मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसद्गुरुलीलामृत|उत्तरार्ध|अध्याय बारावा| समास तिसरा अध्याय बारावा समास पहिला समास दुसरा समास तिसरा समास चवथा अध्याय बारावा - समास तिसरा श्रीसद्गुरुलीलामृत Tags : pothisanskritपोथीसंस्कृत समास तिसरा Translation - भाषांतर श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीगुरुभ्यो नम: । श्रीराम समर्थ ॥ समाधी क्षेत्र स्थापिलें । पाकगृह भव्य केलें । धान्याचें कोठार भरलें । अन्नछत्रं गुरुगृही ॥१॥सज्ज नगडीं उच्छाहपध्दति । तैसीच येथेंहि ठेविती । दुर्लभ सेवा अंगिकारिती । सच्छिष्य बहुतांपरी ॥२॥श्रींची मूर्ती उचलणें हे जालना मठानें करणें । भालदार चोपदार ललकारणें । आटपाडी आणि पंढरी ॥३॥येथील मंदिरवासी यांनी । सेवा घेतली नेमोनी । अबदागिर्या श्रींचे स्थानीं । धरिती तेही परिसावे ॥४॥मोरगिरी आणि सोलापूर । मठपती येथील साचार । सूर्यपानें सद्गुरुवर । धरिती बहु प्रीतीनें ॥५॥विटेकर भंडारे । गोंदवलेवासी दुसरें । नित्य वारिती चामरें । महोत्साहीं गुरुगृहीं ॥६॥बेलधडी आणि गिरवीकर । मंदिरवासी भक्त थोर । मोर्चलें वारिती साचार । विंझणेकरीं परिसावे ॥७॥म्हासुरणे आणि कुरवलीकर । मंदिरवासी भक्त थोर । विंझणे वारिती प्रेमे फार । श्रीचरणीं प्रीतीनें ॥८॥नामधारक भक्त प्रजा । छत्रपति गुरुमहाराज । यांचे सोहाळ्यांतील समाजा । कर्हाड मठपती छ्त्रधरी ॥९॥रुमाल वाले दोघेजन । बाळकूबुवा कलढोण । गोविंदबुवा कुरवलीकर जाण । प्रेमळ भक्त श्रींचे ॥१०॥धनुष्यबाण चौघे धरिती । कागवाड पाटण खेर्डी वदती । तैसीच सांगती मंदिराप्रती । सेवा दिधली नेमोनी ॥११॥दिवट्या पाजळिल्य्या कोणी । तेंही परिसावें सज्जनी । हरदा आणि शेंदुरजनी । मांडवे आणि दहिवडी ॥१२॥नित्य पूजाअर्चन । भीमराव मोडक कुशल पूर्ण । चित्रविचित्र शृंगारुन । मन वेधिती सकळांचे ॥१३॥म्हासुर्णेकर शास्त्रीबुवा गुणी । पुराण वाचिती श्रीसदनीं । कीर्तनसेवेलागोनी । बहुत येती गुणिजन ॥१४॥परि सांगलीकर हरिदास । लळित नेमलें सेवेस । सांगलीकर फडणवीस । आरती धरिती भक्तीनें ॥१५॥शालिग्राम गुरुजी विद्वान । सेवा करिती तबक व्यंजन । देशपांडे आटपाडीकर जाण । घोडा धरीती श्रीपुढें ॥१६॥माळि भक्त दहिवडीचे । वाहन झाले श्रीचे । पालखी धरोन साचे । गुरुसेवा साधिती ॥१७॥शिवणीकर नापित येवोन । दर्पन दावित श्रीलागोन । गुरुहटके धरिती जाण । हुबळीचे मठपती ॥१८॥रांगोळ्या घालिती केतकर । चित्रविचित्र मनोहर । गंध उपाध्याय चतुर । सकळाकारणें लाविती ॥१९॥बारसवडे गोंदवलीचे । काज करिती उच्छिष्टाचें । गोमयगोळा घेवोन वेचे । शीत तेही परिसावे ॥२०॥दत्तू नामे इंदोरकर । लेखक भाविक सात्विक थोर । गोरक्षणीं मदतगार । श्रीचरणीं देह लावी ॥२१॥दाढें उपनामक अंताजीपंत । कीर्तनसमयीं बुका लावित । आरती श्रींसी ओवाळित । क्षीरापती वांटीतसे ॥२२॥अत्तरगुलाब तांबुलोपचार । पुष्पमालादी सोपस्कार । श्रींचे दरवारी पुणेकर । सेवा घेती नेमोनी ॥२३॥ऐसे हे गुरुभक्तजन । मिळवतील दुर्लभ स्थान । तयांसी सद्भावें नमन । करुं सेवा एवढीच ॥२४॥पुढेंही येतील आणिक । सेवितील गुरुसेवासुख । परस्परी प्रापंचिक । त्यांची गणती कोण करी ॥२५॥असो समर्थाची गोशाळा । वांटिली होती पाळावयाला । परी अवर्षणें दिधला झोला । आणूनि सोडती गुरुचरणीं ॥२६॥पुनरपि गोरक्षणसंस्था । स्थापन झाली जी तत्वता । आली अनाथांचे नाथा । पाशीं मूक जनावरें ॥२७॥अश्वपालक विश्वनाथ । नारायण कर्नाटकी भक्त । इंदुरकर दत्तोपंत । गोरक्षणीं बहु झटती ॥२८॥बसाप्पा तेलंगण देशीं । नामस्मरणें अघनाशी । देह झिजवी समाधीपाशीं । मौनव्रत धरोनी ॥२९॥ऐसे अनेक सेवा करिती । कांही केली उपपत्ती । आतां परिसावी श्रोतीं । समाधीलीला ॥३०॥समाधिस्थान विवरीं झालें । वरती मंदिर बांधिलें । गोठणीं गोपाल शोभले । कैसे तेही अवधारा ॥३१॥समर्थ जातां गोशाळेसी । विनोदें वदती सर्वासी । येथें गोपालमंदिरासी । करितां बहु शोभेल ॥३२॥ऐसें वदले बहुत वेळ्दा । तें आठवलें जी सकळां । गोशाळी घनसावळा । श्रीसंनिध असावा ॥३३॥ब्रह्मानंद सिध्द यांनी । तेंचि कर्थिले येवोनि । तेव्हां समाधिशिरस्थानीं । गोपाल मंदिर बांधले ॥३४॥कामें वांटिली बहुवस । तेणें स्थापना लावली विशेष । शके अठराशें बेचाळिस । वैशाखीं मुहूर्त शोधिला ॥३५॥श्रीमत् भागवत यांनी । मूर्ती दिधली आणवोनी । पाहतां प्रेम ये भरोनी । गोंडस तेजस हास्यमुख ॥३६॥तें मुरलीधराचे ध्यान । पाहतां वेधितसे मन । यास्तव सुवासिनी येवोन । दृष्ट काढिती वेळोवेळां ॥३७॥सात दिवस नामगजर । केला उत्साह बहुथोर । भक्त येती अपार । गोपालमूर्ती पहावया ॥३८॥वैशाख शुध्द त्रयोदशी । मूर्ती स्थापिली विधीसी । साठयें उपनाम जयांसी । गुरुभक्त यांचे करवीं ॥३९॥सप्त ठांईचीं जीवनें । घालिती कृष्णा मंगलस्नानें । वेदघोषें नामस्मरणें । मुरलीधरा बैसविलें ॥४०॥हुबळीकर मल्लाप्पा यांही । खर्च केला तेसमयीं । नित्य पूजा उच्छाहीं । नेमणुक करुन दिधली ॥४१॥असो ऐसे देवभक्त । एकेस्थळीं शोभा पावत । अनन्याचे अनंत होत । पुरवावया राहिले ॥४२॥सद्गुरुवास निरंतर । ऐसा रोकडा साक्षात्कार । भाविकांस पैलवार । भावबळें पावविती ॥४३॥नाना नवसाते पावतीं । संकटी दृष्टांतीं बोधिती । सेवा करितां पुरविती । कामना बहुपरिच्या ॥४४॥अंतरसाक्ष अंतर कळी । बाह्य दृष्य तें आढळे । वर्णितां होईल आगळें । ग्रंथसंस्था प्रमाण ॥४५॥परी एखादा दृष्टांत । देऊन पुरवूं मनोरथ । समाधीमहात्म्य अत्युदभूभा । कोण वर्णू शकेल ॥४६॥अप्पासाहेब कागवाडकर । स्मृतिहीन झाले फार । ब्रह्मसमंधे जर्जर । केले पूर्वीसारिखें ॥४७॥पुत्रकलत्रा पीडीतसे । कर्त्यासी लाविलें पिसें । तमोबुध्दी गृहीं वसे । उपाय सुचों देईना ॥४८॥ऐसे गेले कांही दिवस । चिंता उपजली सर्वास । मग समाधीसमीप सेवेस । धाडिइले मायबंधूनि ॥४९॥सेवा करितां बहुवस । श्रीमंत आले स्मृतीस । वारंवार नमिती पदास । ब्रह्मचैतन्य गुरुच्या ॥५०॥पूर्वी जैसे साह्य होती । त्याहून अधिक शीघ्रगती । समाधीसेवेसी पावती । आश्चर्य नारीनरांसी ॥५१॥देहव्याधी मुक्त करिती । निपुत्रिका पुत्र होती । मुमुक्षु जना संरक्षिती । पाठीपोटी राहोनी ॥५२॥शंकरशास्त्री ह्मासुर्णेकर । यांचे स्नुषेसी निशाचर । पीडीतसे वारंवार । घालिती समर्थ चरणावरी ॥५३॥सेवा करिता अतिगहन । पीडा निवारिली दारुण । ऐसे समाधी महिमान । श्रोतेजनीं परिसावें ॥५४॥श्रीचरणीं जे अनन्य । तयांसी प्रत्यक्ष दर्शन । देवोनी करिती समाधान । ब्रह्मचैतन्यसदगुरु ॥५५॥इति श्रीसद गुरुलीलामृते द्वादशोध्यायांतर्गत तृतीय समास :॥ श्रीसदगुरु ब्रह्मचैतन्य महाराजकी जय । ओवीसंख्या ॥५५॥॥ श्रीगुरुपादुकार्पणमस्तु ॥॥श्रीराम समर्थ ॥ N/A References : N/A Last Updated : October 23, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP