रष्टपायुश्च हृष्टरोमा विनिष्टनन् ।
वा.नि. ८. ५ ते ७ पान ४९६

वातातिसाराच्या आमावस्थेंमध्यें, मलाची प्रवृत्ती ही फेसकट ( विज़्ज़्ल ), आमयुत्त्क पसरणारी, ज़मिनीवर पडल्यावर ज़िरणारी, (अ) रूक्ष (चिकटपणा थोडासाच असणारी) द्रव, शूलयुक्त आमगंधी व बाहेर पड्त असताना आवाज़ करत बाहेर पडणारी किंवा अल्प शब्दहि असते. मूत्र व वात यांचा अवरोध असतो, वायू कोष्ठामध्यें इकडून तिकडे फिरतो त्यामुळें गुरगुरणें, कळ येणें, शूल होणें, वायूचा संचार होत असतांना तो अडखडल्यासारखा वाटणें अशी लक्षणें होतात. वातातिसाराच्या पक्कावस्थेंत मलप्रवृति बांधून व थोडी थोडी होते, मल प्रवृत्तीच्या वेळीं आवाज़ होतो. शूल होतो, मलप्रवृत्ति फेसयुक्त व पिच्छायुक्त असते, गुदामध्यें कातरल्यासारख्या वेदना होतात, अंगावर रोमांच उभे रहातात. श्वास लागतो, तोंड कोरडें पडतें , कंबर, मांड्या, माकड हाड, गुढघे, पाठ, पार्श्वभाग या ठिकाणी शूल होतो. वरचेवर ग्रंथियुक्त मलप्रवृत्ती होते. मलाचा रंग जळलेल्या गुळाप्रमाणें काळा असतो. मलप्रवृत्तीच्यावेळीं कुंथावें लागतें.
============
पित्तज़ अतिसार
पित्तलस्य पुनरम्ललवणकटुकक्षारोष्णतीक्ष्णातिमात्रनिषेविणः
प्रतताग्निसूर्यसंतापोष्णमारुतोपहतगात्रस्य क्रोधर्षाबहुलस्य
पित्तं प्रकोपमाद्यते ।
तत् प्रकुपितं द्रवत्वादूष्माणमुपहत्य पुरीषाशयविसृतमौष्ण्याद्रवत्वात्
सरत्वाच्च भित्वा पुरीषमतिसाराय प्रकल्पते ।
तस्य रुपाणि - हारिद्रं हरितानीलं कृष्णं रक्तपित्तोपहितमति
दुर्गन्धमतिसार्यते पुरीषं, तृष्णादाहस्वेदमूर्च्छाशूलब्रध्नसंताप
पाकपरीत इति पित्तातिसार: ।
च.चि. १९, ८-९ पान १२६९

दुर्गन्ध्युष्णुं वेगवन्मांसतोयप्रख्यं भिन्नं स्विन्नदेहोऽतितीक्ष्णम् ।
पित्तात् पीतं नीलमालोहितं वा तृष्णामूर्च्छादाहपाकज्वारार्त: ।
पित्तातिसारलक्षणमाह - दुर्गन्धीत्यादि । एवम्भूत: पुरुषं एवं
भूतं वर्च: पित्तादतीसार्यत इति संबन्ध: ।
वेगवत् अतिशयेन सवेगम् । मांसतोयप्रख्यं मांसधावनोदकसदृशम् ।
भिन्नं स्फुटितम्, अतितीक्ष्णम् अतिशयेन तीक्ष्णं, तच्च मक्षिकाणा-
मपसर्पणेन ज्ञेयम् । दाहो जठरे वा पाको गुदे एव ज्ञेय: ।
सटिक सु.उ. ४०-१० पान ६९७

अम्ल, लवण, कटु, क्षार, उष्ण, तीक्ष्ण, अशा द्रव्यांचें अति मात्रेमध्यें सेवन करणें, अग्नि, सूर्य, वा वाफ यांची उष्णता सतत घेणें वा याच्यामुळें शरीर संतप्त होणें, क्रोध आणि ईर्षा यानें चित्त प्रक्षुब्ध होणें या कारणांनीं पित्त प्रकुपित होते तें स्वत:च्या द्रवगुणानें अग्नीचें उपहनन करुन पक्वाशयामध्यें येतें. हे पित्त उष्ण द्रव सर असें असल्यामुळें मलाला भिन्नता येते व अतिसार होतो. पित्तातिसारामध्यें मलप्रवृत्ती पिवळी, हिरवी, निळी, काळी, रक्तपित्तयुक्त दुर्गंधी उष्ण, फुटीर, तीक्ष्ण मांस धुतलेल्या पाण्यासारखी अशी असते. मलाचा वेग आवरत नाहीं. एकदम खूप वेगानें व पुष्कळ मलप्रवृत्ति होते. तृष्णा, मूर्च्छा, दाह, स्वेद, शूल, ज्वर, गुदपाक, अशीं लक्षणें असतात.
================
रक्तातिसार
पित्तातिसारी यस्त्वेतां क्रियां मुक्त्वा निषेवते ।
पित्तलान्यन्नपानानि तस्य पित्तं महाबलम् ।
कुर्याद्रक्तातिसारं तु रक्तमाशु प्रदूषयेत् ।
तृष्णां शूलं विदाहं च गुदपाकं च दारुणम् ॥
पित्तातिसारीत्यादिना पित्तातिसारस्यैव हेतुविशेषकृतावस्था
भेदरुपं रक्तातिसारं दर्शयति ।
अयं च रक्तातिसारो यद्यपि पित्तातिसारोत्तरकालभावितयेहोक्त:;
तथाऽपि पित्तातिप्रकोपेण रक्तदुष्टया च प्रथममपि भवत्येवायं
दृष्टत्वादिति ज्ञेयम् । तेनात्रोत्पत्तिक्रमाभिधानमतन्त्रम् ।
यथो `पाण्डुरोगी तु योऽत्यर्थम् (चि.अ.१६) इत्यादिनोक्तकामलोत्पादे
यथोक्तक्रमेण विनाऽपि कामला भवति ।
एवमपि चास्य रक्तातीसारस्य पित्तजन्यत्वात् पित्तके एवावरोध;,
तेन षट्‍संख्या न व्याहन्यते । अतीसारस्य यत् प्रसृतायां सिद्धौ
आमस्तुशकृत्पित्तवातकफान् अतीसारकारकानभिधायोक्तं -
``षण्णामेषां द्विसंसर्गात्त्रिंशद्‍भेदा भवन्ति ते ।
केवलै: सह षड‍त्रिंशत्'' (सि.अ.) इति, तदप्यत्रैव षट्‍केऽन्तर्भाव-
नीयं, तत्र सूक्ष्मभेदगणनया च भेद: कृत इत्यविरोध: ।
सटिक च.चि. १९-७३, ७४ पान १२७८

अत्र चारुणकृष्णपाण्डुत्वादिना वातादयो दूषका बोद्धव्या: ।
यदुक्तं - `दोषलिड्गेन मतिमान संसर्ग: तत्र लक्षयेत् इति ।
एवं स्नेहाजीर्णविसूचिकाविषार्श: क्रिमिप्रभृतिजन्येष्वती
सारेषु षट्‍कातिरिक्तत्वं प्रतिक्षिप्तं बोद्धव्यं, अव्यभिचरित-
दोषलिड्गत्वादिति जेज्जट: ।
मा.नि. अतिसार २० म. टीका पान ७९

पित्तातिसारी मनुष्य ज्यावेळीं अधिक प्रमाणांत पित्तकारक पदाथाचें सेवन करतो त्यावेळीं पित्त हें प्रकुपित होऊन रक्ताला दूषित करुन रक्तातीसार उत्पन्न करतें. मलप्रवृत्ति रक्तयुक्त असते. तृष्णा, शूल, दाह, गुदपाक हीं लक्षणें असतात.
रक्तातिसार ही प्रत्येक वेळीं पित्तातिसाराची अवस्थाच असली पाहिजे असें नाहीं. पित्तकर आहार विहाराच्या अतियोगानें, पित्तप्रकोप होऊन प्रथमपासून रक्तातिसार होऊं शकतो. या रक्तातिसारामध्यें इतर दोषांच्या अनुबंधामुळें मलप्रवृत्तीमध्यें निरनिराळीं इतर दोषांची लक्षणेंहि दिसतात.
=====================
कफज अतिसार
श्लेष्मलस्य तु गुरुमधुरशीतस्निग्धोपसेविन: संपूरकस्या-
चिन्तयतो दिवास्वप्नपरस्यालस्य श्लेष्मा प्रकोपमापद्यते ।
स स्वभावाद्‍ गुरुमधुरशीतस्निग्ध: स्त्रस्तोऽग्निमुपहत्य-
सौम्यस्वभावात् ।
पुरीषाशयमुपहत्योपक्लेद्य पुरीषमतिसाराय कल्पते ।
सटीक च. चि. १९-१०

तस्य रुपाणि - स्निग्धं श्वेतं पिच्छिलं तन्तुमदामं गुरु दुर्गन्धं-
श्लेष्मोपहितमनुबद्धशूलमल्पाल्पमभीक्ष्णमतिसार्यते सप्रवाहिकं
गुरुदरगुदबस्तिवंक्षणदेश: कृतेऽप्यकृतसंज्ञ: सलोमहर्ष:
सोत्क्लेशो निद्रालस्यपरीत: सदनोऽन्नद्वेषी चेति श्लेष्मातिसार: ।
सटिक च.चि. १९-११ पान १२७०

गुरु, मधुर स्निग्ध, शीत हे पदार्थ अधिक प्रमाणांत सेवन करणें, नेहमींच अधिक प्रमाणांत जेवणें, निष्काळजी असणें, दिवसा झोंपणें, आळसानें बसून रहाणें, अशा कारणांनीं विशेषत: कफप्रवृतीमध्यें कफ प्रकुपित होतो, कफ हा स्वभावत:च गुरु, मधुर, स्निग्ध, शीत असा असल्यामुळें तो स्वस्थानांतून च्युत होऊन अग्नीचा उपघात करतो पक्वाशयाला दुष्ट करुन त्या ठिकाणीं असलेल्या मलाला क्लिन्न करुन (द्रवीभूत करुन) अतिसार उत्पन्न करतो. कफातिसारामध्यें मलाचें स्वरुप श्वेत, स्निग्ध, पिच्छिल, तंतुयुक्त, आमयुक्त, गुरु दुर्गंधी, कफयुक्त असें असतें. मलप्रवृत्ति थोडी थोडी, पुन्हां पुन्हां होते. कुंथावें लागते. उदर, गुद, बस्ती, वंक्षण या ठिकाणीं जडपणा वाटतो. शौचास जाऊन आलें तरी पुरेसें न वाटतां पुन्हां जाण्याची इच्छा होतें. अंगावर रोमांच उभे राहातात, मळमळते, घशाशीं येते, झोंप येतें, आळस येतो, अंग गळून जातें. अन्न नकोसें वाटतें.
===================
आमापक्व अवस्था
आम, पक्वावस्थेचीं लक्षणें हीं सर्वत्र अतिसाराच्या प्रकारांत मानलीं पाहिजेत. कफातिसारामध्यें मात्र अवस्थानुरुप उपचारामध्यें फारसा फरक करावा लागत नसल्यानें पुढें चिकित्सेंतसुद्धां स्वतंत्र उल्लेख केलेला नाहीं. मागें सांगितलेल्या आमाच्या सामान्य वर्णनावरुन अतिसाराच्या प्रकारामध्यें अवस्था भेदानें उत्पन्न होणारीं लक्षणें सहज कळण्यासारखीं आहेत. माधवानें थोडक्यामध्यें अतिसाराच्या आम पक्वावस्थेंतील लक्षणें पुढीलप्रमाणें दिलीं आहे.

संसृष्टमेभिर्दोषैस्तु न्यस्तमप्स्ववसदिति:
पुरीषं भृशदुर्गन्धि पिच्छिलं चामसंज्ञितम् ॥
एतान्येव तु लिड्गानि विपरीतानि यस्य वै ।
लाघवं च विशेषण तस्य पक्वं निविर्दिशेत् ॥
सर्वातिसाराणां चिकित्सोपयोगित्वेनामलक्षणं
पक्वलक्षणं चाह - संसृष्टमित्यादि ।
संसृष्टं संबद्धं, एभिर्दोषैर्दुष्टिभिरुक्त वाताद्यतीसारलिड्गै ।
दुष्टयश्चात्र यथासंभवं व्यस्ता: समस्ताश्च बोद्धव्या:, तेन
सर्वाति साराणां न सान्निपातिकत्वप्रसड्ग: ।
न्यस्तमप्सु जले क्षिप्तं, अवसीदति निमज्जति,
आमस्य गौरवात् । भृशशब्द: पिच्छिलेनापि संबध्यते ।
दुर्गन्धि विस्त्रम् । पिच्छिलमामसंबन्धात् ।
एतानीति जलनिमज्जनादीनि । लाघवं कोष्ठस्य
शरीरस्य च, चकारेण कफदुष्टयादिकं विनाऽप्यम्बुनिमज्जनं
लक्षणमिति समुच्चीयते ।
यदुक्तं - ``मज्जत्यामागुरुत्वाद्विद्‍ पक्वा तूत्प्लवते जले ।
विनातिद्रवसंघातशैत्यश्लेष्मप्रदूषणात् इति ।
अथवा आमलिड्गवैपरीत्येनैव लाघवे सिद्धे पुनर्लाघवकरणं
तत् कफदुष्टयादिव्यतिरेकं बोधयतीति ॥
मा.नि. अतिसार १२,१३ म. टीकेसह पान ७६

आमावस्थेमध्यें त्या त्या प्रकारानुरुप निरनिराळ्या दोष लक्षणांनींयुक्त असा मल असतो तो पाण्यामध्यें बुडतो. त्याचें स्वरुप अत्यंत दुर्गंधी (पिच्छिल) बुळबुळीत असें असतें. अतिसाराला पक्वावस्था प्राप्त झाली असतांना मल पाण्यांत टाकला असतांना तरंगतो, मलाला चिकटपणा नसतो, दुर्गंधी असत नाहीं, मलप्रवृत्तीचे वेळीं फारसें कुंथावें लागत नाहीं. लक्षणांची तीव्रता कमी होते. कोष्ठ व शरीर यामध्यें हलकेपणा वाटतो. पाण्यावर तरंगणें ही पक्व मलाची परीक्षा कफातिसारामध्यें उपयोगी पडत नाहीं. कफ हा स्वभावत:च गुरु असल्यामुळें कफदुष्टमल, निरामस्थितींतहि गुरुच असतो त्यामुळें मल पाण्यांत बुडतो. मात्र मलप्रवृत्तींतील दोषांचें प्रमाणच पुष्कळ कमी झालें असेल तर हाहि मल पक्वावस्थेंत तरंगू शकतो.
===========================
सान्निपातिक अतिसार
अतिशीतस्निग्ध रुक्षोष्णगुरुखरकठिनविषमविरुद्धासात्म्य-
भोजनात् कालातीतभोजनाद्‍ यत्किचिंदभ्यवहरणात् प्रदुष्ट-
मद्यपानीयपानादतिमद्यपानादसंशोधनात् प्रतिकर्मणां विषम-
गमनादनुपचाराज्ज्वलनादित्यपवनसलिलातिसेवनाद्‍स्वप्ना-
द्वेगविधारणादृतुविपर्ययादयथाबलमारम्भाद्‍भयशोकचित्तोद्वे
गातियोगात् कृमिशोषज्वरार्शोविकारातिकर्षणाद्वा व्यापन्ना-
ग्नेस्त्रयो दोषा: प्रकुपिता भूय एवाग्निमुपहत्य पक्वाशयमनु-
प्रविश्यातीसारं सर्वदोषलिड्गं जनयति ।
अतिशीतेत्यादिना त्रिदोषजातीसारमाह ।

अत्र च शीतादीनां यथासंभवं वातादिकर्तृत्वं ज्ञेयं; किंवा
सर्वेषामेव त्रिदोषकर्तृत्वं ज्ञेयं ।
उक्तं हि - ``शमप्रकोपौसर्वेषां दोषाणामग्निसंश्रितौ (चि.अ.अप.) इति ।
यत् किंचिदभ्यवहरणादिति पथ्यापथ्यभोजनात् ।
अनुपचारादिति प्रतिकर्मणामेवासम्यगुपचारादित्यर्थ: ।
सालिलातिसेवनादित्यत्र अवगाहादिना बाह्यसेवनं सलिलस्योच्यते,
अतिपानं तु प्रावेवोक्तम् ।
व्यापन्नाग्नेरिति वचनाद्यथोक्तहेतूनामग्निवधद्वारैव प्रायस्त्रिदोषकर्तृत्वं दर्शयति ।
सटीक च.चि. १९-१२ पान १२७०

शीत, स्निग्ध, रुक्ष, उष्ण, गुरु, खर, कठीण अशा द्रव्यांचें अति प्रमाणांत सेवन केलें; भोजनामध्यें विषम, विरुद्ध असात्म्य हे दोष असले, जेवणाच्या वेळां टळून गेल्यानंतर जेवण केलें, पथ्यकर अपथ्यकर याचा विचार न करतां समोर येतील ते पदार्थ खाल्ले, दुष्ट झालेलें मद्य व जल यांचें सेवन केलें, मद्यपान अधिक प्रमाणांत केलें, अवश्यक असून शोधन घेतलें नाहीं, पंचोपचारांचा मिथ्यायोग झाला. पंचोपचार केले नाहींत, शेक, ऊन, वारा, यांचें सेवन अतियोगानें झालें, अति पोहणें, जागरण करणें, फार झोंप घेणें, वेग विधारण करणें, ऋतु विपर्यय होणें, आपल्या शक्तीचा विचार न करतां श्रम करणें, भय, शोक, उद्वेग या मानसिक विकृतींचा अतियोग होणें कृमि, शोष, ज्वर, अर्श या व्याधीनीं शरीर क्षीण होणें, अशीं कारणें घडलीं तर या कारणांनीं मंदाग्नी पुरुषाचे तीनहि दोष प्रकुपित होतात व ते अग्नीचा अधिकच उपघात करुन पक्वाशयामध्यें स्थान संश्रित होऊन सर्व दोषांच्या लक्षणांनीं युक्त असा अतिसार व्याधी उत्पन्न करतात.

अपि च शोणितादीन् धातूनतिप्रकृष्टं दूषयन्तो धातुदोष-
स्वभावकृतानतीसारवर्णानुपदर्शन्ति ।
तत्र शोणितादिषुधातुष्वतिप्रदुष्टेषु हारीद्रहरितनीलमाञ्जिष्ठ
मांसधावनसन्निकाशं रक्तं कृष्णं श्वेतं वराहमेद: सदृशमनुबद्धवेदनमवेदनं
वा समासव्यत्यासादुपवेश्यते शकृद्‍ ग्रथितमासं सकृत्,
सकृदपि पक्वमनतिक्षीणमांसशोणितबलो मन्दाग्निर्विहतमुखरसश्च;
तादृशमातुरं कृच्छसाध्यं विद्यात् ।
च.चि. १९-१३ पान १२७१

प्रकुपित झालेल्या त्रिदोषांमुळें रक्तादि इतर धातूंचीहि अत्यंत दुष्टी होते. धातुदुष्टि व दोषदुष्टी यांच्या प्राधान्यप्रमाणें अतिसारांतील मलप्रवृत्तिला निरनिराळ्या प्रकारचें स्वरुप येतें. रक्तादिधातूंच्या दुष्टीमुळें हळदीसारखा पिवळा, हिरवा, निळा, मंजिष्ठेसारखा तांबुस काळसर, मांस धुतलेल्या पाण्यासारखा, तांबडा, काळा, पांढरा डुकराच्या चरबीसारखा अत्यंत वेदनायुक्त किंवा वेदना मुळींच नसलेला, असा मलस्त्राव आलटून पालटून निरनिराळ्या लक्षणांनीं युक्त असा होतो. कधीं कधीं मलप्रवृत्ति ग्रंथियुक्त व साम असते. कधीं अत्यंत द्रवस्वरुपनिराम अशी असते. मंदाग्नि आणि तोंडाला चव नसणें अशीं लक्षणें या सान्निपातातिसारांत असतात. या सान्निपातिक अतिसारानें पीडित अशा रोग्याचें बल बरें असेल, फार कृशता आली नसेल, रक्त क्षीण झालें नसेल तर रोगी कष्टसाध्य असतो.

तन्द्रायुक्तो मोहसादास्यशोषी वर्च: कुर्यान्नैकरुपं तृषार्त: ।
सर्वोद्‍भूत: सर्वलिड्गोपपत्ति: कृच्छात्साध्यो बालवृद्धासहानाम् ।
वंगसेन अतिसार १५५ पान ९६

वंगसेनानें अतिसाराच्या लक्षणांमध्यें जीं लक्षणें दिलीं आहेत तीं थोडी असूनहि महत्त्वाची आहेत. मलाचें स्वरुप सर्ववर्णयुक्त व विविध असतें. सर्व दोषांचीं लक्षणें दिसतात. तंद्रा, मोह, मुखशोष हीं लक्षणें विशेष असतात. कारणभेदानें दोषज अतिसारांचे कांहीं प्रकारविशेष सुश्रुतानें वर्णन केले आहेत.

शरीरिणामतीसार: संभूतो येन केनचित् ।
दोषाणामेव लिड्गानि कदाचिन्नातिवर्तते ॥
स्नेहाजीर्णनिमित्तस्तु बहुशूलप्रवाहिक: ॥
विसूचिकानिमित्तस्तु चान्योऽजीर्णनिमित्तज:
विषार्श: कृमिसंभूतो यथास्वं दोषलक्षण: ॥
सु.उ. ४०,२२,२३, सटीक पान ६९८

कारणभेदानें अतिसाराचे पुष्कळच प्रकार होतात. स्नेहाजीर्ण, प्रवाहिका, विसूचिका, अजीर्ण, विष अर्श, कृमी या कारणानें जरी अतिसार उत्पन्न होत असला तरी निरनिराळ्या दोषांची लक्षणें त्यांत असतातच. याठिकाणीं अतिसार व्याधी असा शब्द वापरण्याचे ऐवजीं निरनिराळ्या कारणांनीं वा निरनिराळ्या रोगांत द्रवमलप्रवृत्ती हें लक्षण असून तिचें स्वरुप दोषांप्रमाणें विविध असतें असें म्हणणें अधिक सोयीस्कर होईल.
=========================
आमातिसार
अन्नाजीर्णात्प्रद्रुता: क्षोभयन्त: कोष्ठं दोषा धातुसंधान्मलांश्च ।
नानावर्णं नैकश: सारयन्ति शूलोपेतं षष्ठमेनं वदन्ति ॥
आम तीसारमाह - अन्नाजीर्णादित्यादि ।
अन्नं च तदजीर्ण चेति अन्नाजीर्नम‍ ।

अत एवाह क्षारपाणि: - `यथाभुक्तमशनमुपविशति'' इति ।
प्रद्रुता विमार्गगा: । क्षोभयन्तो दूषयन्त: ।
धातुसंधान् रक्तादीन् । मलान् पुरीषादीन् । नैकशो बहुश: ।
आमातीसारमाह - अन्नेत्यादि । अन्नं च तदजीर्ण चेति
अन्नाजीर्ण, तस्मात् प्रदुता उदीरिता दोषा: कोष्ठं क्षोभयन्तो
दूषयत्न:, कोष्ठशब्देन समस्तमुदरमध्यमुच्यते तत्र गता इत्यर्थ: ।
धातूसंघान् रक्तादीन्, मलान्पुरीषादीन्, नैकशो बहुश:, ते ।
नानावर्णं सारयन्ति । भूयसेति पाठान्तरे बहुवेगत्वं सूचितम् ।
शूलोपेतं शूलयुक्तम् ।
अत्र पुन: षष्ठ इति संख्यावचनं नियमार्थ, तेन
भयस्नेहाजीर्णविसृचिकार्शोजीर्णादिन्मित्ताअ अतिसारा न
पृथग्गणनीया:, यतस्ते दोषजेष्वेवान्तर्भूत: ।
प्रसंगादामलक्षणं लिख्यते - ``आहारस्य रस:
शेषो यो न पक्वोऽग्लिलाघवात् । स हेतु: सर्वरोगाणामाम
इत्यमिधीयते'' इति ।
दोन्ही टीकेसह मा.नि. अतिसार ११ पान ७६

यद्यपि सर्वातीसाराणामादामातीसारत्वं, तथाऽपि प्रभूता-
मजनितत्वादामजस्य पृथगुपादानं, एवं सान्निपातिकत्वेऽ
प्यस्य पृथगुपादानं समाधेयम् ।
टीका सु. उ. ४०-१६ पान ६९८

अन्नाच्या अजीर्णामुळें प्रकुपित झालेले दोष कोष्ठाचा क्षोभ करुन धातु व मल यांनाहि दूषित करतात. त्यामुळें अनेक वेळां निरनिराळ्या स्वरुपाची अशी मलप्रवृत्ती होते. कधीं कधीं प्रथमत:च खाल्लेलें अन्न जणूं जसेंच्या तसेंच पडतें. आमाच्या प्राधान्यामुळें मल, चिकट, बुळबुळीत दुर्गंधी असा असूं शकतो. आमातिसारामध्यें आम ही अवस्था नसून तो संप्राप्तींतील एक घटक आहे हें या प्रकरणीं लक्षांत ठेवावें. चरकाच्या वर्गीकरणाप्रमाणें या आमातिसाराचा समावेश सान्निपातातिसारामध्येंच होतो. आमातिसाराच्या सुश्रुतोक्त श्लोकामध्यें `अन्नाजीर्णात्' या ऐवजीं `आमाजीर्णोपद्रुत:' असा पाठ आहे. अर्थ दृष्ट्या दोन्ही पाठ सारखेच असले तरी माधवाचा दुसरा पाठ लक्षणांच्या विविधतेच्या दृष्टीनें अधिक योग्य आहे. सुश्रुतानें शोकातिसार म्हणून जो प्रकार वर्णन केला आहे. त्याचें स्वरुप पाहतां तो शोकोत्पन्न सन्निपातातिसारच आहे. चरकानें सन्निपाताच्या कारणामध्यें शोकाचा उल्लेख केला असून संप्राप्तिमध्यें सन्निपातानें रक्ताचीहि दुष्टी होते असें म्हटलें आहे. सुश्रुताचें वर्णन असें.

तैस्तैर्भावै: शोचतोऽल्पाशनस्य बाष्पावेग: पक्तिमाविध्य (श्य) जन्तो: ॥
कोष्ठं गत्वा क्षोभयत्यस्य रक्तंतच्चाधस्तात् काकणन्ती प्रकाशम् ॥
वर्चोमिश्रं नि:पुरीषं सनन्धं निर्गन्धं वा सार्यते तेन कृच्छात् ॥
शोकोत्पन्नो दुश्चिकित्स्योऽतिमात्रं ।
सु.उ. ४०-१३, १४ पान ६९७ ----

पक्तिमाविश्येति पाठान्तरे स एवार्थ: ।
गदाधरस्तु वह्निशब्देन पित्तमाह; अविड्‍ अल्पविट्‍, अल्पाशनत्वात् ।
निर्गन्धं गन्ध वद्वेति विकल्प, अविड्‍सविट्‍भ्यामिति कार्तिक:,
अन्ये तु पित्तस्य पूतित्वात्प्रबलगन्धवत्ता, तस्य नातिदुष्टया
निर्गन्धत्वमिति; गन्धश्च विस्त्र इत्याहु: ।
क्षोभयेत्तस्य रक्तमित्यत्र `शोषयेत्तस्य भुक्तं' इति पाठान्तरमयुक्तं,
काकणन्तीप्रकाशत्वे हेत्वन्तराभावात् ।
तस्मादाद्य एव पाठो ज्यायान् व्याख्यातश्च ।
जेज्जटादिभि: सर्वैरेवाय वातपित्तज उक्त: ।
दुश्चिकित्स्योऽतिमात्रमिति शोकोपनोदं विना केवलेन भेषजे नानुपशमात् ।
अते एवाह कष्ट प्रदिष्ट इति । वैद्यैर्बह्मादिभि: ।
गदाधरस्त्वाह `एष' इत्यनेनैवंसंप्राप्तिक एव कष्टो नत्वन्याशोकज इति ।
म.टीका. मा.नि. अतिसार ९-१० पान ७५.७६

आधींच अल्पाशनामुळें दुर्बल झालेल्या व्यक्तीला विशेष स्वरुपांच्या आपत्तीमुळें अत्यंत शोक झाला तर त्याच्या शोकामुळें उत्पन्न झालेला उष्मा कोष्ठामध्यें शिरुन अग्नीला प्रकुपित करुन रक्ताचा क्षोभ घडवितो. क्षुब्ध झालेलें रक्त गुदमार्गानें बाहेर पडतें. त्याचा वर्ण गुंजेसारखा लाल असतो. कधीं कधीं रक्तस्त्रावाबरोबर थोडासा मलहि असतो किंवा अल्पाशनामुळें मल नसतोहि. पित्ताच्या अनुबंधाप्रमाणें मलप्रवृत्ति दुर्गंधी वा गंधहीन असते. दुर्गंधी असणें वा नसणें मलाच्या अस्तित्वावरहि अवलंबून असते. `क्षोभयेत् तस्य रक्तं' च्या ऐवजीं `शोषयेत तस्य भुक्तं' असा पाठ योग्य नाहीं; कारण त्यामुळें गुंजेप्रमाणें रक्तवर्ण मलप्रवृत्ती होतें हें लक्षण कारणशून्य ठरते असें टीकाकारानें म्हटलें आहे. सुश्रुतानें वर्णन केलेला हा शोकातिसार कोणत्या हेतूनें व अनुभवानें वर्णन केला असावा तें आज सांगता येत नाहीं.
=========================
आगंतुज अतिसार
आगन्तू द्वावतीसारौ मानसौ भयशोकजौ ।
तत्तयोर्लक्षं वायोर्यदतीसारलक्षणम् ॥
मारुतो भयशोकाभ्यां शीघ्रं हि परिकुप्यति ।
आगन्तू इत्यादिना भयशोकजावतीसारौ प्राह ।
आगन्तू इति आगन्तुहेतुजनितभयशोकजौ ।
मानसाविति मानसदोषभयशोकजनितौ ।
एतेन मानसत्वमागन्तुत्वं चानयोर्न विरोधि भवति ।
अनयोर्गलक्षणमतिदेशेनाह - तत्तयोर्लक्षणमित्यादिना
कस्मात्पुनर्वातातिसारलक्षणमनयाभेर्वतीत्याह - मारुत:
कारणं भवति, तस्माद्वातातीसारलक्षणानि भवन्तीति युक्तमित्यर्थ: ।
न चानयोर्वातजन्यत्वेन वातलक्षणयुक्तत्वेन वातजेनैव
ग्रहणमस्विति वाच्यं; यतोऽनयोर्वातजाद्भिन्नाऽपि चिकित्सा
भविष्यति हर्षणाश्वासनरुपा, चिकित्साभेदार्थमेव व्याधीनां
भेदोऽभिधीयते ।
किंच, लक्षणभेदोऽप्यत्र `मारुत: शीघ्रं हि परिकुप्यति' इत्यनेनोक्त: ।
यतो भयशोकजेऽतिसारे शीघ्रकारी वायुर्भवतीति शीघ्रं कुप्यतीति
पदेनोच्यते; तेन निदानानन्तरं झटिति उत्पाद एवात्र विशिष्टमपि
लक्षणम् ।
सन्निपातातिसारे भयशोको कारनत्वेनोक्तौ, तौ हि हेत्वन्तर-
सहितौ तत्र कारणं भवत इति नैककारणता त्रिदोषजभय शोकजानाम् ।
भयशोकजयोश्च यद्यपि तुल्यं लक्षणमिहोक्तं तथाऽपि
चिकित्साभेदात्तयोर्भेद उक्त: ।
तथा हि भयजे आश्वासनं, शोकजे हर्षणमिति चिकित्साभेद ॥
च.चि. १९-१५, १६ व त्यावरील टीका पान १२७१-७२

आगंतू कारणानें उत्पन्न होणारे दोन प्रकारचे अतिसार आहेत. या अतिसारामध्यें वातप्रकोपाचें प्राधान्य असतें. वातातिसारामध्यें याचा उल्लेख केला नाहीं. याचें कारण टीकाकारानें असें सांगितलें, कीं वातातिसारापेक्षां येथें कारणांचा विचार करतां चिकित्सेमध्यें अंतर पडतें. भय शोकामुळें वातप्रकोप अतिशय त्वरेनें होऊन त्यामुळें उत्पन्न होणारीं लक्षणेंहि शरीरावर फार थोडया वेळांत प्रगट होतात. या दोन विशेषामुळें वातातिसारापेक्षां हे दोन प्रकार वेगळे मानले आहेत. सान्निपातातिसाराच्या कारणामध्यें भय, शोक, हेतू म्हणून उल्लेखिले आहेत. तेथें ते सान्निपांताचे स्वतंत्र कारण नसून इतर सरकारी कारणांबरोबर एक सहाय्यक कारण म्हणून असतात.
============
भयातिसार लक्षणें
पांडुता, दीनता, कंप, मोह द्रवलप्रवृत्ती फेनिल, मल क्वचित् ज्वर मुखशोष, तालुशोष अशीं लक्षणें असतात.
================
शोकातिसार
खिन्नता, उद्वेग, निद्रानाश, अरति, भ्रम, मुखशोष, अन्नद्वेष, द्रवमलप्रवृति, फेनिल ग्रथित अतिद्रव अशी मलप्रवृत्ती.
==============
द्विदोषज अतिसार
वंगसेनानें, वातपित्तज, कफपित्तज व वातकफज असे अतिसाराचे तीन द्वद्वंज प्रकार मानले आहेत.

कट्‍वादिभी रसै: कुद्धै: प्रवृद्धौ पित्तमारुतौ ।
व्यासाद्य ग्रहणीं नृणामतीसारकरौ स्मृतौ ।
सशब्दं फेनिलं रुक्षं कषायोदकसन्निभम् ।
पक्वाम्लरसवर्णाभं हरिद्राप्रतिमं धनम् ।
विण्मूत्रकार्ष्ण्य सृजति सशूलं दाहपाकवान् ।
विद्यात्तद्दाहशोषान्तवातपित्तातिसारिणाम् ।
वंगसेन अतिसार २२६ ते २२८ पान १०३

कटूरस आदि कारणांनीं प्रकुपित झालेले वात पित्त, ग्रहणी या अवयवाला दुष्ट करुन अतिसार उत्पन्न करतात. यामध्यें शब्दयुक्त, फेसाळ, रुक्ष, काढयाच्या रंगासारखी, पिवळी, पिकलेल्या चिंचेप्रमाणें तांबुस काळसर, फार द्रव नाहीं अशी मलप्रवृत्ती असते. मूत्रहि कृष्णवर्ण होतें. शूल, दाह, पाक, शोष हीं लक्षणें असतात.

कट्‍वम्ललवणस्निग्धगुरुमिष्टोपसेवनात् ।
श्लेष्मपित्ते प्रकुपिते वह्निं संछाद्य देहिनाम् ॥
कषायन्तं द्रवं स्निग्धं मन्दवेगं सवेदनम् ।
धनं शाल्मलिपित्छाभं पद्मपत्रनिभं क्वचित् ॥
पिच्छिलं शशवर्णाभं रक्तबिन्दुभिराचितम् ।
क्षुत्तृष्णे चातिबहुले श्लेष्मपित्तातिसारिणाम् ॥
वंगसेन अतिसार २३३ ते २३५ पान १०३

कटु, अम्ल, लवण, स्निग्ध, गुरु, मधुर अशा द्रव्यांच्या उपयोगामुळें कफपित्त हें अग्निमांद्य करुन अतिसार उत्पन्न करतात. मलाचें स्वरुप क्वाथसदृश, शाल्मली निर्यासारखे, कमलपत्रासारखें असतें, मलाचा वर्ण क्वचित् शंखाप्रमाणें पांढरा असून मधून मधून रक्ताचें ठिकपे दिसतात. मल पिच्छील व स्निग्ध असतो. मलप्रवृत्तीचा वेग मंद असून वेदना फार होत नाहींत. क्षुत् व तृष्णा अधिक असतें.

रसै: स्वादुकटुप्रायैरुभौ वातकफौ नृणाम् ।
कुरुतस्तावतीसारं क्रुद्धौ वह्निं निरस्य च ॥
द्रवं सफेन पुरीषं तत्तुल्यमामगन्धिकम् ।
सशब्दं वेदनावन्तं न चामं परिपच्यते ॥
नित्यं गुडगुडायन्तं तन्द्रामूर्च्छाभ्रमक्लमै: ।
प्रसक्तं सन्धिकट्य़ूरुजानुपृष्ठास्थिशूलिन: ॥
वंगसेन अतिसार २४६ ते २४८ पान १०४

मधुर, कटु द्रव्यांच्या अति सेवनानें वात व कफ हे दोष प्रकुपित होऊन अग्नीला दुष्ट करुन अतिसार उत्पन्न करतात. मलाचें स्वरुप द्रव, सशब्द, फेनयुक्त आमंगधी, वेदना युक्त असें असतें. पोटामध्यें गुडगुडतें, तद्रा, मूर्च्छा, भ्रम, क्लम आणि संधी कटि, ऊरु, जानु, पृष्ठ, अस्थि या अवयवांत शूल असतो. मल प्रवृत्ति साफ होत नाहीं. (प्रसक्त) कृतेप्यकृतसंज्ञ)
वंगसेन व योगरत्नाकर यांनी छद्‍र्यतीसार: शोकातिसार व ज्वरातिसार असे अवस्थाविशेषानें उपद्रवसहित अतिसारचे तीन प्रकार मानिले आहेत.
(यो.र.आतिसार पान २३१ १३)

चिकित्सा संदर्भानें लक्षणें
गुद भ्रंश (च.चि. १९-४६)
स्तब्धभ्रष्टगुदता (च.चि.१९-५०)
ज्वर, शोथ, गुल्म (च.चि. १९-७२)
गुदभ्रंश, मूत्राघात-कटिग्रह (वा.चि. ९-५१)
अतिसार, ग्रहणी, क्षय, गुल्म, गलामय, कास, श्वास, अग्निसाद, अर्श, पीनस, अरोचक ( वा.चि. ९-११२)
कृमी, शोथ, पांडु, प्लीहा, गुल्म, उदर, ग्रहणी, अर्श (वंगसेन अतिसार १५४ पान ९६) ज्वर, छर्दी, शूल, श्वास, कास (वंगसेन पान ९७) रक्तपित्त, पांडु, अरोचक, कार्श्य, मृदुता, शोथ, ग्रहणी, कामला, (वंगसेन अतिसार २०० पान १००)
(मृदुता म्हणजे आंत्रादि कोष्ठस्थ अवयवांना अत्यंत शैथिल्य येऊन त्यांचें बल जवळ जवळ नष्ट होणें.)

वृद्धि स्थान क्षय
अतिसाराच्या वृद्ध स्थितींत मल वेग अधिक वेळां अधिक प्रमाणांत होतात. पिंडिकोद्वेष्ट, अंगमर्द, शोष हीं लक्षणें वाढत जातात, त्वचा रुक्ष, निस्तेज व बलहीन होते, डोंळे खोल जातात. निस्तेज होतात. आवाज आंत ओढल्यासारखा होऊन उमटत नाहीं. अतिसार हा कांहीं वेळां दीर्घकालहि रहातो. या स्थितीमध्यें द्रव मलप्रवृत्तीचें प्रमाण व वेगांची संख्या मध्यम असते. (६-१० वेग) व तृष्णादि लक्षणें असतात. हा व्याधि जीर्णहि होऊं शकतो. (च.चि.१९-७२) या स्थितीमध्यें मलवेगाचें प्रमाण पुष्कळ कमी होतें पण शूल अग्निमांद्य, अरुचि हीं लक्षणें रहातात. अशावेळीं ग्रहणी आणि अग्निमांद्य या विकाराशीं सादृश्य दिसून निदान करणें कठिण जातें.

निस्सारक
भावप्रकाशकाच्या अतिसाराच्या चिकित्साप्रकरणांत, मध्यमखंडांत सूत्र १०६ या ठिकाणीं निस्सारक असा शब्द आला आहे. त्याचा अर्थ `निढाहि' या नांवानें लोकामध्यें प्रसिद्ध असलेला प्रवाहिका हा व्याधे घ्यावा असें भावप्रकाशकाच्या, चोखंबामालेंतून प्रसिद्ध झालेल्या हिंदी पुस्तकांत म्हटलें आहे. वैद्यराज गु. नानलांच्या भाषांतरित आवृत्तीमध्यें अतिसारांत शेवटीं शेवटीं शौचाला केवळ पाणी तेवढे थोडें थोडें पडतें. मल मुळीच नसतो. अशी जी स्थिति उत्पन्न होते ती निस्सारक शब्दानें घ्यावयास सांगितली आहे. भावप्रकाशानें या पुढेंच प्रवाहिकेचा स्वतंत्र उल्लेख लक्षण चिकित्सेसह केला असल्यामुळें कै. गुरुवर्य नानलांचें म्हणणेंच अधिक स्वीकार्य आहे असें आम्हास वाटतें.

व्याधिमुक्त लक्षणें
यस्सोच्चारं विना मूत्रं सम्यग्वायुश्च गच्छति ।
दीप्ताग्नेर्लघुकोष्ठस्य स्थितस्तस्योदरामय: ॥
वातविष्टम्भादुदावर्ताद्वा मलाप्रवृत्तावतीसारनिवृत्तिरिति
शड्कानिरासार्थमतीसारनिवृत्तिलक्षणमाह - यत्स्येत्यादि ।
उच्चारं विना यस्य मूत्रं प्रवर्तते, सम्यगिति‍ सम्यक्प्रवृत्त्या
न हीनयोगेनेत्यर्थ: ।
वायुश्च गच्छति, गुदेनेति शेष: । स्थितो निवृत्तिं गत: ।
उदरामयोऽतिसार: प्रकरणात् । एतेन संप्राप्तिभड्ग उक्त: ।
अतिसारे हि संप्राप्तिरियं यन्मात्रोचितोऽपि द्रवधातुर्गुदेनैव
प्रवर्तते, सर्वस्यैवाब्धातोर्गुदप्रवृत्तत्वात्, यदा तु मूत्रमार्गेण
प्रवर्तते, तदाऽपि पुरीषप्रवृत्तिसमकालमिति ।
मा.नि. अतिसार २३ पान ८० म. टीकेसह

मूत्रप्रवृत्ति, मलप्रवृत्ति व अधोवातप्रवृत्ति, वेगवेगळी. स्वतंत्रपणें व प्रकृत होणें, अग्नि प्रदीप्त होणें, कोष्ठामध्यें हलकें मोकळें वाटणें अशी लक्षणें अतिसार व्याधि नाहींसा झाल्यावेळीं असतात.

उपद्रव
उपद्रुतमतिसारोपद्रवै: शोथादिभिर्युक्तम् ।
यदुक्तं, - `शोथं शूलं ज्वरं तृष्णां श्वासं कासमरोचकम् ।
छर्दि मूर्च्छा च हिक्कां च दृट्‍वाऽतीसारिणं त्यजेत् ।
मा.नि. अतिसार १९ म. टीका पान ७८

तृष्णा दाहोऽरुचि: शोथ: पार्श्वशूलोऽरतिर्वमि: ।
गुदपाक: प्रलापश्च ह्याध्मानं श्वासकासकौ ।
मूर्च्छा हिक्का मद: शूलं बहुवेगो ज्वरस्तथा
एतैरुपद्रवैर्जुष्टमतिसारिणमुपत्सृजेत् ।
मा.नि. आ. टीका - पान ७९

अतिसाराचे उपद्रव हे असाध्यता सांगत असतांना आलेले आहेत. ते असे शोथ, शूल, ज्वर, तृष्णा, श्वास, कास, अरोचक, छर्दी, मूर्च्छा, हिक्का, मद, पार्श्वशूल, अरति, प्रलाप, आध्मान.

उदर्क
अर्श, ग्रहणी, गुदभ्रंश, परिकर्तिका अग्निमांद्य.

अर्शोतिसारग्रहणीविकारा:
प्रायेण चान्योन्यनिदानभूता: ।
वा.चि. ८-१६४ पान ६५५

अर्श, ग्रहणी हे व्याधी अतिसाराचा परिणाम म्हणून होतात.

पक्वजाम्बवसंकाशं यकृत्खण्डनिभं तनु ।
घृततैलवसामज्जवेशवारपयोदधि - ॥
मांसधावनतोयामं कृष्णं नीलावरुणप्रभम् ।
मेचकं स्निग्धकर्बूरं चन्द्रकोपगतं धनम् ।
कुणपं मस्तुलुड्गाभं सुगन्धि कुथितं बहु ॥
तृष्णादाहतम:श्वासहिक्कापार्श्वास्थिशूलिनम् ॥
संमूर्च्छारतिसंमोहयुक्तं पक्ववलीगुदम् ।
प्रलापयुक्तं च भिषग्वर्जयेदतिसारिणम् ॥
अंसवृतगुदं क्षीणं दूराध्मातमुपद्रुतम् ।
गुदे पक्वे गतोष्माणमतिसारकीणं त्यजेत् ॥
श्वासशूलपिपासार्त क्षीणं ज्वरनिपीडितम् ।
विशेषेण नरं वृद्धमतीसारो विनाशयेत् ॥

असाध्यलक्षणान्याह - पक्वेत्यादि । पक्वजाम्बवंसकाशं पक्वजम्बू
फलसदृशवर्ण स्निग्धकृष्णमित्यर्थ: ।
यकृत्खण्डनिभं कृष्णलोहितम् । तनुस्वच्छम् ।
घृतादीनां मांसधावनतोयान्तानोमिवाभा: प्रतिभासो यस्य तत्तथा ।
वेशवारो ``निरस्थिपिशितं पिष्टं-'' इत्यादिपरिभाषितमांसप्रकार: ।
कृष्णमञ्चनप्रख्यम् । एतच्च कृष्णत्वादिकं पित्तातिसारवर्जबोद्धव्यं,
तत्र रुपत्वेन पठितत्वात् ।
नीलारुणं चाषपक्ष वर्णम् । मेचकं मर्दनाञ्जनपिण्डवदीषकृष्णरुक्षम् ।
कर्बूरं नानावर्ण, तत् स्निग्धं स्नेहद्रवधातुयोगात् ।
चन्द्रकोपगतं मयूरपिच्छचन्द्रकैरिव धातुस्नेहैरुपगतम् ।
उक्तं हि करवीराचार्येण - ``चन्द्रकै: शिखिपिच्छाभैर्निलपीत्तादिराजिभि:
आवृतं वेशवाराम्बुमज्जक्षीरोपमं त्यजेत्'' - इति ।
तदेवं धनं धात्वन्तरव्यामिश्रत्वात् कुणपं शवदुर्गन्धि ।
मस्तुलुड्गाभं मस्तुलुड्ग मस्तकाभ्यन्तरस्नेह: घृतकेति ख्यातं, तत्सदृशम् ।
कुथितं पूति । तृष्णेत्यादि । तृष्णादीनां पार्श्वास्थिशूलान्तानां द्वंद्वं कृत्वा
मत्वर्थीय इति: तृष्णादियुक्तमित्यर्थ: अन्न संमूर्च्छा मनोमोह:
संमोह: इन्द्रिमोह इत्यपौनरुक्त्यम‍ । चकाराच्चरकोक्त: सह-
सोपरतातीसारश्वासासाध्यो बोद्धव्य: पक्ववलीगुदं पक्वा
वलयो गुदे यस्त तं पक्ववलीगुदम् । असंवृतगुदं गुदसं बरणाक्षमम् ।
तमेव क्षीणं बलोपचयरहितम् । दूराध्मातं भृशमाध्मानयुक्तं,
तस्य विरेकसाध्यत्वेनातिसारविरुद्धोपक्रमत्वात्; दुरात्मानमिति पाठान्तरै
दुष्टान्त:करणं, अजितेन्द्रि यमिति जेज्जट: उपद्रतमतिसारोपद्रवैं शोथादिभिर्युक्तम् ।
यदुक्तं, ``शोथं शूलं ज्वरं तृष्णां श्वासं कासमरोचकम् ।
छर्दि मूर्च्छा च हिक्कांच दृष्टाऽतीसारिणं त्यजेत्'' - इति ।
गुदे पक्वे गतोष्माणामिति गुदे पाकारम्भकपित्ते वर्तमानेऽपि
गतोष्माणं शीतगात्रं नष्टाग्निं वा । अतिसारकिणं अतिसारयुक्तम् ।
``वातातीसाराभ्यां कुक्च (पा.अ.अ. ५ पा २ सू. १२९) इति कुक्,
चादिनि: ।
विशेषेणेंति वचनादुबालस्याप्यसाध्यत्वं बोधयति ।
यदाह सुश्रुतश्चिकित्सायां ``कृच्छ्रश्चायं बालवृद्धेश्वसाध्य:''
(सु.उ.त.अ. ४०) इति । एतच्चाबलत्वे सति बोद्धव्यम् ।
मा.नि. अतिसार १४ ते १९ म. टीकेसह पान ७७, ७८

पक्वशोणिताभं, मेद, क्षीराभं, उदकमिवाच्छं, हरित,
नील कषाय वर्ण, आविलं, पिच्छिलं तंतूमत्, आमं, मत्स्या-
मगंधी, मक्षिकाक्रांत, बहुधातुस्त्राव, अल्पापुरीषं, अपुरीषं,
पतितगुदवलि क्षीणबलमांसशोणित, सर्व पर्वास्थिशूलिनं
सहसोपरतविकारं, अतिसारिणं अचिकित्सं विद्यात् ।

मल प्रवृत्तीचा वर्ण वा स्वरुप पिललेलें जांभूळ, यकृत तूप, तेल, वसा, मज्जा, दूध, दही, मांस, धुतलेलें पाणी, शिजवलेलें मांस, मस्तुलुंग यांच्याप्रमाणें असेल, तसेंच मलप्रवृत्तीमध्यें हिरवा, निळा, भगवा, करडा, काळा, तांबडा, काजळासारखा वा मोरपंखाप्रमाणें चित्रविचित्र असे रंग दिसतील, मलप्रवृत्ति पाण्याप्रमाणें निर्मळ असेल किंवा चिकट गढूळ, तंतुयुक्त असेल, मलप्रवृत्तीला प्रेतासारखी. माशासारखी, आंबलेली, कुबट, कुचकट अशी दुर्गंधी येत असेल, मलावर माशा घोंगावत असतील, अतिसाराची प्रवृत्ति अल्पपुरीषयुक्त वा पुरीषहीन असेल, रुग्ण श्वास, शूल, तृष्णा, दाह, हिक्का, पार्श्वशूल, अस्थिशूल, अरति मूर्च्छा, प्रलाप आध्मान या लक्षणांनीं पीडित असेल, गुदाची संकुचित होण्याची शक्ति नाहींशी झाली असेल, रोग्याचें मांस व बल क्षीण झालें असेल, गुदपाक झाला असेल, अंग गार पडलें असेल रोगी, बाल वा वृद्ध असेल तर व्याधी असाध्य होतो. या ठिकाणीं उल्लेखिलेलीं सर्वच लक्षणें अतिशय गंभीर स्वरुपाचीं आहेत. यांतील ५-६ लक्षणें एकत्र असलीं तरी सुद्धां व्याधी असाध्य होतो. या सर्व लक्षणांमध्यें मलाचा नील कृष्ण वर्ण, शववत्दुर्गंधि, छर्दि, ज्वर, शोथ, श्वास बलक्षय व गुदपाक हीं लक्षणें असाध्यतेंत विशेष महत्त्वाचीं आहेत. चरकान अतिसारामध्यें दिसणारीं लक्षणें एकाएकीं नाहींशीं झालीं तरी तेंहि असाध्यतेचें लक्षण म्हणून सांगितलें आहे. तरूणांमध्यें व्याधि सामान्यत: कष्टसाध्य असला तरी धातूंची दुष्टि अधिक झाली असेल तर तेथेंहि व्याधि असाध्य होतो.

रिष्ट लक्षणें
असाध्य लक्षणें म्हणून जीं लक्षणें वर वर्णन केलीं आहेत तींच रिष्ट लक्षणें म्हणून वाग्भटानें सांगितलीं आहेत.

हस्तपादाड्गुले: संधिप्रपाको मूत्रनिग्रह: ।
पुरीषस्योष्णता चैव मरणायातिसारिणाम् ।
मा.नि. अतिसार ११ आ. टीका. पान ७९

आतंक - दर्पणकारानें हातापायांच्या बोटांचीं पेरीं लाल होणें, दाहयुक्त होणें, मूत्राघात होणें आणि मलप्रवृत्ति उष्ण असणें हीं लक्षणें मरणख्यापक म्हणून सांगितलीं आहेत.

चिकित्सा सुत्रें
दोषा: सन्निचिता यस्य विदग्धाहारमूर्च्छिता: ।
अतीसाराय कल्पन्ते भूयस्तान् संप्रवर्तयेत् ॥
न तु संग्रहणं देयं पूर्वमामातिसारिणे ।
विबध्यमाना: प्राग्दोषा जनयन्त्यामयान् बहून् ॥
दण्डकालसकाध्मानग्रहण्यर्शोगदांस्तथा ।
शोथपाण्ड्‍वामयप्लीहकुष्ठगुल्मोदरज्वरान् ।
तस्मादुपेक्षेतोक्लिष्टान् वर्तमानान् स्वयं मलान् ।
कृच्छ्रं वा वहतां दद्यादभयां संप्रवर्तिनीम् ॥
तया प्रवाहिते दोषे प्रशाम्यत्युदरामय: ।
जायते देहलघुता जठराग्निश्च वर्धते ।
प्रमथ्यां मध्यदोषाणां दद्याद्दीपनपाचनीम् ।
लड्घनं चाल्पदोषाणां प्रशस्तमतिसारिणाम् ॥
च.चि. १९-१८ ते २३ पान १२७२-७ इ.

संचित झालेलें दोष आणि त्यांच्यासवें मिसळलेला, अन्न विदग्ध होऊन बनलेला आमरस हा अतिसाराच्या निमित्तानें स्वभावत: बाहेर पडून जात असतांना अतिसाराच्या आमावस्थेंत तरी प्रारंभी कांहीं काळ ग्राही, (स्तंभन,) अशा गुणांचीं औषधें वापरु नयेत. आमस्वरुपांत असले दोष जर शरीरामध्यें तसेंच सांचून राहिले तर दंडालसक, आध्मान, ग्रहणी, अर्श, शोथ, पांडु, प्लीहावृद्धि, कुष्ठ, गुल्म, उदर, ज्वर असे अनेक व्याधी त्यामुळें उत्पन्न होतात. यासाठीं स्वभावत: बाहेर पडणार्‍या या मलरुप दोषांची प्रथमत: उपेक्षाच करावी, त्यांना तसेंच बाहेर जाऊं द्यावें. बाहेर जाणें थांबवू नये इतकेंच नव्हें तर मलाप्रवृत्ति जर अडखळत होत असेल तर ती स्वच्छ मोकळी होण्यासाठीं हरीतकी अनुलोमनाकरितां वापरावी. या अनुलोमनामुळें दोष निघून गेले म्हणजे अतिसारव्याधि लवकर बरा होण्यास मदत होते. दोषशोधनामुळें शरीर हलकें होतें, अग्नीचें बल वाढूं लागतें. या शोधनानंतर दोष फार थोडें उरले असतील तर रुग्णास लंघन द्यावें. आणि दोषांचें प्रमाण मध्यम असल्यास दीपन पाचन गुणांनीं युक्त अशा द्रव्यांचे काढे द्यावे. अतिसाराच्या आमावस्थेंत हारीतकीसारख्या द्रव्यानें अनुलोमन करावयास सांगितलें असलें तरी चिकित्सकानें या प्रसंगीं अत्यंत सावध राहिले पाहिजे अतिसार हा आशुकारी व्याधी असल्यामुळें रुग्णाचें बलाबल लक्षांत घेण्यांत थोडीशी जरी चूक झाली तरी त्यामुळें त्याच्या जीवास धोका पोहोंचण्याची शक्यता असते. कोष्ठ प्रक्षुब्ध होऊन अप्‍ धातू बहिर्मुख झालेला असतो अशा स्थितींत कोष्ठाचा क्षोभ वाढविणारी सर गुणाची द्रव्यें देणें अंगलट येण्याची शक्यता असते. यासाठीं विचारपूर्वक दक्षतेनें शोधनोपचार करावा. चूक झालीच तर ती स्तंभनाकडून व्हावी.

युक्तेऽन्नकाले क्षुत्क्षामं लघून्यन्नानि भोजयेत् ।
तथा स शीघ्रमाप्नोति रुचिमग्निबलं बलम् ॥
तक्रेणावन्तिसोमेन यवाग्वा तर्पणेन वा ।
सुरया मधुना चादौ यथासात्म्यमुपाचरेत् ॥
च.चि. १९-२७,२८ पान १२७४

दोषांचें पाचन चांगलें झाल्यानंतर योग्य अशा कालीं (मलप्रवृत्तीचे प्रमाण आटोक्यांत आल्यानंतर) भुकेलेल्या रुग्णाला लघु अन्न द्यावें. ताक, कांजी, यवागू, आसवारिष्ट, मध यांचा रुची व सात्म्य पाहून उपयोग करावा.

आमपक्वक्रमं हित्वा नातिसारे क्रिया यत: ।
अत: सर्वेऽतिसारास्तु ज्ञेया: पक्वामलक्षणै: ॥
सु.उ. २४

तत्रादौ लंघन कार्यमतिसारेषु देहिनाम् ।
तत: पाचनसंयुक्तो यवाग्वादिक्रमो हित: ॥
सु.उ. ४०-४५

योऽतिद्रवं प्रभूतं च पुरीषमतिसार्यते ।
तस्यादौ वमनं कुर्यात् पश्चाल्लंघनपाचनम् ।
सु.उ. ४०-३२

स्तोकं स्तोकं विबद्धं वा सशूलं योऽतिसार्यते ।
अभयापिप्पलीकल्कै: सुखोष्णैस्तं विरेचयेत् ॥
सु.उ. ४०-३३

कार्यं च वमनस्यान्ते प्रद्रवं लघुभोजनम् ।
खडयूषयवागूषु पिप्पल्याद्यं च योजयेत् ॥
सु.उ. ४०-२७ पान ६९८-६९९

अतिसाराच्या सर्व प्रकारामध्येंहि सामान्य स्वरुपाच्या अशा दोनच अवस्था असतात. एक आमावस्था व दुसरी पक्वावस्था. अतिसाराची चिकित्सा करतांना या दोन्ही अवस्थांचा विचार करावा लागतो. आमावस्थेमध्यें शोधन पाचन या उपचारांचा उपयोग करावयाचा असतो तर पक्वावस्थेमध्यें दीपन, ग्राही औषधें वापरावीं लागतात. मलप्रवृत्ति अधिक प्रमाणांत फार द्रव अशी होत असेल तर रुग्णास प्रथम वमन करवावें व नंतर लंघन-पाचन उपचार अवलंबावे. मलप्रवृत्ति थोडी अडखळत शूलयुक्त अशी होत असल्यास हारितकी व पिंपळी यांचें चूर्ण गरम पाण्यांतून देऊन अनुलोमन करवावें. वमन विरेचनानंतर दोश शोधन झालेल्या स्थितींत अगदीं द्रव व लघु भोजन द्यावें. त्यासाठीं तक्र, यूष, यवागू असे पदार्थ औषधि द्रव्यांनीं वा अम्ल रसाने संस्कृत करुन द्यावेत.

यदा पक्वोऽप्यतीसार: सरत्येव मुहुर्मुहु: ।
ग्रहण्या मार्दवाज्जन्तोस्तत्र संस्तम्भंन हितम् ॥
सु.उ. ४०-६८

निरामरुपं शूलार्त लंघनाद्यैश्च कर्षितम् ।
नरं रुक्षमवेक्ष्याग्निं सक्षारं पाययेद्‍घृतम् ॥
सु.उ. ४०-७५ पान ७०१

अतिसाराच्या पक्वावस्थेमध्यें वरचेवर मलप्रवृत्ती होत असतांना ग्रहणी दुर्बल झाली असल्यामुळें ही अवस्था उत्पन्न झाली आहे असें समजून स्तंभन ग्राही अशीं द्रव्यें वापरावींत. अतिसाराला निरामता प्राप्त झाल्यानंतर जर लंघनादीनि कृश झाल्यामुळें शूल हें लक्षण दिसत असेल तर अग्नीचें बलाबल पाहून क्षार व घृत यांचा उपयोग करावा.

संपक्वे बहुदोषे च विबन्धे मूत्रशोधनै: ।
कार्यमास्थापनं क्षिप्रं तथा चैवानुवासनम् ।
सु.उ. ४०-१०७

प्रवाहणे गुदभ्रंशे मूत्राघाते कटिग्रहे ।
मधुराम्लै: शृतं तैलं सर्पिर्वा‍प्यनुवासनम् ॥
सु.उ. ४०-१०८

गुदपाकस्तु पित्तेन यस्य स्यादहिताशिन: ।
तस्य पित्तहरा: सेकास्तत्सिद्धाश्चानुवासना: ॥
सु.उ. ४०-१०९

अल्पाल्पं बहुशो रक्तं सरुम्य उपवेश्यते ।
यदा वायुर्विबद्धश्च पिच्छाबस्तिस्तदा हित: ॥
सु.उ. ४०-१११

प्रायेण गुददौर्बल्यं दीर्घकालातिसारिणाम् ।
भवेत्तस्माद्धितं तेषां गुदे तैलवचारणम् ॥
सु.उ. ४०-११२ पान ७०४

पक्वावस्थेमध्यें दोष अधिक असून विबंध असेल (मूत्र वात यांचा विशेषत:) तर तृणपंचमूलासारख्या औषधांचा बस्ती द्यावा. प्रवाहण, गुदभ्रंश, मूत्राघात, कटिग्रह या अवस्थेमध्यें मधुर, अम्ल द्रव्यांनीं सिद्ध केलेलें तेल वा तूप अनुवासनासाठीं वापरावें. गुदपाक हें लक्षण असेल तर पित्तहर द्रव्यांनीं सिद्ध केलेल्या काढयानें वा क्षीरानें परिषेक करावा किंवा पित्तहर अशा सिद्धघृतानें अनुवासन द्यावें. मलप्रवृत्ति थोडी थोडी पुष्कळ वेळां सशूल व सरक्त होत असल्यास वायू अवरुद्ध आहे ( व दोष स्त्यान आहेत) असें जाणून पिच्छा बस्ती वापरावा. अतिसार हें लक्षण दीर्घकाल टिकून राहिल्यास गुद या अवयवास दुर्बलता येते. त्यामुळें गुदवलीभ्रंश वा गुद उघडें राहणें (गुद मार्ग संकुचित न होणें) हीं लक्षणें उत्पन्न होण्याची भीति असते. यासाठीं पिचु, सेक, अनुवासन या रीतीनें तैलाचा उपचार करावा. गुददाह असल्यास तूप वापरावें.

प्रवेशयेद्‍गुदं ध्वस्तमभ्यक्तं स्वेदितं मृदु ।
कुर्याच्च गोफणाबन्धं मध्यच्छिद्रेण चर्मणा ॥
वा.चि. ९-५२ पान ६५९

गुद भ्रंश झाला असेल तर बाहेर आलेला गुदाचा भाग स्नेह स्वेदानें मृदु करून आंत ढकलावा व नंतर मध्यें छिद्र असेल असा गोफणा बंध बांधावा.

तस्माकार्य: परीहारस्त्वतीसारे विरिक्तवत् ।
यावन्न प्रकृतिस्थ: स्याद्दोषत: प्राणस्तथा ॥
सु.उ. ४०-१६८ पान ७०९

अतिसार गेल्यानंतर अग्निमंद स्थितींत अहितकर आहार घेतलां गेला असताना विशेष स्वरुपाचें अग्निमांद्य होतें आणि त्यामुळें ग्रहणी अवयव दुष्ट होण्याची शक्यता असते. यासाठी पंचकमोंक्त विरेचन केलेल्या व्यक्तीवर ज़सें नियंत्रण ठेवून संसर्जनादि क्रम केले जातात त्याप्रमाणें अतिसार झालेल्या रुग्णासहि उपचारावें. त्याचा अग्नि पुन्हां पहिल्यासारखा झाला आहे. बल प्राप्त झालें आहे व इतर सर्व भाग प्रकृतीस योग्या असे मूळच्या स्वभावाप्रमाणें झालेले आहेत असें प्रत्ययास येईपर्यंत उपचार केलें पाहिजेत. अत्यंत लघु अशा आहारापासून क्रमाक्रमानें आहार वाढवीत नेऊन सावकाशपणें नेहमींच्या आहारावर आलें पाहिजे.

वायोरतन्तरं पित्तं पित्तस्यानन्तरं कफम् ।
जयेत्पूर्वं त्रयाणां वा भवेद्यो बलवत्तम: ॥
वा.चि. ९-१२२ पान ६६५

अतिसारामध्यें प्रथम वायूचें. नंतर पित्ताचें व त्यानंतर कफाचें शमन करावें अथवा जो बलवान् असेल त्याची चिकित्सा प्रथम करावी.

कल्प
कुडा, शुंठी, मल्लातक, चित्रक, खदिर, वटक्षीर, बिल्व, चिंचाबीज, जातीफल, भांग, अहिफेन, लोहभस्म, शंख, कपर्दिक शंखोदर, जातिफलादिचूर्ण, संजीवनी, भल्लातकचिंचावटी वृद्धगंगाधरचूर्ण, लोहपर्पटी, कुटजारिष्ट, पंचकोलासव.

अन्न
लाजमंड, लिंबूपानक, मुद्गमूष, यवागू, दाडिमस्वरस, नारीकेलजल

विहार
विश्रांती.

अपथ्य
गुरु, स्निग्ध, मधुर, अति द्रव आहार अध्यशन वर्ज्य. व्यायाम, जागरण, स्वेद वर्ज्य.

N/A

References : N/A
Last Updated : July 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP