गणेश जयंती - गणपतीचे ध्यान

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


मायाघर देव सगुण जाणावा । ध्यानांत धरावा तोच सदा ॥१॥
ऐक्य भाव त्यासी जोडोनियां यावा । चित्ताचा करावा तेथे न्यास ॥२॥
चित्त-चिंतामणि गणपति जाण । दाविल सगुण रुपासी तो ॥३॥
आवडीचे रुप चित्तांत बिंबेल । तन्मय होईल चित्त सारे ॥४॥
शुद्ध स्फ़टिकसम चित्तासी ग्रहण । स्वरुप सगुण जोडेल की ॥५॥
चित्त गणपती होवोनी राहिल । अनुभवा येईल ध्यानामाजी ॥६॥
विनायक म्हणे नित्य करा ध्यान । तो गौरीनंदन चित्तीं ठेवा ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP