गणेश जयंती - गणपतीचा त्रिगुणात्मक भाव

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


सकळांचा गुरु प्रत्यक्ष परब्रह्म । असे परंधाम गजानन ॥१॥
प्रत्यगात्मा तैसा असे परमात्मा । स्वयं ज्योति आत्मा गणपती ॥२॥
ज्ञानरुप आहे विश्व नटलासे । सूत्र हालवितसे आपणची ॥३॥
गणपती हाच सर्व देवाधिदेव । त्याचा श्रेष्ठ भाव जगत्रयी ॥४॥
सच्चिदानंदरुप चैतन्य केवळ । सर्वात प्रबळ सामर्थ्याचा ॥५॥
अकार उकार आणि तो मकार । मिळोनी ओंकार रुप जाण ॥६॥
तेच रुप आहे जाण गणेशाचे । परब्रह्म साचे नटले हे ॥७॥
गजाचे ते मुख प्रणव सदृश । तेच जगदीश धरीतसे ॥८॥
मध्ये नारायण बाजूसी विधिशिव । त्रिगुणात्मक भाव ऐसा जाणा ॥९॥
ब्रह्माविष्णुशिवमय गणपति । सद्गुरु निश्चिती सकळांच ॥१०॥
विनायक म्हणे त्रिगुणात्मक देव । ब्रह्मा विष्णु शिव एकवटले ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : January 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP