मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|भागवतमाहात्म्य| अध्याय २ रा भागवतमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा भागवतमाहात्म्याचा सारांश भागवतमाहात्म्य - अध्याय २ रा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत भागवतमाहात्म्य - अध्याय २ रा Translation - भाषांतर १२बोले नारद भक्तीसी । चिंता न करावी ऐसी ॥१॥स्मरें कृष्णपादपद्मां । भक्तांसी तो विसरेना ॥२॥रक्षियेलें द्रौपदीसी । तेंवी संकटीं गोपींसी ॥३॥कोठें गेला न तो कृष्ण । प्रिय तूं त्या प्राणाहून ॥४॥पाचारणें तुझ्या देव । घेई नीचगृहीं धांव ॥५॥एकमेव कलीमाजी । साधन तूं मोक्षाप्रति ॥६॥करीं भक्तांचा उद्धार । वचन मानिलें त्वां थोर ॥७॥वासुदेव म्हणे ऐसें । कथी नारद भक्तींतें ॥८॥१३मुक्ति तुझ्या द्वारीं काढीतसे केर । वैराग्य किंकर ज्ञानसवें ॥१॥वैकुंठ निवासी पातलांती खालीं । युगत्रय झाली कीर्ति बहु ॥२॥पाखंडरोगानें मुक्ति होई ग्रस्त । पुत्र तुझे वृद्ध तेणेंचि हे ॥३॥कलीसम परी नसे अन्य युग । चिंता लवमात्र करुं नको ॥४॥वचन तुजसी देतों मी या युगीं । स्थापीन तुजसी घरोघरीं ॥५॥ज्ञान-वैराग्यही करीन जागृत । यत्न अहर्निश करुनियां ॥५॥वासुदेव म्हणे सनत्कुमारांसी । नारद हें कथी वृत्त सारें ॥७॥१४भक्ति तयावेळीं बोले नारदासी । सावध बाळांसी करीं माझ्या ॥१॥नारदें त्यावेळीं अंगावरी हस्त - । फिरवूनि, वेद-वेदान्ताचा- ॥२॥उच्चावर करुनि, गीतापाठ केला । जागृति त्या काला येई तयां ॥३॥जराजीर्णत्रस्त पुनरपि दोघे । टाकिती भूमीतें अंग वेगें ॥४॥तदा ईश्वराचा धांवा करी मुनि । होई नभोवाणी तयावेळीं ॥५॥नारदा न करीं चिंता साधु तुज । कथितील मार्ग न करीं खेद ॥६॥वासुदेव म्हणे ऐकूनि नारद । साधुदर्शनार्थ हिंडूं लागे ॥७॥१५हिंडतां हिंडतां बदरिकाश्रमीं । सनकादि मुनि भेटले त्या ॥१॥विनवितां तयां कथिती ज्ञानयोग । कथाश्रवण मार्ग असे ज्याचा ॥२॥भागवतग्रंथ सप्ताह करावा । वर्णिलें माधवा जये ग्रंथीं ॥३॥मुनि म्हणे साध्य नसे जें वेदांतें । कैसें भागवतें लाभेल तें ॥४॥कुमार बोलती उपनिषत्सार । बोलला तें कीर भागवत ॥५॥वृक्षस्थ रसाची रुचि जैं फळांत । दुग्धाहूनि स्वाद घृतामाजी ॥६॥इक्षुदंडाहूनि गोडी शर्करेची । तैसी भागवतीं अपूर्वता ॥७॥वासुदेव म्हणे भागवत ग्रंथ । केला प्रकाशित ज्ञानार्थ हा ॥८॥१६वेद-वेदान्तज्ञ गीतेचा जो कर्ता । ऐके भागवता तदा शांत ॥१॥चतु:श्लोकरुपें त्वांचि तें कथिलें । समाधान झालें व्यासांचें तैं ॥२॥ऐसें तें साधन ऐकवीं भक्तीसी । क्लेश दैन्य नाशी क्षणार्धे तें ॥३॥ऐकूनि नारद आनंदित होई । शरण त्या जाई जगदीशासी ॥४॥अनंतजन्मींच्या पुण्यें तो लाभतां । पावूनि विवेका शांतिलाभ ॥५॥वासुदेव म्हणे स्थान सप्ताहाचें । कथिती कुमार तें ऐका आतां ॥६॥ N/A References : N/A Last Updated : October 31, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP