मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|कृष्णजयंती| विष्णूचे आश्वासन कृष्णजयंती विषय कृष्ण जन्मकथा कथा आरंभिण्यास आज्ञायाचना कंसाचे अत्याचार पृथ्वीची देवांस प्रार्थना देवाची विष्णूस प्रार्थना विष्णूचे आश्वासन वसुदेव-देवकी विवाह व आकाशवाणी भ्रुणहत्या देवकी गर्भात भगवत्संचार कृष्णजन्म गोकुळांत आगमन कृष्णजयंती - विष्णूचे आश्वासन श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन विष्णूचे आश्वासन Translation - भाषांतर वसुदेवाचा मी तनय होवोनी । गोकुळी प्रगटोनी येतो आतां ॥१॥तुम्ही सकळ सुर व्हावे गोपवर । तैसे यादववीर व्हावे तुम्ही ॥२॥तुम्ही व्हावे गाई पशुपक्षी व्हावे । साहायार्थ यावे माझिया की ॥३॥घेवोनी अवतार मारितो कंसाला । ऐशीया वाणीला प्रगटवी ॥४॥शेष होईल तो माझा वडिल भाऊ । दोघे आम्ही येऊं रक्षणार्थ ॥५॥येईल लक्षुमी येतील आयुधे । चरित्र अगाधे करुं आम्ही ॥६॥भिऊं नका, सुर, मारितो दैत्यांसी । माझ्य़ा वचनासी निर्धारावे ॥७॥ऐशी विष्णुवाणी तेव्हा प्रगटली । सकळ आनंदली भुवने की ॥८॥विनायक म्हणे तोच अवतार । गावूं हो साचार आजदिनी ॥९॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP