उदकवहस्त्रोतस् - विषूचिका

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या

सूचीभिरिव गात्राणि तुदन् संतिष्टतेऽनिल: ।
यस्याजीर्णेन सा वैद्यैरुच्यतेति विसूचिका ॥
विसूच्या निरुक्तिमाह - सूचीभिरित्यादि । वैद्यै:आद्यैरित्यर्थ: ।
उच्यते ति `वर्णागम' इत्यादिना इकारलोपात् साधु: ।
`तुदन्' इत्यत्र `भिन्दन्' इति केचित् पठन्ति ।
यदत्र विसूच्यादीनां प्राग्रूपं न भणितं तद्रूपाण्येवाल्पान्यासां
प्राग्रूपं, न तु प्राग्रूपान्तरमस्तीति बोधयति ।
सटीक सु.उ. ५६-४ पान ७८१

अजीर्णानें प्रकुपित झालेला वायु शरीरामध्यें सुया टोंचल्यासारख्या वेदना उत्पन्न करतो म्हणून विसूचि हें नांव प्राप्त झालें आहे.

स्वभाव
दारुण आशुकारी.

मार्ग
अभ्यंतर मार्ग.

प्रकार
कांहीं ग्रंथकार उर्ध्वग व अधोग असे विसूचिकेचे दोन प्रकार मानतात. त्यापेक्षां सान्निपातिक स्वरुपाची एकच विसूचिका मानणें इष्ट होय.

हेतु, संप्राप्ति
अजीर्णमामं विष्टब्धं विदग्धं च यदीरितम् ।
विसूच्यलसकौ तस्माद्‍भवेच्चापि विलम्बिका ॥
विसूच्यादीनां कारणमाह - अजीरणमाममित्यादि ।
यदीरितमिति `अन्नपानविधौ' इति शेष: । तस्मात् अजीर्णात् ।
यदत्र चतुर्थाजीर्णस्य रसशेषस्योपादानं न कृतं तदपरिणाम-
मात्रत्वेन तस्य विसूच्यारम्भकत्वाभावादेकीयमतत्वेनोक्तत्वाच्च ।
विसूच्यलसकाभ्यांद्विलम्बिकाया: पृथग्विभक्तिनिर्देश: कृत: ततस्या
असाध्यत्वावबोधनार्थम्, इतरयोश्च प्राय: कृच्छ्रसाध्यत्वबोधनार्थम् ।
सटिक सु.उ. ५६-३ पान ७८१

अजीर्णसंभवत्वाद्विसूच्यादीनामजीर्णानन्तरं विसूच्यादीनाह अजीर्णामित्यादि ।
`आ मविष्टब्धविदग्धेषु त्रिषु विसूच्यलसकविलम्बिका यथसंख्यं भवन्ति'
इति कार्तिककुण्ड: । `तत्र-' - इति बकुलकर: ।
यथासंख्ये हि विलम्बिका विदग्धात् प्राप्नोति, तां च कफवाताभ्यां
पठिष्यति, तस्मात्रिविधाजीर्णाद्यथासंभवं विसूच्यादीनामुत्पाद इति युक्तम् ।
उक्तं हि `अजीर्णात्पवनादीनां विभ्रमो बलवान् भवेत्' इति ।
मा.नि. अन्गिमांद्य - १५ म. टीका पान १०४

न तां परिमिताहारा लभन्ते विदितागमा: ।
मूढास्तामजितात्मानो लभन्ते कलुषाशया: ॥
इदानीमजीर्णपरिवर्जने यत्नातिशय: कार्य इति प्रतिपादनार्थ
माह-न तामित्यादि ।
परिमिताहारा अनिषिद्धाशनं भुञ्जाना: । विदितागमा ज्ञातभोजनोपदेशा: ।
मूढा: पशुतुल्या: सेव्यासेव्याहारानभिज्ञा इत्यर्थ: ।
अजितात्मान: अजितेन्द्रिया: । कलुषाशया: प्रदुष्टामाशया:, आमाशय-
दुष्टिश्च दुष्टान्नसंपर्काद्वातादिकोपाच्च; केचित् `अशनलोलुपा:' इति पठन्ति ।
सटिक सू.उ. ५६-५ पान ७८१

ज्यांना खाण्यापिण्यांतील शास्त्रशुद्ध नियम माहिती नाहींत असें, जिभेवर व मनावर नियंत्रण नसलेले लोक काय खावें, किती खावें याचा विचार न करतां यथेच्छ चरतात त्यांना आणि ज्यांच्या खाण्यामध्यें दुष्ट झालेलें अन्नपान येतें त्यांना आमाजीर्ण उत्पन्न होऊन ते विसूचिका रोग निर्माण करतें.

कांहीं ग्रंथकारांनीं आमाज़ीर्णानें विसूचिका रोग निर्माण करतें. कांहीं ग्रंथकारांनीं आमाजीर्णानें विसूचिका विष्टब्धाजीर्णानें अलसक आणि विदग्धाजीर्णनें विलंबिका होते असें सुचविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या विधानावर कांहीं दोष येतात. विलंबिका वातकफानें उत्पन्न होणारी असून, विदग्धाजीर्ण हें पित्तकर असल्याचें सांगितलें आहे. त्यामुळें त्याचा परस्पर संबंध लावणें कठिण जाईल. यासाठीं दोषदूष्यभेदानुरुप अजीर्णाच्या कोणत्याहि प्रकारामुळें स्थानवैगुण्य असेल त्याप्रमाणें कोणताहि रोग उत्पन्न होईल असेंच मानणें बरें, असें उत्तर कांहीं टीकाकार देतात. आम्हांला स्वत:ला आमाजीर्ण व विसूचिका यांचा संबंध मानणें इष्ट आहे असें वाटतें. अजीर्णाने व दुष्टान्नानें तीनहि दोषांचा प्रकोप होतो. आमामुळें दोषांना सामता येते. आम हे विषवत् व शल्यरुप द्रव्य असल्यानें सर्व अन्नवह स्त्रोतस् प्रक्षुब्ध होऊन विसूचिका उत्पन्न होते. अतिसार हें याचें प्रधान लक्षण असल्यानें सर्व शरीरांतील अप्‍धातूची दुष्टी या व्याधींतहि असते. हें ओघानेंच गृहीत धरावें लागतें, विसूचिकेचा उद्‍भव आमदोषामुळें होतो. अधिष्ठान महास्त्रोतसांत असतें व उदकवहस्त्रोतस हें व्याधीचें संचार क्षेत्र आहे.

पूर्वरुपें
विषूचिकेचीं रुपें हीच अल्प प्रमाणांत पूर्वरुपांत असतात. (सु.उ. ५६-४ टीका)

रुपें
मूर्च्छाऽतिसारो वमुथ: पिपासा शूलो भ्रमोद्वेष्टनजृम्भदाहा: ।
वैवर्ण्यकम्पौ हृदये रुजश्च भवन्ति तस्यां शिरसश्च भेद: ॥
विसूच्या लक्षणमाह - मूर्च्छेत्यादि । वमुथुर्वान्ति: ।
शिरसश्च भेद: शिर:शूलम् : अत्र वमनातीसारौ मिलितौ लक्षण-
मिति:, सुश्रुते त्वधोगाया आमातीसारेण ग्रहणं, ऊर्ध्वमायाश्च छर्द्या ।
चरके तु पठ्यते `ऊर्ध्व चाधश्च प्रवृत्तामदोषां यथोक्तरुपां विसूचीं विद्यात्'
(च.चि. स्था.अ.२)
इति । अत उर्ध्वगा विसूची भवति, तथाऽधोगाऽपि, चरके
आमातीसारस्यापठितत्वात् चकारादुभयमार्गगाऽपीति
व्याचक्षते, उर्ध्वगायाश्चापक्वाहारवमनेन त्रिदोषजच्छर्दिभ्यो
भेद इति मन्तव्यम् ।
मा.नि. अग्निमांद्य - १८ म. टीका १०५

मूर्च्छा, अतिसार, छर्दी, तृष्णा, शूल, भ्रम, पिंडिकोद्वेष्ट, जृंभा दाहविवर्णता, कंप, हृदयवेदना आणि शिर:शूल (गात्र शीतता) अशीं लक्षणें विसूचिकेमध्यें असतात. वाग्भटानें विसूचिकेचें दोषभेदानें लक्षणविशेष वर्णिलेले आहेत.

तत्र शूलभ्रमानाहकम्पस्तम्भादयोऽनिलात् ।
पित्ताज्वरातिसारान्तर्दाहतृट्‍प्रलयादय: ॥
कफाच्छर्द्यड्गगुरुतावाक्सड्गष्टीवनादय: ।
विसूचिकालक्षणमाह - तत्रेति । तत्र विसूचिकायाम‍ ।
अनिलात् शूलादयो भवन्ति । पित्तात् ज्वरादय: ।
कफात् छर्द्यादय: । अन्तर्दाह: कोष्ठदाह: । प्रलयो-मूर्छा ।
अड्गग्रहणं - सर्वाड्गगौरवार्थम् । वाक्सड्गो-वाच:स्खलनम् ।
ष्टीवनश्लेष्मनि:सरणम् ।
अनिलादिग्रहणमनिलादिकृतसमस्तविकार प्रात्यर्थम् ।
अत एवा दिशब्द: प्रयुक्त: । शूलादिग्रहणं त मन्दबुद्धिप्रबोधनार्थम् ।
एतेन त्रैविध्यशड्काऽप्यपास्ता । सुश्रुतोऽपि मूर्च्छादीन्यभेदेनाह
(उ.अ. ५६/६)
मूर्च्छातिसारौ वमथु: पिपासा शूलभ्रमोद्वेष्टनजृम्भदाहा: ।
वैवर्ण्यकम्पौ हृदये रुजश्च भवन्ति तस्यां शिरसश्च भेद: । इति ।
वा.सू. ८-९ आ. टीकेसह पान १४९

या सूत्रावरुन वातज, पित्तज, कफज, असे विसूचिकेचे प्रकार वाग्भटास अभिप्रेत असावेत असें वाटतें. अरुणदत्तानें त्यासारखे वर्णनहि केलें आहे. परंतु हेमाद्रीनें आपल्या टीकेंत या मताचें स्पष्ट खंडन केलें असून विसूचिका हीं सुश्रुतादींच्या मताप्रमाणें सान्निपातिकच आहे असें म्हटलें आहे. तीनहि दोषांचीं लक्षणें प्रकट होत असलीं तरी कोणत्या दोषांनी कोणतीं लक्षणें उत्पन्न होतात, तें स्पष्ट करण्याचा वाग्भटाचा हेतू असावा असें त्यानें म्हटलें आहे. सुश्रुताच्या वर्णनाच्या एकूण रोखावरुन व त्यानें सांगितलेल्या विसूचिकेच्या लक्षणावरुन त्यास सामान्यत: सान्निपातिक विसूचिकाच अभिप्रेत असली तरी चिकित्सेंतील वर्णनावरुन वातज, पित्तज, कफज, व ऊर्ध्वग, अधोग असे अवस्थानुरुप होणारे भेद त्यास सम्मत असावेत असें दिसतें. कारण उत्तर तंत्र ५६-१२ या श्लोकामध्यें तीक्ष्ण व वमन व विरेचन असे उपचार विसूचिकेचे सांगितले आहेत आणि पुढें १३ व्या श्लोकांत अशा शोधनांनीं देह विशुद्ध झाल्यानंतर मूर्च्छातिसारादि लक्षणें शांत होतात असें सांगितलें आहे. विषासारखी मारक असणारी अतिसार व छर्दी ज्या व्याधींत तीव्र वेगानें होते आहे अशी, अरति, वैवर्ण्य, अभ्यंतरयातनेत्रता ही रुपें ज्या व्याधींत फार थोडया काळांत प्रगट होतात, असा एकच विसूचिका नांवाचा व्याधी जर सुश्रुतास अभिप्रेत असतां तर वमन विरेचनांचा उल्लेख उपचार म्हणून मुळींच झाला नसतां. तेव्हां ऊर्ध्वग विरेचनसाध्य व अधोग वमनसाध्य आणि उभयगामी लंघनपाचनसाध्य असे तीन प्रकार सुश्रुताच्या डोळ्यापुढें असावेत. स्पष्ट स्वरुपांत वर्गीकरण करावयाचे ठरविल्यास यांतील पहिल दोन प्रकार आमाजीर्णाशीं लक्षण रुपानें संबद्ध मानावेत व तिसरा प्रकार विसूचिका या नांवानें स्वतंत्र व्याधी म्हणून उल्लेखावा. उपद्रव व लक्षणें यांचें माधवनिदानोक्त वर्णन पाहतां आम्हास हेंच मत ग्राह्य दिसते. हा व्याधी अत्यंत गुणकारी असल्यामुळें वृद्धि, स्थान, क्षय यांतील अवस्थाभेद स्पष्टपणें सांगतां येणार नाहींत.

उपद्रव
निद्रानाशोऽरति: कम्पो मूत्राघातो विसंज्ञता ।
अमी ह्युपद्रवा घोरा विसूच्यां पञ्च दारुणा: ॥
मा. नि. अग्निमांद्य २५ पान १०८

निद्रानाश, अरति, कंप, मुत्राघात, मूर्च्छा हे विसूचिकेचे उपद्रव आहेत. हे उपद्रव उत्पन्न झाले असतां व्याधीचें स्वरुप भयंकर बनतें.

उदर्क
रसक्षय, मृत्यु.

साध्यासाध्यत्व व रिष्ट लक्षणें
मूर्च्छादि लक्षणांचें स्वरुप सौम्य असेल, छर्दी मूत्राघात अधिक प्रमाणांत नसतील, रसक्षय झाला नसेल तर व्याधी कष्ट साध्य असतो.

य: श्यावदन्तौष्ठनखोऽल्पसंज्ञो वम्यर्दितोऽभ्यन्तरयातनेत्र: ।
क्षामस्वर: सर्वविमुक्तसन्धिर्यायान्नर: सोऽपुररागमाय ॥
विसूच्यलसकयोरसाध्यत्वलक्षणमाह - य इत्यादि ।
विलम्बिकायास्तु स्वरुपेणैवासाध्यत्वमिति जेज्जट: ।
अल्पसंज्ञो मोहयुक्त: । अभ्यन्तरयातनेत्र: कोटरान्त:प्रविष्टाक्षिगोलक: ।
सर्वविमुक्तसन्धि: श्लथीभूतसर्वपर्वास्थिसन्धि: । अपुन रागामाय मरणाय ।
विसूच्यलसकयोरसाध्यलक्षणमाह - य इत्यादि । विलम्बिकायास्तु
स्वरुपेणैवासाध्यत्वमिति जेज्जट: ।
य: पुरुष: श्यावादिलक्षणयुक्त: स्यात्, श्यावशब्दो दन्तादिभि: प्रत्येकं
संबध्यते, अल्पसंज्ञो मोहयुक्त: अभ्यन्तरयातनेत्र: कोटरान्त:
प्रविष्टनेत्र: क्षामस्वर: क्षीणध्वनि: सर्वविमुक्तसंधिश्च स नर:
अपुनरागमाय अपुनरावृत्तये मरणाय यायाद्गच्छेत् ।
अत्रान्ये - निद्रानाशादिभिर्लक्षणान्तरं पठन्ति । परं तु
``निद्रानाशोऽरति: कम्पो मूत्राघातो विसंज्ञिता ।
अमी ह्युपद्रवा घोरा विसूच्या: पञ्च दारुणा:'' इति माधवेन
संगृहीतत्वात्पृथड्न लिखितम् ।
सटीक - मा.नि. अग्निमांद्य -२३ पान १०७

दांत, ओठ, नखें, काळी पडणें, मोह होणें (अर्धवट मूर्च्छा असणें) ओकारीनें हैराण होणें, डोळे खोल जाणें, आवाज क्षीण होणें सर्व संधी शिथील होणें हीं विसूचिकेची असाध्य लक्षणें व रिष्ट लक्षणें आहेत.

चिकित्सा सूत्रें
विसूचिमध्यें लंघन व पाचन ही चिकित्सा महत्त्वाची आहे. छर्दि व अतिसार अधिक प्रमाणांत होत असले तरी केवळ स्तंभनाचा (अहिफेनासारख्या उपयोग करुं नये. (सु.उ. ५६ १२) तीक्ष्ण व ग्राही अशा गुणाचीं द्रव्यें. वापरावीं सुश्रुतानें पार्ष्णिभागीं (टांचेवर) दाहकर्म करावयास सांगितलें आहे. प्रकुपित वायूवर ही एक प्रकारची त्रासन चिकित्साच आहे.

कल्प
लिंबू आले रस, कांद्याचा रस, भल्लातक, चित्रक, जाती फल, भांग. भल्लातक चिंचा वटी, संजीवनी, लोह-सुवर्ण पर्पटी, सुवर्णसूतशेखर.

आहार
लिंबू सरबत - विश्रांती.

विहार
पिंडिकोद्वेष्टन व शीतगात्रतेवर ताप स्वेद.

N/A

References : N/A
Last Updated : July 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP