मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|कृष्णजयंती| कथा आरंभिण्यास आज्ञायाचना कृष्णजयंती विषय कृष्ण जन्मकथा कथा आरंभिण्यास आज्ञायाचना कंसाचे अत्याचार पृथ्वीची देवांस प्रार्थना देवाची विष्णूस प्रार्थना विष्णूचे आश्वासन वसुदेव-देवकी विवाह व आकाशवाणी भ्रुणहत्या देवकी गर्भात भगवत्संचार कृष्णजन्म गोकुळांत आगमन कृष्णजयंती - कथा आरंभिण्यास आज्ञायाचना श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन कथा आरंभिण्यास आज्ञायाचना Translation - भाषांतर रविवार ता. १७-८-१९३०चरित्र तुझे गाया आज्ञा मज देई । सन्मुख तूं होई गुरुनाथा ॥१॥चरण वंदणे ह्रदयी धरोनी । तुजला सेवोनी दत्तात्रेया ॥२॥अवतारकथा वर्णाया कारण । स्थिर अंत:करण करोनियां ॥३॥आज्ञा मी मागतो तुझे चरणांपाशी । सादर सेवेसी होवोनियां ॥४॥मजसी आवड यशकीर्तनाची । पूर्ण करी साची दत्तकथा ॥५॥आम्हांसाठी स्थान तुवां हे निर्मिले । भजन लाविले करायासी ॥६॥भजन पूजन माझे नित्य करा । नामासी उच्चारा थोर भावे ॥७॥ऐसा तुझा आम्हां निरोप प्रेमाचा । आचरणे साचा गुरुनाथा ॥८॥जे जे अवतार पुराणी वर्णिले । उत्सव ते केले पाहिजेत ॥९॥भागवत धर्म ऐसा सांगितला । तोच चालविला पाहिजे की ॥१०॥म्हणोनियां देई आज्ञा आरंभाया । कीर्तन कराया तुझे दत्ता ॥११॥आवडीने गाऊं प्रेमभरे ध्याऊं । समरस होऊं कीर्तनात ॥१२॥ऐसे करा नाथा यावा आशीर्वाद । व्हावे जी वरद मजलागी ॥१३॥विनायक म्हणे पुरवा हा छंद । वासुदेवानंद गुरुनाथा ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP