प्राणवहस्त्रोतस् - जरा शोष

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


जराशोषी कृशो मन्दवीर्यबुद्धिबलेन्द्रिय: ।
कम्पनोऽरुचिमान् भिन्नकांस्यपात्रहतस्वर: (न:) ॥
ष्ठीवति श्लेष्मणा हीनं गौरवारुचिपीडित: ।
संप्रस्त्रुतास्यनासाक्षि: सुप्तरुक्षमलच्छवि: ॥

जराशोषीणमाह -
जराशोषी कृशो मन्देत्यादि । मन्दशब्दो वीर्यादिभि: प्रत्येकं
संबध्यते, वीर्य शक्ति:, बलम् ओजो हृदि स्थितं सप्तधातुधामभूतम् ।
पुनररुचिकथनमत्यन्तारोचकख्यापनार्थम् ।
संप्रस्त्रितशब्द: आस्यादिभिस्त्रिभि: प्रत्येक संबध्यते ।
आस्यं मुखकुहरम् अक्षि लोचनम् । सुप्तरुक्षत्वं प्रभायां, तथाऽपि
`मञ्चा: क्रोशन्ति' इतिवदुपचारात् प्रभायां बोद्धव्यम् ।
जेज्जटाचार्यस्तु जराशेषिणो लक्षणमन्त न पठति, सप्ततेसतूर्ध्व
क्षीयमाणेत्यादिना आतुरोपक्रमणीये उक्तस्त्त्वात ।
सु.उ. ४१-१९-२० सटीक, पान ७१२-१३

केशलोमनखश्मश्रुद्विजप्रपतनं श्रम:
ज्ञेयमस्थिक्षये रुपं सन्धिशैथिल्यमेव च ॥
च.सू.१ १७-६७ पान २१७

अस्थिक्षयेऽस्थिशूलं दन्तनखभडगे । रौक्ष्यं च ।
सु.सू. १५-९, पान ६९.

सप्ततेरुर्ध्व क्षीयमाणधात्विन्द्रियबलवीर्योत्साहमहन्यहनि
वलीपलितखालित्यजुष्टं कासश्वासप्रभृतिरुपद्रवैरभिभूयमानं
सर्वक्रियाऽसमर्थ जीर्णागारविमाभिवृष्टमवसीदन्तं वृद्धमाचक्षते ॥
सु.सू. ३५-२९, पान, १५५

ष्टीवति श्लेष्मणा हीनमिइ श्लेष्महरणाय यत्ने कृतेऽप न श्लेष्मनि:सरणम् ।
मा.नि. राजयक्ष्मा १७, म. टीका, पान १३०

म्हातारपणामुळें उत्पन्न होणार्‍या विशिष्टलक्षणयुक्त अवस्थेस जराशोष असें म्हणतात. केवळ वार्धक्य म्हणजे जराशोष नव्हे. म्हातारपण व त्यावेळीं जराशोष रुग्णाची म्हणून सांगितलेलीं लक्षणें व्यक्त जाली तरच जराशोषी म्हणावें. बहुधा सर्वच अतिवृद्धांच्या ठिकाणीं हीं लक्षणें व्यक्त होत असल्यामुळें जेज्जटानें जराशोषी असें वेगळें वर्गीकरण केलें नसावें. या व्याधीमध्यें म्हातारपणामुळें वाढलेल्या वातानें त्यांच्याशीं आश्रयाश्रयी भावानें संबद्ध असलेल्या अस्थिधातूचा क्षय होतो, अस्थिक्षयाचीं लक्षणें दिसतात. रोगी कृश होतो. शरीर दुर्बल होतें. बुद्धि आणि उत्साह मंदावतात, इंद्रियें आपापलीं कामें नीट करुं शक्त नाहींत, शरीर कापतें, तोंडास चव नसते, त्याचा आवाज फुटलेल्या काशाच्या भाण्डयाप्रमाणें चिरका होतो, लाळ गळते, नाकांतून व डोळ्यांतून पाणी गळते, कफ थुंकावासा वाटतो पण चांगलासा सुटत नाहीं. सर्व शरीर जड, कृश, निस्तेज होतें, कातडी शुष्क, रुक्ष अशी दिसते. मलहि शुष्क, रुक्ष असतो. केस गळतात. दांत पडतात. संधी शिथिल होतात. हाडें दुखतात. जराशोषामध्यें जरी प्रत्यक्ष अस्थिक्षयाचा उल्लेख नसला तरी टीकाकाराच्या उल्लेखाप्रमाणें व अस्थिक्षयामध्यें सांगितलेलीं बहुतेक लक्षणें म्हातारपणीं उत्पन्न होत असल्यामुळें जराशोष या व्याधीच्या संप्राप्तींत अस्थिक्षय गृहीत धरावा.

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP