उद कवहस्त्रोतस् - शोथ

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


चा.सू. १८-१५ पृ. २५

द्विधा वा निजमागंतुं सर्वागैकांगजं च तम् ॥२३॥
वा.नि. १३/२३ सटीक पान ५२०

शोथाचे निरनिराळ्या दृष्टीकोनांतून भिन्न भिन्न प्रकार केले आहेत. वातज पित्तज, कफज, द्वंद्वज तीन, सान्निपातिक अभिघातज व विषज. द्वंद्वज आणि सान्निपातिक हे प्रकार प्रकृती समसमवायात्मक असल्यामुळें (मा.नि.शोथ १० म.टीका) चरकानें तीन दोषांचे तीनच शोथ प्रकार भेदानें मानलें आहेत. कारणभेदानें निज व आगंतू असे शोथाचे दोन प्रकार मानले आहेत. तसेंच आश्रय भेदानें सर्व शरीराला व्यापून असणारा, अर्ध शरीराला व्यापून असणारा आणि विशिष्ट मर्यादित अवयवांना व्यापून असणारा असा तीन प्रकारचा शोथ चरकानें सांगितला आहे.

स: चतुर्विध: वातिक: पैत्तिक: श्लेष्मिक: सान्निपातिक : ।
का.सं. पान ३३९

कश्यपाने निजाचे वातिक, पैत्तिक, श्लेष्मिक व सान्निपातिक असें चार व पाचवां आगंतु असे वर्गीकरण केलें आहें. वाग्भटानें पसरलेला, उंचवटा आणणारा व ग्रंथीरुप असा स्वरुपभेदानें तीन प्रकारचा शोथ वर्णन केला आहे.
उदकवहस्त्रोतसाच्या प्रकरणामध्यें मुख्यत: सर्व शरीर व अर्ध शरीराला व्यापून असणारें वर्णन करणें इष्ट आहे असें असले तरी शोथलक्षणसामान्यांत: प्राचीन ग्रंथकारांनीं ज़्या इतर शोथांचा उल्लेख शोथप्रकरणांत केला आहे त्यांतील कांहीं शोथ तरी याच ठिकाणीं वर्णन करणें इष्ट. कारण शोथाचेवसमवायीकारण ज़ो कफ तो उदकाचा प्रतिनिधी म्हणून त्या त्या एकांगज़ शोथ व्याधीमध्येंहि उपस्थित असतोच.

निदान
सामान्यहेतुः शोफांना दोषज़ानां विशेषतः ।
व्याधीकर्मोपवासादिक्षीणस्य भज़तो द्रुतम् ॥
अतिमात्रमथान्यस्य गुर्वम्लस्निग्धशीतलम् ।
लवणक्षारतीक्ष्णोष्णशाकाम्बु स्वप्नज़ागरम् ॥
मृद्‍ग्राम्यमांसवल्लूरमज़ीर्णश्राममैथुनम् ।
पदातेर्मार्गगमनं यानेन क्षोभिणाऽपि वा ॥
श्वासकासातिसारार्शोज़ठरप्रदरज़्वराः ।
विषूच्यलसकच्छर्दिगर्भवीसर्पपाण्डव: ।
अन्ये च मिथ्योपक्रान्ता ।
वा.नि. १३-२४ ते २८ पान ५२०

दध्याममृच्छाकविरोधिदुष्टगरोपसृष्टान्नषिवणं च ।
च.चि. १२-५, ६ पान ११२१

मर्मोपघात इह दोषकृत एव ज्ञेव: । बाह्यतेतुजस्तु मर्मो-
पघात आगन्तुहेतुरेव ।

टीका
निरनिराळे व्याधी पंचकर्मासारखे शोधनोपचार आणि उपवास या कारणांनीं ज्याचें शरीर क्षीण झालें आहे अशा व्यक्तीने एकाएकी व अधिक प्रमाणांत गुरु, अम्ल, स्निग्ध, शति, लवण, क्षार, तीक्ष्ण, उष्ण अशा गुणांचे पदार्थ, दह्यासारखी अभिष्यंदी द्रव्यें, पूर्ण पक्व न झालेलीं आम द्रव्यें (फलें वा अन्न) परस्पर विरोधी पदार्थ (दूध व मत्स्य) दुष्ट झालेलें अन्न, गर विषयुक्त अन्न, भाज्या वा पाणी सेवन करणें, झोंपणें वा जागणें यांच्यामध्यें उलटापालट करणें, मृद्‍भक्षण, ग्राम्य मांस, शुष्क मांस अजीर्ण झालेल्या स्थितींत श्रम करणें, खूप दूरवर पायीं चालणें, हादरे हिसके बसणार्‍या वाहनांतून प्रवास करणें मर्मोपघात अशीं अपथ्यें घडलीं तर शोथ हा व्याधी उत्पन्न होतो. तसेंच छर्दी, अलसक, विसूचिका, श्वास, कास, अतिसार, धातुक्षय, शोष, राजयक्ष्मा, पांडु, ज्वर, उदर, प्रदर, भगंदर, अर्श, कुष्ठ, कंडू, पिडका, गर्भधारणा; गर्भघात, सूतिकावस्थेंतील मिथ्योपचार या कारणांनींहि शोथ उत्पन्न होतो. (च.सू.१८-६) या रोगानंतर येणारा शोथ बहुधा व्याधीचा उपद्रव वा व्याधीचा परिणाम म्हणून उत्पन्न होतो. शोथाच्या कारणामध्यें मर्मोपघात असा हेतू सांगितला आहे. त्याचा अर्थ इतर मर्माप्रमाणेंच प्रधान म्हणून सांगितलेल्या तीन मर्मापैकीं हृदय व बस्ति या स्थानांचा (आगंतु वा) निज कारणांनीं उपघात होणें असाही आहे. वंगसेनानें एका कल्पाच्या उपयोगाचें कार्यक्षेत्र सांगत असतांना श्वयथू, गुल्म, उदर व बस्तिसाद हे विकार एकत्र घेतले आहेत. त्यांतील संगती शोथ कारणांतील मर्मोपघातानें नीटपणें लागते.
वंगसेन उदर २६४ पान ५२८

तत्राऽऽगन्तवच्छेद न भेदनलक्षणनभञ्जन-पिच्छनोत्पेषणप्रहार-
वधबन्धनवेष्टनमधनपीडनादिभिर्वा भल्लातकपुष्पफलरसात्म-
गुप्ताशूककृमिशूकाहितपत्रलतागुल्मसंस्पशननैर्वास्वेदनपरि-
सर्पणावमूत्रणैर्वा विषिणां सविषविषप्राणिदंष्ट्रादन्तविषाणन-
खनिपातैर्वा सागरविषवातहिमदहनसंस्पर्षनैर्वा शोथा: समुपजायन्ते ॥
भेदनमाशयविदारणम् । क्षणनमस्थिचूर्णनम् । भञ्जनं=जर्जरीकरणम् ।
पिच्छनमत्यर्थपीडनम् । उप्तेषणं=शिलोत्पेषणमिव । वेष्टनमग्रन्थिबन्धनं
सर्पादिभि: । शूक्रवतां क्रिमीणा शूक: शूकक्रिमिशूक: ।
स्वेदनादिभिर्विर्षिणामिति योज्यम् ।
सटिक-च.सू. १८-४ पान २२४

छेदन (म्हणजे कापले जाणें) भोंसकणें, चूर्ण होणें, फुटणें, पिचणें; ठेंचलें जाणें, मार लागणें, बांधणें, आंवळणें, टोंचणें, पिळवटणें इत्यादि कारणांनीं किंवा बिब्बा त्याचें फूल, फळ, रस याच स्पर्श होणें, खाजकुयली लागणें, निरनिराळ्या प्रकारचा किडयांचा स्पर्श होणें वा ते चिरडले जाणें, विषारी अहितकर गुण असलेल्या वृक्ष वेली गुल्मांचा वा त्यांच्या पत्रपुष्पांचा स्पर्श होणें विषारी प्राण्यांचा घामाशी, मूत्राशीं संबंध येणें वा विषारी प्राणी अंगावरुन जाणें किंवा सविष निर्विष प्राण्यांच्या दांत, दाढा, शृंग, नख यांनीं व्रण होणें किंवा समुद्रावरुन येणारे वारे, विषारी वारे, बर्फ, अग्नि यांची बाधा होणें. हीं आगंतू शोथाची कारणें आहेत. प्रकृतिविशेष वा विशिष्ट प्रकारचे स्थान वैगुण्य असणार्‍य़ा व्यक्तींत हा आगन्तु प्रकारचा शोथ कारणानुरुप उत्पन्न होतो.

संप्राप्ति
बाह्या: सिरा: प्राप्य यदा कफासृक्पित्तानि संदूषयतीह वायु: ।
तैर्बद्धमार्ग: स तदा विसर्पन्नुत्सेधलिड्गं श्वयथुं करोति ॥
उर:स्थितैरुर्ध्वमधस्तु वायो: स्थानस्थितैर्मध्यगतैस्तु मध्ये ।
सर्वाड्ग: सर्वगतै: क्वचित्स्थैर्दोषै: क्वचित् स्याच्छ्वयथुस्तदाख्य: ।
च.चि. १२-८, ९ पान ११२२

पित्तरक्तकफान्वायुर्दुष्टो दुष्टान् बहि:सिरा: ।
नीत्वा रुद्धगतिस्तैर्हि कुर्यात्तड्वांससंश्रयम् ॥
उत्सेधं संहतं शोफं तमाहुर्निचयादत: ।
बहिर्भूता: सिरा बहि:सिरा:, बाह्या: सिरा: ।
वायु: पित्तरक्तकफान् कर्मभूतान् बहि:सिरा:
कर्मभूता नीत्वोत्सेधं कुर्यात् ।
नयतेर्द्विकर्मकत्वात् पित्तादयो बहि:सिराश्च कर्म ।
यथा - अजां नयति ग्राममिति । तेनायमर्थोऽवतिष्ठते-बहि:
सिरासु पित्तादीन्नीत्वेति । किम्भूतो वायु: ? दुष्ट: सन्,-
कोपनै: कुपित: । किम्भूतमुत्सेधम् । त्वक् च मांस च
त्वड्वासे, ते संश्रय: आश्रयो; यस्य तम् । तैर्हीति हिशब्दोऽ
वधारणे । तैरेव बहि:सिराप्राप्तै: पित्तरक्तकफै: रुद्धगति: ।
अत एव संहतं - समन्ताद्धतं, निश्चलमिव सम्पन्नं, उत्सेधम् ।
यतश्चैवं वातपित्तकफै:ळ शोफ: सञ्जायते, तस्मात्सर्व शोफं
निचयात् - दोषत्रयात् आहु: । ननु, एवं सतीदंनविरुध्यते
``दोषै: पृथग्द्वयै: सर्वै:'' इति ।
सटीक-वा.नि. १३-२१ पान ५१९

मारुत: सर्वशोफानां मूलहेतुरुदाहृत: ।
का.स. पान ३४०

शोथाचीं जीं कारणें वर सांगितलीं आहेत त्यांचा परिणाम होऊन शरीरांतील रक्त, पित्त व कफ (रस) यांच्यामध्यें वैगुण्य उत्पन्न होतें. वायु प्रकुपित होतो. हा प्रकुपित झालेला वायु रक्तपित्तकफांना दुष्ट करुन त्यांना शरीरांतील बहि: सिरा मध्यें घेऊन जातो. या बहि:सिरामध्यें आलेल्या दुष्ट रक्तपित्त कफानें वायूचाच मार्ग रुद्ध होतो आणि त्यामुळें रक्तपित्तकफादि द्रव्यें केवळ बहि:सिरांतच न राहतां विमार्गग वायूच्या प्रेरणेनें त्वक् आणि मांस याच्यामध्यें येऊन संचित होतात. स्वाभाविकपणेंच त्याठिकाणीं उत्सेध उत्पन्न होतो. निज शोथामध्यें अभ्यंतर मार्गातील आम, पक्वाशय व बस्ति रसवाहिनी आणि तत् सान्निध्यात आहार जलाचें वहन करणार्‍या सिरांचें आश्रयस्थान असलेलें वृक्व हें शोथाचें उद्‍भवस्थान असून बहि:सिरा हें त्याचें अधिष्ठान आहे. दोष दुष्यांच्या प्रमाणांवर त्याचा संचार, सर्व शरीर अर्ध शरीर वा विशिष्ट अवयव यापुरताच मर्यादित रहातो. शोथाच्या उद्‍भवस्थानामध्यें वृक्काचा उल्लेख स्पष्टपणें आला नाहीं याचें कारण असें कीं वृक्कविकृतीपेक्षांहि रसवहनांतील विकृती हीच शोथाला मूलभूत कारण असून वायूचा प्रकोप हें त्यास निमित्त असते हे असावें. त्यामुळें विशिष्ट अवयवाच्या विकृतीमध्यें उद्‍भव असल्यासारखें वाटलें तरी खरें कारण त्याहिपेक्षां गंभीर असतें. शोथाच्या संप्राप्तींतींत आयुर्वेदीयांनीं यासाठीं सर्वांना मूलभूत असणार्‍या विकृतींचा विचार स्पष्टपणें मांडला आहे.

दोषा: श्वयथुमूर्ध्व हि कुर्वन्त्यामाशयस्थिता: ।
पक्वाशयस्था मध्ये तु वर्च:स्थानगतास्त्वध: ॥
कृत्स्नदेहमनुप्राप्ता: कुर्यु: सर्वसरं तथा ।
मा.नि. शोथ १५, १६ पान २७९

स्थानांच्या दृष्टीनें निरनिराळ्या अवयवांपासून शोथाचा आरंभ होतो दोष आमाशयांत असतील तर मुखापासून शोथ येतो. दोष नाभिसमंतात असतील तर मध्यदेशापासून शोथ सुरुं होतो व पक्वाशयामध्यें असल्यास शोथ पायापासून येतो. शोथामध्यें दूष्य सांगत असतांना रक्तासवेंच रसाचा उल्लेखहि गृहीत धरला पाहिजे. उपलब्ध वर्णनाप्रमाणें तो रक्तामध्यें उपलक्षणानें समाविष्ट आहे असें म्हणावे किंवा कफसदृश गुणाचा असल्यामुळें कफाच्या उल्लेखांत समाविष्ट आहे असें मानावें. या कल्पनेस हारीताचा आधार आहे.

रसे सर्वानुगा: शोफा: सर्वदेहानुगां: रसा: ।
हारित तृतीय २५ पान ३७२

रसाश्रित उदक सर्व शरीरास व्यापून असल्यामुळें त्याच्या विकृतीनें सर्वांग शोथ उत्पन्न होतो. पित्त आणि कफ हे जरी दोष असले तरी याठिकाणीं त्यांची विकृती दुष्यासारखीच होते. कश्यपानें दुष्यांच्या यादींत त्वग्‍ मांस, मेद, याचाहि अधिष्ठान म्हणून उल्लेख केला आहे तो विचार करण्यासारखा आहे. मात्र मेदोदुष्टीची व्यक्त लक्षणें विशिष्ट रोगांत व विशिष्ट अवस्थेंतच व्यक्त होतात. विशेषत: सूतिकेच्या मिथ्योपचारामुळें उत्पन्न होणारा एकांगज शोथ मेदोदुष्टिप्रधान असूं शकतो. कश्यप हा ग्रंथ सौतिकाकडे विशेष लक्ष देणारा असल्यानें त्याच्या क्षेत्रांत पुष्कळदां आढळणार्‍या शोथाचें वैशिष्टय पाहून त्यानें मेदाचा स्वतंत्र व स्पष्ट उल्लेख केला असला पाहिजे. शोथाच्या प्रकारानुरुप कधीं रक्ताची, कधीं पित्ताची तर कधीं कफाचीं लक्षणें व्यक्त होत असलीं तरी या तिघांचीहि दुष्टी सामान्य स्वरुपामध्यें शोथात असतेच.

पूर्वरुपें
ऊष्मा तथा स्याद्दवथु: सिराणामायाम इत्येव च पूर्वरुपम् ।
च.चि. १२-१० पान ११२२

तत्पूर्वरुपं दवथु: सिरायामोऽड्गौरवम् । तस्य श्वयथो:
पूर्वरुपं तत्पूर्वरुपम्  दवथु:-चक्षुरादिषु यस्तीव्र उष्मा स
भण्यते । यदुक्तम्-``दवथुश्चक्षुरादिभ्यस्तीव्रमूष्मप्रवर्तनम्''
इति । तथा, सिरायामो-यत्र प्रदेशे श्वयथुरुद्‍बभूषुस्तत्र
सिराणां दैर्घ्यमिम । तथा अड्गगौरवं स्यात् ।
सटीक वा.नि. १३-३० पन ५२०

सिरायाम: सिराप्रसरणवत् पीडा ।
मा.नि. शोथ ३ म. टीका

शोथाचें पूर्वरुप म्हणून उष्णता वाढणें, आग होणें, सिरा ताणल्याप्रमाणें वेदना होणें आणि अंग जड वाटणें अशीं लक्षणें होतात.

रुपें
सगौरवं स्यादनवस्थितत्वं सोत्सेधमूष्माऽथ सिरातनुत्वम् ।
सलोमहर्षाऽड्गविवर्णता च सामान्यलिड्गं श्वयथो प्रदिष्टम् ।
च.चि. १२-११ पान ११२२ - ११२३

शोथ हा अनवस्थित म्हणजे पसरत जाणारा वाढत, जाणारा असतो. जडपणा वाटतो. त्या त्या अवयवांना सुजेमुळें फुगवटा आल्यासारखा दिसतो. स्पर्श उष्ण असतो, सिरा बारीक होतात. अंगावर रोमांच उभे राहतात, त्वचेचा वर्ण विकृत होतो. हीं लक्षणें शोथाचीं सामान्यरुपें म्हणून होतात.

वातज शोथ
चलस्तनुत्वक्परुषोऽरुणोसित: प्रसुप्तिहर्षार्तियुतोऽनिमित्तत: ।
प्रशाम्यति प्रोन्नमति प्रपीडितो दिवाबली च श्वयथु: समीरणात् ॥
चल इत्यादिना वातजशोथलिड्गमाह । तनुत्वगित्यबहलत्वक् ।
असित इति कृष्ण: । सुप्ति: स्पर्शाज्ञानं, हर्षो झणझणिकेति
ख्याता वेदना, किंवा रोमहर्षा: ।
अनिमित्तत: प्रशाम्यतीति वायोश्चलत्वेन कदाचिन्निमित्तं विनाऽपि
लीनो भवतीत्यर्थ: केचित् `निमित्तत' इति पठन्ति, तेन `स्नेहोष्णमर्दनाभ्यां
च प्रणश्येत् स च वातिक' इति यदुक्तं तदेवेदमुच्यते ।
प्रोन्नमतीति संपीडनानन्तरमेवोन्नामिति ।
सटीक च.चि. १२-१२ पान ११२३

खररोमा, संकोच, स्पंद, तोद, भेद, क्षिप्रोत्थानक्षमा,
त्वक् च सर्षपलिप्तेव तत्स्थे चिमचिमायते ।
वा.नि. १३-३० ते ३२

वातज शोथ हा चल व तनु (म्हणजे स्पर्शाला पातळ मृदु असा लागणारा) असतो. शोथांच्या ठिकाणची त्वचा व केस खरखरीत होतात. वर्ण अरुण व कृष्ण असा होतो, अवयवाचा संकोच होतो. त्या त्या स्थानीं स्पंद, हर्ष, तोद, भेद, सुप्ती (स्पर्शाज्ञत्व) अशीं लक्षणें असतात. शोथ वाढतोहि लवकर व कमीहि लवकर होतो. टणक जागीं बोटानें दाबून पाहिलें असतां शोथामध्यें जो खळगा पडतो तो वातज शोथामध्यें लवकर भरुन येतो. शोथाच्या ठिकाणच्या त्वचेमध्यें मोहोरी लावली असतां जशी चुणचुण होते. तशी चुणचुण होते, शोथ दिवसा वाढतो व रात्रीं त्या मानानें कमी होतो. वायू हा विषम स्वभावी व चल गुणाचा असल्यामुळें हा शोथ कारणावांचून (वाढतो वा) कमी होतो, स्निग्ध उष्ण अशा उपचारानें या शोथामध्यें उपशय येतो वातप्रधान शोथ बहुधा प्रथम पायावर येतो. मग सर्व शरीरभर पसरतो. पक्वाशय हें या शोथाचें प्रमुख उद्‍भवस्थान असतें.

पित्तज शोथ
मृदु: सगन्धोऽसितपीतरागवान भ्रमज्वरस्वेदतृषामदान्विते: ।
य उष्यते स्पर्शरुगक्षिरागकृत् स पित्तशोथो भृशदाहपाकवान् ॥
च.चि.१२-१६ पान ११२३

स्निग्धानुसारप्रशमो, मध्ये प्राक् जायते तनु,स्पर्शासह,
विट्‍भेदी, शीताभिलाषी ।
वा.नि. १३-३३-३४ पान

पित्तामुळें उत्पन्न होणार्‍या शोथाचा वर्ण रक्त, पित, नील असा असतो. हा शोथ लवकर पसरतो वा नाहींसा होतो. याची उत्पति बहुधा शरीराच्या मध्य भागापासून होते. शोथाचा स्पर्श मृदु असतो. त्याठिकाणीं स्पर्श सहन होत नाहीं. रुग्णाच्या अंगास एक प्रकारचा उग्र गंध येतो. शोथाच्या ठिकाणीं आग होते, व त्याठिकाणीं पाकहि होण्याची शक्यता असते. गार हवेसें वाटतें, सार्वदेहिक लक्षणांमध्यें डोळे लाल होणें, भ्रम, ज्वर, स्वेद, तृष्णा, क्लेद, मद, दाह, द्रवमल असे विकार असतात.

कफज शोथ
गुरु: स्थिर: पाण्डुररोचकान्वित: प्रसेकनिद्रावमिवह्निमान्द्यकृत् ।
स कृच्छ्रजन्मप्रशमो निपिडितो न चोन्नमेद्रात्रिबली कफात्मक: ॥
गुरुरित्यादिना कफशोथमाह । अरोचकान्वित इति अरो-
चकव्याधिसहचारी । कृच्छ्रजन्मप्रशम इति चिरोत्पत्तिवि नाश: ।
रात्रिबली कफात्मक इति रात्रौ स्त्रोतोरोधजेन देहक्लेदेनाचेष्टया
च कफस्य वृद्धत्वात् तज्जनितशोथो बलवान् भवति, दिवा तु
स्फुटस्त्रोतसि शरीरे चेष्टायुक्ते न कफो बलीभवति किन्तु वायु:
तेन वातशोथो दिवा बलीभवति, कफशोथस्तु हीयते ।
सटीक च.चि. १२-१४ पान ११२३

स्निग्ध: श्ल्क्ष्ण:, स्त्यान: कठिण:, शीतल:, स्त्रवेन्नासृक्
चिरात् पिच्छां कुशस्त्रदि विक्षत: स्पर्शोष्णकांक्षी - ।
वा.नि. १३-३५-३६

कफज शोथामुळें त्वचा पांडुर दिसते. कफाचें स्वरुप स्निग्ध, श्लष्ण, गुरु, स्थिर, स्त्यान, कठिण, शीतल असें असतें. शोथ बोटानें दाबला असतां जो खळगा पडतो तो लवकर भरुन येत नाहीं. शोथ रात्रीं जास्त होतो. शोथाच्या ठिकाणीं कांहीं कारणांनीं क्षत झालें तर त्यांतून रक्त न येतां चिकट असा लसिकास्त्राव होतो. रोग्याला उष्ण स्पर्श हवासा वाटतो. अरुचि, तोंडाला पाणी सुटणें, छर्दी, निद्रा, अग्निमांद्य, अशीं इतर लक्षणें असतात. रात्री हालचाल नसल्यानें शरीरांतील क्लेदानें स्त्रोतोरोध अधिक असतो म्हणून कफप्रकोपाची भर पडताच शोथ त्यावेळीं वाढतों.

द्वंद्वज व सान्निपातिक शोथ
निदानाकृतिसंसर्गाच्छ्‍वयथु: स्याद्विदोषज: ।
सर्वाकृति: सन्निपाताच्छोथो व्यामिश्रलक्षण: ॥
व्यामिश्रौषधविधानार्थ क्वापि प्रकृतिसमसमवेता अपि
शिष्यहितैषितया द्वन्द्वसन्निपाता अतिदेशेन पठयन्ते, ये तु
विकृतिविषमसमवेतास्तान् कण्ठरवेण पठति; अतोऽति
देशेन द्वन्द्वत्रयसन्निपातानाह निदानाकृतिसंसर्गादित्यादि ।
व्यामिश्रलक्षण इति मिलितवातादित्रयलिड्ग: ।
अनेनैव सर्वाकृतिरित्यस्यार्थे सिद्धे तदभिधानं वातादिप्रत्येकं
कृत्स्नलिड्गनियमार्थम् ।
सटिक मा.नि. शोथ १० पान २७८

द्वंद्वज शोथामध्यें जे दोन दोष प्रकुपित असतील त्यांचीं लक्षणें एकत्र दिसतात. सन्निपातामध्यें तीनहि दोषांचीं लक्षणें दिसतात.

आगंतू शोथ
भृशोष्मा लोहिताभास: प्रायश: पित्तलक्षण: ॥
मा.नि. शोथ १२ पान २७८

मृदुश्चलोऽवलम्बी च शीघ्रो दाहरुजाकर: ।
मा.नि. शोथ १२ पान २७८

माधवनिदान व वाग्भट यांनीं अभिघातज व विषज असे आगंतूचे दोन प्रकार देऊन त्यांच्या लक्षणामध्यें थोडासा फरक सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तीं सर्व लक्षणें आगंतु या प्रकरणामध्यें एकत्र घेणें सोयीचें आहे. आगंतु कारणांनीं उत्पन्न होणारा शोथ हा लवकर वाढणारा, पसरणारा असून त्याचा स्पर्श उष्ण असतो, वर्ण आरक्त आसतो. हे शोथ शींघ्रकारी, दाहयुक्त, वेदनावान, मृदु व शिथिल (अवलंबी) असे असतात. दाह हें लक्षण विषज शोथामध्यें विशेष असतें.

शोथाची आमावस्था
क्षुन्नाशो हृदयाशुद्धिस्तन्द्राजठरगौरवै: ।
दोषप्रवृत्तिर्नो यत्र व्याधिमामान्वितं वदेत् ॥
वंगसेन शोथ २२ पान ५३१

वंगसेनानें शोथाच्या आमावस्थेचीं लक्षणें सांगितलीं आहेत. भूक नसणें, हृदयामध्यें अशुद्धता, (मळमळणें) तंद्रा, उदरगुरुता व स्वेदमलमूत्रांची अप्रवृत्ती अशी लक्षणें या अवस्थेंत असतात.

वृद्धि स्थान क्षय
एका अवयवावर प्रथम दिसावयास लागलेला शोथ क्रमानें सर्व शरीरावर पसरत जातो, त्याचा पसरण्याचा वेग अधिक असतो. स्पर्शाला प्रथम मृदु, असणारा शोथ पुढें गुरु, कठिण असा होत जातो. शोथाचा उत्सेधहाहि वाढत जातो. त्यामुळें त्वचा ताणली जाऊन श्लष्ण दिसूं लागतें. पुढें स्त्राव येऊं लागतो. शोथ फार सावकाश पसरतो व त्याचा मृदु स्पर्श व अल्पत्व तसेंच रहातें. शोथाचें पसरण्याचें स्वरुप नाहीसें होऊन एक एक अवयव शोथ रहित होत जातो. शेवटीं संधीच्या ठिकाणीं वा पावलावर शोथाचें प्रमाण अवशिष्ट राहून इतर सर्व शरीरावर कृशता येते व कातडी सुरकुतलेली दिसते. त्वचेचा वर्ण प्रकृत होतो. संधी, पाय वा अक्षिकूट या ठिकाणींहि शोथ दिसेनासा झाला आणि बल मांस वाढूं लागलें, कृशता नाहींशीं झाली. त्वचा पुन्हां पूर्ववत्, सम व सतेज दिसूं लागली म्हणजे शोथ व्याधी नाहींसा झाला असें समजावें.

चिकित्सा संदर्भानें लक्षणें -
भगंदर, अर्श, कृमी, कुष्ठ, मेह, वैवर्ण्य, कार्श्य, हिक्का, (च.चि.१२-३१) हृद्‍रोग, पांडुरोग, प्लीहा, ज्वर, अरोचक, मेह, गुल्म, उदर, कास, श्वास, ग्रहणी, कंडु, शाखावत, विड्ग्रह, हिक्का, (च.चि.१२-३७.३८)

शोष, विसूचिका, गुल्म, अश्मरी (च.चि.१२-४६)

प्रतिश्याय, अलसक, कामला, मनोविकार, (च.चि.१२-४८)

आंत्रदोष, आमवात, अधोग रक्तपित्त, अम्लपित्त, मूत्रदोष, शुक्रदोष, (च.चि. १२-५२)

उपद्रव
छर्दि: श्वासोऽरुचिस्तृष्णां ज्वरोऽतीसार एव च ।
सप्तकोऽयं सदौर्बल्यं शोफोपद्रवसंग्रह: ॥
च.सू. १८-१५ पान २२६

छर्दी, श्वास, अरुचि, अतिसार, दौर्बल्य, तृष्णा, हिक्का, कास व वातबलासक ज्वर हे विकार शोथाचे उपद्रव म्हणून होतात. चिकित्सा संदर्भात आलेल्या लक्षणांच्या अनुरोधानें मूत्रदोषानें उत्पन्न होणारे मूत्राघात हें लक्षणहि उपद्रव म्हणून घ्यावे.

उदर्क
शोष, कार्श्य, त्वक्स्फोटन, कंडू, संधिशूल.

साध्यासाध्य विवेक

यो मध्यदेशे श्वयथु: स कष्ट: सर्वयश्च य: ।
अर्धाड्गे रिष्टभूत: स्वाद्यश्चोर्ध्व परिसर्पति ॥
श्वास: पिपासा छर्दिश्च दौर्बल्यम ज्वर एव च ।
यस्य चान्ने रुचिर्नास्ति श्वयथुं तं विवर्जयेत् ।
अनन्योपद्रवकृत: शोथ: पादसमुत्थित: ।
पुरुषं हन्ति नारीं च मुखजो गुह्यजो द्वयम् ॥
नवोऽनुपद्रव: शोथ; साध्योऽसाध्य: पुरेरित: ।
विवर्जयेत्कुक्ष्युदराश्रितं च तथा गले मर्मणि संश्रितं च ॥
स्थूल: खरश्चापि भवेद्विवर्ज्यो यश्चापि बालस्थविराबलानां ।
अत:परं कृच्छ्रादिभेदमाह - यो मध्यदेशे इत्यादि ।
मध्यदेहगस्य कष्टत्वं तद्देगतशोथप्रभावात् । सर्वग इति सर्वदेहगामि ।
सर्वज इति पाठानतरे सर्वज: सान्निपातिक: । रिष्टभूत इति ।
रिष्टतुल्य: भूतशब्द उपमाने; यथा - मातृभूत: पितृभूत इति ।
व्याधेरेवात्र रिष्टभूतत्वं तस्य च निमित्तकृतत्वात् भूतशब्द
उपात्त इति कार्तिक: । अन्ये तु भूतशब्द स्वरुपवचनमाहु: ।
यश्चोर्ध्वपरिसर्पतीति पुरुषविषयमेतत; चकारात् स्त्रियाश्च
उपरिजो योऽधो याति स गृह्यते, तथा गुह्यजो य: सवर्ग: ।
वचनं हि-``यस्तु पादाभिनिर्वृत्त: शोथ: सर्वाड्गगो भवेत् ।
पुरुषं इन्ति, नारीं च मुखजो द्वयम्'' - (च.सु.स्था.अ.१८) इति ।
अनन्योपद्रवकृत इति अन्यस्य उपद्रवा अन्योप-
द्रवास्तद्विपरीता अनन्योपद्रवा:, एतेनायमर्थ:-शोथस्यैव ये
उपाद्रवास्तै: कृत;, ते च ``श्वासं: पिपासा दौर्बल्यं ज्वरच्छ र्दिरोचक: ।
हिक्कातिसारकासाश्च शोथिनं क्षपयन्ति हि'' -
(सु.चि.स्था.अ.२३) इति सुश्रुतोक्ता: । चरकेप्युक्तं -
छर्दितृष्णाऽरुचि: श्वासोज्वरोऽतीसार एव च । सप्तकोऽयं सदौर्बल्यं
शोथोपद्रवसंग्रह: (च.सू.स्था.अ.१८) इति ।
अथवा अन्यमुपद्रवं करोतीति अन्योपद्रवकृशिदान्नं, नान्यो-
पद्रवकृदनन्योपद्रवकृत्, तत: स्वनिदानात्, जात:' इति
शेष:, तेन शोथजनकनिदानादेवोत्पन्न इत्यर्थ: ।
पाण्डुरोगादौ तु य: शोथ: पादसमुत्थित: सोऽन्योपद्रवकृतो निदा-
नान्तराज्जात:, साध्य एव । आननोपद्रवगत: इति पाठान्तरे
अमयर्थ:- पादयोरुत्थित: पूर्व पश्चादाननमुपद्रवेण प्रसारेण
उपद्रवत्वेन वा गत: ।
तथाच तन्त्रान्तरं पादप्रवृत्तश्वयथुर्नृणां य: पाप्नुयान्मुखम् ।
स्त्रीणां वक्त्रादधो याति बस्तिजश्च न सिध्यति इति' ।
क्षारपाणिनाऽप्युक्तम् उर्ध्वगामी नरं पद्‍भ्यामधोगामी मुखात् स्त्रियम् ।
उभयं बस्तित शोथो हन्ति संशय: इति । गुह्यज इति बस्तिजात: ।
द्वयमिति नरं नारी च । असाध्य: पुरेरित इति `अर्धाड्गे रिष्टभूत
इत्यादिना ।
म.टीकेसह - मा. नि. शोथ १७ ते २० पान २७९

पादामि निर्वृत्त: शाथे: पुरुषाणां लाघवादधोदेशे जात: सन्
यदा न जीयते तदा गुरुमूर्ध्वदेशं गत: स च न पार्यते
जेतुम् यो हि लघौ प्रदेशे जेतुं न पार्यते गुरुप्रदेशे गतो
नितरामेव न पार्यते । एवम्, प्रसृत: स्त्रीमुखाश्च य इत्यापि
ज्ञेयम् । वचनं हि । `अधोभागो गुरु:स्त्रीणामूर्ध्व पुसांगुरुस्तथा ।
टीका च.सू. १८-२५ पान २२६

कृशस्य रोगैरबलस्य या भवेदुपद्रवैर्वा वमिपूर्व कैर्युत: ।
स हन्ति मर्मानुगतोऽथ राजिमान् परिस्त्रवेद्धीनबलस्य सर्वगे: ॥

च.चि. १२-१५ पान ११२३

नुकतांच उत्पन्न झालेला व उपद्रवरहित असा शोथ साध्य असतो. जो शोथ मध्यभागीं सुरुं होतो व सर्वांगावर पसरतो तो कष्टसाध्य असतो. अर्ध्या अंगावर उत्पन्न होऊन जो वरती पसरत जातो तो शोथ रिष्टभूत होतो. पुरुष रुग्णामध्यें पायापासून आरंभ होऊन सर्वांगावर पसरत जाणारा व स्त्री रुग्णामध्यें मुखावर उत्पन्न होऊन सर्वांगावर पसरत जाणारा शोथ असाध्य होतो. पुरुषांचा अधोभाग व स्त्रियांचा ऊर्ध्वभाग लघु असतो. याठिकाणीं उत्पन्न होणारा शोथ, स्थानाच्या लघु गुणांमुळें उपचारांनीं लवकर नाहींसा झाला पाहिजे. तसें होत नाहीं. उलट शोथ वाढत जातो. यावरुन दोषांचें स्वरुप न जिंकलें जाण्याइतकें बलवान् असतें असें दिसतें. बलवान् दोषांनीं उत्पन्न झालेला रोग सहाजिकच असाध्य होतो. बस्तीच्या विकृतीमुळें उत्पन्न होणारा व सर्व शरीरभर पसरणारा शोथ असाध्य होतो. दुर्बल, रोगानें कृश झालेल्या रुग्णास उत्पन्न होणारा, छर्द्यादि उपद्रवांनीं युक्त असा शोथ असाध्य असतो. शोथ मर्माश्रित असून त्यावर जर राजी (रेषा) दिसूं लागतील तर व्याधी असाध्य होतो. दोषांची संचिति अतिशय होऊन, त्वचा फुटते व त्यांतून स्त्राव वाहूं लागतो त्या वेळी व्याधीं असाध्य होतो. अत्यंत बाल, अतिशय म्हातारे अशा रुग्णांना पुष्कळ प्रमाणांत व कठिण असा शोथ उत्पन्न झाल्यास तो असाध्य होतो. शोथामध्यें कुक्षी, उदर व गळा या अवयवांनाहि सूज आल्यास व्याधी असाध्य होतो.

रिष्ट लक्षणें
तन्द्रादाहारुचिच्छर्दिमूर्च्छाध्मानातिसारवान् ।
अनेकोपद्रवयुत: पादाभ्यां प्रसृतो नरम् ॥
नारीं शोफो मुखाद्धन्ति कुक्षिगुह्यादुभावपि ।
राजीचित: स्त्रवंश्छर्दिज्वरश्वासातिसारिणम्
चा.शा. ५-९२,९३

ज्वरातिसारौ शोफान्ते श्वयथुर्वा तयो: क्षये ।
दुबलस्य विशेषेण जायन्तेऽताय देहिन: ॥
वा.शा. ५-९४

श्वयथुर्यस्य पादस्थ: परिस्त्रस्ते च पिण्डिके ।
सीदत: सक्थिनी चैव तं भिषक् परिवर्जयेत् ॥
वा.शा. ५-९५

आननं हस्तपादं च विशेषाद्यस्य शुष्यत: ।
शूयते वा विना देहात्स मासाद्यति पञ्चताम् ॥
वा.शा. ५-९६ पान ४२७

तंद्रा, दाह, अरुचि, मूर्च्छा, आध्मान, अतिसार या उपद्रवांनीं युक्त शोथ मारक ठरतो. स्त्री पुरुष रुग्णामध्यें वर असाध्य लक्षणांत सांगितल्याप्रमाणें शोथ उत्पन्न झाल्यास तो मारक ठरतो. स्त्रवणारा, निरनिराळ्या दोषांच्या वर्णाप्रमाणें रेषा दिसणारा, छर्दि,ज्वर, श्वास, अतिसार, यांनी युक्त शोथ मृत्यूचें प्रतीक आहे. ज्वर व अतिसार यांच्या शेवटीं शोथ आला वा शोथामध्यें ज्वर, अतिसार उत्पन्न झाले तर त्यांचा परिणाम मृत्यूंत होतो. पायावर पुष्कळ सूज आली आहे. पोटच्या खाली घसरल्यासारख्या दिसत आहेत, मांडया गळून गेल्या आहेत असा रुग्ण वैद्यानें वर्ज्य करावा. तोंडावर व हातापायावर सूज असून इतर शरीर शोथविरहित असेल वा उलट प्रकारानें हात, पाय व तोंड सुकल्यासारखे कृश होऊन इतर शरीरावर सूज असेल तर रोगी महिन्यापेक्षा जास्त जगत नाहीं.

चिकित्सा सूत्रें
निदानदोषर्तुविपर्ययक्रमैरुपाचरेत्तं बलदोषकालवित् ।
सामान्येन चिकित्सासूत्रमाह - निदानेत्यादि ।
निदानादिविपरीतक्रमै: लंघनादिभिरुपाचरेदित्यर्थ: ।
बलदोषकाल्विदित्यनेन निदानादेर्विपरीता क्रियोक्ता बलं तथा
दोषमामादिभेदभिन्नं तथा कालं च व्याधवस्थारुपं विदित्वा
या युज्यते सा कर्तव्येति दर्शयति । निदानेत्यादौ दोषशब्देन
वातादयो गृह्यन्ते, ऋतुशब्देन च नित्यग: काल : ।
तेनैव तद्विशिष्टवाचकतया बलदोषकालविदिति वचनं न पुनरुक्तम् ।
अन्ये तु प्रथमेन दोषशब्देन दूष्यधातुग्रहणं, द्वितीयेन तु
वातादिग्रहणमित्याहु:, प्रथमव्याख्याने तु दोषशब्देनैव दूष्य-
स्यापि दोषाधारस्य ग्रहणं ज्ञेयम् ।
सटीक च.चि. १२-१६ पान ११२३,२४

अथामजं लंघनपाचनक्रमैर्विशोधनैरुल्बणदोषमादित: ।
शिरोगतं शीर्षविरेचनैरधोविरेचनैरुर्ध्वहरैस्तथोर्ध्वजम् ॥
उपाचरेत् स्नेहभवं विरुक्षणै: प्रकल्पयेत् स्नेहविधिं
च रुक्षजे ।
विबद्धविट्‍केऽनिलजे निरुहणं घृतं तु पित्तानिलजे सतिक्तकम् ॥
पयश्च मूर्च्छाऽरतिदाहतर्षिते विशोधनीये तु समूत्रमिष्यते ।
कफोत्थितं क्षारकटूष्णसंयुतै: समूत्रतक्रासवयुक्तिभिर्जयेत् ॥
आमजमिति आमदोषजनितम्, अपक्वता च प्रायो दोषाणां
प्रथमदुष्टौ भवति । क्रमैरित्युपक्रमै: । अध इति अधोभा-
गजं, विरेचनैरुपाचरेत् । उर्ध्वहरैरिती वमनै: उर्ध्वजमि-
त्यूर्ध्वभागजम् ।
सतिक्तकं घृतमिति तिक्तद्रव्यसाधितं घृतम् ।
पित्तानिलजे इति वातपित्तजद्वन्द्वे । मूर्च्छादय इह
संजाता यस्य तस्मिन् मूर्च्छारतिदाहतर्षिते ।
विशोधनीये इति मूर्च्छायुक्ते एव विशोधनीये ।
समूत्रेत्यादि मूत्रसमभागैस्तक्रासवयोगै: ।
सटीक च.चि. १२-१७ ते १९ पान ११२४

विड्‍वातसड्गे पयसा रसैर्वा प्राग्भक्तमद्यादुरुबूकतैलम् ।
स्त्रोतोविबन्धेऽग्निरुचिप्रणाशे मद्यान्यरिष्टांश्च पिबेत् सुजातान् ॥
च.चि. १२-२८ पान ११२६

शोथाला कारणीभूत झालेले निदान, शोथ उत्पन्न करणारे दोष (दूष्य) व शोथ येतो तो काल हें लक्षांत घेऊन, व रोग्याच्या बलदोषाचा (प्रकृतिस्थ) विचार करुन समयज्ञ वैद्यानें विरुद्ध गुणांच्या साहचर्यानें शोथाचा उपचार करावा.
शोथांतील दोष आमावस्थेंत असतांना दोष प्रभूत असतील तर लंघनपाचन अशा क्रमानें प्रारंभींच शोधन करावें. शिरोगत दोषांचें नस्यानें, पक्वाशयस्थ दोषांचें विरेचनानें आणि आमांशयांतील दोषांचेम वमनानें शोधन होतें. स्निग्ध पदार्थ शोथास कारण झाले असतील तर रुक्षण करावें व रुक्षता उत्पन्न करणार्‍या द्रव्यांनीं शोथ आला असल्यास उपचारासाठीं स्निग्ध द्रव्यें वापरावीं. शोथामध्यें वातप्राधान्य असून मलबद्धता असल्यास निरुहबस्ती वापरावा. वातपित्तज शोथासाठीं तिक्त द्रव्यांनीं सिद्ध केलेलें घृत वापरावें. मूर्च्छा, अरति, दाह, तृष्णा हीं लक्षणें असतांना दूध वापरावें. हीं लक्षणें असतांनाच शोधन द्यावयाचें असल्यास त्यासाठीं दूध व गोमूत्र यांचा उपयोग करावा. कफज शोथावर क्षार, कटु, उष्ण अशीं द्रव्यें मूत्र, तक्र व आसवें युक्तीनें वापरावी. टीकाकारानें मूत्रयुक्त तक्रासव असा अर्थ केला आहे तोहि चालेल. वात व पुरीष यांचा अवरोध असतांना दुधाबरोबर वा मांसरसाबरोबर जेवणाच्या पूर्वी एरंडेल द्यावें. स्त्रोतसांचा विबंध असतांना व अगिमांद्य, अरुचि हीं लक्षणें असतांना आसवारिष्टें सेवन करावीं.

एकांगशोथ चिकित्सा
स्वेदाभ्यड्गान् समीरघ्नान् लेपमेकाड्गे पुन: ।
वा.चि.१७-२९ पान ७०७

यथादोषं यथासन्नं शुद्धिं रक्तावसेचनम् ।
कुर्वीत, मिश्रदोषे तु दोषोद्रेकबलात्क्रियाम् ।
वा.चि.१७-३८ पान ७०७

इति निजमधिकृत्य पथ्यमुक्तं
क्षतजनिते क्षतजं विशोधनीयम् ।
स्त्रुतिहिमघृतलेपसेकरेकै -
र्विषजनिते विषजिच्च शोफ इष्टम् ॥
वा.चि. १७-४१ पान ७०८

एकांगज असा मर्यादित शोथ असेल तर त्यावर स्वेद, अभ्यंग, वातघ्न द्रव्यांचे लेप असें उपचार करावें; विम्लापन करावें. दोष व अवस्थांचा विचार करुन रक्तमोक्ष करावा. आगंतुज शोथावर आगंतू कारण असेल त्याप्रमाणें व्रणकर्म, लेप, रक्तमोक्ष, आचूषण, शीत प्रदेह, घृत, परिषेक, विषघ्न उपचार, अशा प्रकारांनीं वा अशा साधनांनीं चिकित्सा करावी.

कल्प
हरीतकी, निशोत्तर, दंती, जयपाल, स्नुहि, इंद्रवारुणी, कुटकी, गोमूत्र, लोहभस्म, ताम्रभस्म, पुनर्नवा, दशमूल, एरंडमूल, एरंडतैल. हेमशिलाजत्, गोमूत्रहारितकी, आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गंधर्वहरीतकी, लोहपर्पटी, पुनर्नवा मंडूर, पनर्नवासव, कुमारी आसव, दशमूलारिष्ट, अश्वकंचुकी, नाराचरस.

अन्न
दूध, ताक, बाजरी, लसूण, कुलत्थयूष पुराण यव व शाली.

विहार
विश्रांती, व्यायाम वर्ज्य.

अपथ्य
ग्राम्याब्जानूपं पिशितलवणं शुष्कशाकं नवान्नं ।
गौडं पिष्टान्नं दधि तिलकृतम विज्जलं मद्यमम्लम् ॥
धाना वल्लूरं समशनमथो गुर्वसात्म्यं विदाहि ।
स्वप्नं चारात्रौ श्वयथुगदवान्वर्जयेन्मैथुनं च ॥
ग्राम्येत्यादिना निदानत्वेनैव प्राप्तनिषेधानपि महात्ययावहत्वा-
दत्यर्थनिषेधोपदर्शनार्थमाह । गौडमिति गुडविकारं तस्य
विकारे अण । धाना अड्कुरितभृष्टयवा: । वल्लुरं शुष्कमांसम् ।
समशनं पथ्यापथ्ययोरेकत्रभोजनम् ।
सटिक च. चि. १२-२० पान ११२४ -२५

ग्राम्य व आनूप प्राण्याचें मांस, मीठ, वाळलेल्या भाज्या, नवीन धान्यें, गुळापासून व पीठापासून तयार केलेले पदार्थ, दहीं, आंबट पदार्थ, मद्य, मोड आलेलीं वा भाजलेलीं धान्यें, वाळलेलें मांस, पथ्यापथ्य पदार्थ एकत्र मिसळून खाणें, जड पदार्थ, असात्म्य द्रव्यें, विदाह उत्पन्न करणारीं द्रव्यें पूर्णपणें वर्ज्य करावीं. दिवसा झोपूं नये, मैथुन वर्ज्य करावा.

N/A

References : N/A
Last Updated : July 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP