कृष्णजयंती - कंसाचे अत्याचार

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


माथुर शूरसेन यांचे अधिराज्य । उग्रसेन राज्य करीतसे ॥१॥
तयाचा तनय महासुर कंस । करित जगास त्रस्त जाणा ॥२॥
उन्मत्त तो बळी त्यांत वरबळ । मातला तो खळ अनिवार ॥३॥
दैत्य जमविले आपुल्या भोवती । मुष्टिक चाणूरांप्रति कंसराजे ॥४॥
महा बलाढ्य दैत्य, सद अपराजित । स्वर्गठाव घेत देवांचे की ॥५॥
स्वर्गभ्रष्ट केले त्यांनी सुरवर । त्रासविली थोर पृथिवी की ॥६॥
वैष्णवांचा छळ तयांनी मांडीला । हाहा:कर झाला जगती या ॥७॥
सनातन धर्म बुडवाया झटती । पाखंड प्रस्थापिती दैत्यराज ॥८॥
वेदमार्ग सर्व तया अडविला । अनर्थ तो झाला महीवर ॥९॥
सकळ पृथ्वीमाजी पाखंड विजय । तेणे त्रस्त होय धरा सारी ॥१०॥
विनायक म्हणे पुढील चमत्कार । विनोद साचार जाहलासे ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP