मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|भागवतमाहात्म्य| अध्याय ३ रा भागवतमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा भागवतमाहात्म्याचा सारांश भागवतमाहात्म्य - अध्याय ३ रा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत भागवतमाहात्म्य - अध्याय ३ रा Translation - भाषांतर १७कुमारांसी तदा बोले नारद । भक्तिज्ञानादिक स्थापीन मी ॥१॥शुकोक्त्स कथा ती गाईन सप्रेम । यथार्थ त्या स्थान दावा मज ॥२॥नारदासी तदा बोलले कुमार । स्थान गंगाद्वार सुविख्यात ॥३॥समीपचि त्याच्या ‘आनंद’ नामक । पुण्यस्थान एक बहु श्रेष्ठ ॥४॥सुवर्णकमळसौरभसंयुक्त । रमताती जेथ सिद्ध, मुनी ॥५॥ज्ञानयज्ञ तेथ होईल सफल । सपुत्र सबल होई भक्ति ॥६॥वासुदेव म्हणे नारदासमेत । गेले सनकादिक तयास्थानीं ॥७॥१८भागवतीकथा श्रवणार्थ तेथें । समुदाय लोटे ज्ञानियांचा ॥१॥वसिष्ठ, गौतम, मेधातिथि, राम । शाकल, च्यवन, पिप्पलाद ॥२॥मूर्तिमंत वेदवेदान्त पातले । नद्या नद आले सकल तेथ ॥३॥देव, ऋषि, मंत्र, शास्त्रें, जपी, तपी । नरनारी येती बालवृद्ध ॥४॥‘जय’ ‘नम:’ शब्दें कोंदले गगन । उधळिती जन लाह्या पुष्पें ॥५॥यापरी उत्सुक एकचित्त जनां । माहात्म्य त्या स्थाना कथिती मुनि ॥६॥वासुदेव म्हणे साक्षात् कुमारोक्त । ऐका भागवतमाहात्म्य हें ॥७॥१९कुमार बोलती ऐका हो सज्जन । शुकशास्त्रें ज्ञान करस्थित ॥१॥ऐकावी सर्वदा भागवती कथा । हृदयीं जगन्नाथा सांठवावें ॥२॥ग्रंथ अष्टादशसहस्त्र हा असे । द्वादश एथींचे असती स्कंध ॥३॥शुक-परिक्षितसंवाद जोंवरी । श्रवणीं न तोंवरी पुनजन्म ॥४॥भागवतावीण व्यर्थ सर्व शास्त्रें । तीर्थरुप व्हावें स्थान येणें ॥५॥सकलही यज्ञ शतांश न याच्या । लेशही पापाचा न उरे येणें ॥६॥वासुदेव म्हणे पुण्य नद्या, तीर्थे । तुच्छ कुमारांते भागवतें ॥७॥२०श्लोकार्थ वा श्लोकपाद नित्य गातां । मोक्ष येई हाता निश्चयानें ॥१॥ओंकार, गायत्री, तेंवी पुरुषसूक्त । तुलसी, भागवत समान हीं ॥२॥कोटिजन्मकृत पाप नासे येणें । अंती या श्रवणें मुक्ति लाभे ॥३॥सुवर्णसिंहेंसी अर्पितां हें द्विजा । लाभूनि सायुज्या कृतार्थता ॥४॥एकदांही एकचित्तें भागवत । ऐके न तो व्यर्थ जन्मूनियां ॥५॥भाररुपचि तो शवासम जनीं । स्वल्पही हें ध्यानीं घेई न जो ॥६॥वासुदेव म्हणे कोटिजन्मपुण्य । फळतां श्रवण घडे याचें ॥७॥२१काळवेळ नसे श्रवणासी याच्या । नित्य श्रवणाचा लाभ घ्यावा ॥१॥सत्य, ब्रह्मचर्यादिक ते पाळून । सप्ताहश्रवण करणें योग्य ॥२॥वृत्तिविजयादि शक्यता जाणून । सप्ताहनियम केला असे ॥३॥नित्य किंवा माघमाससप्ताहीं वा । समान जाणावा पुण्यलाभ ॥४॥अल्पायुष्य, रोग, चांचल्य जाणूनि । सप्ताह या जनीं रुढ केला ॥५॥सर्वही साधनीं सप्ताह वरिष्ठ । साधन हें श्रेष्ठ कलीमाजी ॥६॥वासुदेव म्हणे उद्धवासी कृष्ण । बोलला वचन तेंचि ऐका ॥७॥२२उद्धव कृष्णासी म्हणे हे गोविंदा । जातां तूं या जगा शरण कोण ॥१॥चिंतूनि तैं हरि स्वकीय तेजासी । स्थापी भागवतीं भक्तांस्तव ॥२॥तेणे हे वाड्मयी मूर्ति श्रीकृष्णाची । दर्शनेंही नाशी सकल पाप ॥३॥सप्ताहश्रवण करिती सर्व जन । तेणें धन-धान्य वृद्धि पावे ॥४॥चित्तशुध्यर्थही ऐकावा सप्ताह । मुख्य हा उपाय मायानाशा ॥५॥वासुदेव म्हणे कुमारांचे बोल । ऐकतां नवल होई तेथें ॥६॥२३ज्ञानवैराग्यांसी लाभलें तारुण्य । लावण्यसंपन्न प्रगटे भक्ति ॥१॥श्रीकृष्ण गोविंद हरे हे मुरारे । प्रेमनादें भरे स्थान तदा ॥२॥भक्ति म्हणे अद्य जाहलें मी पुष्ट । कलिदोष नष्ट सकल होतां ॥३॥बोलूनियां ऐसें हरिदासचित्तीं । प्रवेशली भक्ति आनंदानें ॥४॥निर्धनही धन्य जयां हरिभक्ति । भगवंतचित्तीं करी वास ॥५॥भागातगानें श्रोता-वक्ता तोही । कृष्णरुप होई भावबळें ॥६॥वासुदेव म्हणे भक्तिभावें देव । हृदयीं वास्तव्य करीतसे ॥७॥ N/A References : N/A Last Updated : October 31, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP