गणेश जयंती - गणपतीचा धांवा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


कृपा कधी करणार । उडी कधी घालणार ॥१॥
दु:ख माझे हरणार । मजलागी तारणार ॥२॥
कधी सांग देवराया । शरण आहे तुझे पायां ॥३॥
माझी आतां दया यावी । उपेक्षा ती न करावी ॥४॥
विघ्ने माझी निवारावी । संकटे दूर करावी ॥५॥
आदिदेव गणपती । सकळांचे अधिपती ॥६॥
सर्व श्रुति-मंत्र जे का । अधिपती तूंच निका ॥७॥
म्हणोनियां ब्रह्मणस्पती । तुजलागी म्हणताती ॥८॥
मंत्रसामर्थ्य प्रगटी । गणपते माझेसाठी ॥९॥
तुझे चरण धरीले । शिर तुजला वाहिले ॥१०॥
आणिक काय करुं सांग । दिधले आहे अंतरंग ॥११॥
काय देणार तुजसी । काय आहे माझेपाशी ॥१२॥
सकळ ऐश्वर्याचा पति । तूंच एक गणपति ॥१३॥
विनायक करी नमन । येई आतां तूं धावोन ॥१४॥
==
गणपतीचा धांवा

दत्त माझा गणपती । सकळ सामर्थ्याचा पति ॥१॥
सकळ समूहाचा राजा । धांवो आतां माझे काजा ॥२॥
अन्नमय प्राणमय । सकळ तूंच गणराय ॥३॥
तरी आतां माझेसाठी । धांव घेई जगजेठी ॥४॥
उडी घाल जगन्नाथा । प्रार्थितो मी तुज समर्था ॥५॥
लाज राख माझी आतां । शरण तुज भगवंता ॥६॥
विनायक पददास । याची पुरवावी आस ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP