मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|दांभिकास शिक्षा| ६०४१ ते ६०५० दांभिकास शिक्षा ५९६३ ते ५९७० ५९७१ ते ५९८० ५९८१ ते ५९९० ५९९१ ते ६००० ६००१ ते ६०१० ६०११ ते ६०२० ६०२१ ते ६०३० ६०३१ ते ६०४० ६०४१ ते ६०५० ६०५१ ते ६०६० ६०६१ ते ६०७० ६०७१ ते ६०८० ६०८१ ते ६०९० ६०९१ ते ६१०० ६१०१ ते ६११० ६१११ ते ६१२० ६१२१ ते ६१३० ६१३१ ते ६१४० ६१४१ ते ६१५० ६१५१ ते ६१६० ६१६१ ते ६१७३ दांभिकास शिक्षा - ६०४१ ते ६०५० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत दांभिकास शिक्षा - ६०४१ ते ६०५० Translation - भाषांतर ॥६०४१॥एक ह्मणती आह्मी देवचि पैं झालों । ऐसें नका बोलों पडाल पतनीं ॥१॥एक ह्मणती आह्मी देवाचीं पैं रुपें । तरी तुमचिया बापें न चुके जन्म ॥२॥देवें उचलिली स्वकरें मेदिनी । तुमचेनीं गोणि नुचलवे ॥३॥देवें मारियेलें दैत्य दानव मोठे । तुमचेनीं न तुटे तृणमात्र ॥४॥रायाविठोबाचें पद जो अभिळाषी । पातकाची राशी तुका ह्मणे ॥५॥॥६०४२॥ह्मणवितां हरिदास कां रे नाहीं लाज । दीनास महाराज म्हणसी हीना ॥१॥काय ऐसें पोट न भरे तें गेलें । हालविसी कुले सभेमाजी ॥२॥तुका म्हणे पोटें केली विटंबना । दीन झाला जना कींव भाकी ॥३॥॥६०४३॥अडचणीचें दार । बाहेर माजी पैस फार ॥१॥काय करावें तें मौन्य । दाही दिशा हिंडे मन ॥२॥बाहेर दावी वेश । माजी वासनेचे लेश ॥३॥नाहीं इंद्रियां दमन । काय मांडिला दुकान ॥४॥सारविलें निकें । वरि माजी अवघें फिके ॥५॥तुका म्हणे अंतीं । कांही न लागेचि हातीं ॥६॥॥६०४४॥लटिक्याचे वाणी चवी ना सवाद । नाहीं कोणां वाद रुचों येत ॥१॥अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापीं वेळा न साधिली ॥२॥अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तांतडीनें मन लाहो साधी ॥३॥तुका म्हणे दोष आणि आवकळा । न पडतां ताळा घडतसे ॥४॥॥६०४५॥दाढी डोई मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरती बरवें वस्त्र काळें ॥१॥उफराटी काटी घेऊनियां हातीं । उपदेश देती सर्वत्रांसी ॥२॥चाळवुनी रांडा देउनियां भेष । तुका म्हणे त्यांस यम दंडी ॥३॥॥६०४६॥लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले ॥१॥खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैंचा ॥२॥सेवी भांग अफू तमाखू उदंड ॥ परि तो अखंड भ्रांतीमाजी ॥३॥तुका म्हणे ऐसा सर्वस्वें बुडाला । खासी अंतरला पांडुरंग ॥४॥॥६०४७॥जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥२॥तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥३॥तुका म्हणे द्रव्य घेती ॥ देती ते ही नरका जाति ॥४॥॥६०४८॥किती सोसिती करंटीं । नेणों संसाराची आटी ॥१॥पोटीं सर्वकाळ । चिंतेची हळहळ ॥२॥रिकामिया तोंडें राम । काय उच्चारितां श्रम ॥३॥उफराटा भ्रम । गोवीं विषय माजिरा ॥४॥॥६०४९॥कळतां न कळे । उघडे झांकियेले डोळे ॥१॥भरलें त्याचे चाळे । अंगीं वारें मायेचें ॥२॥तुका ह्मणे जन । ऐसें नांव बुद्धिहीन ॥३॥बहुरंगें भिन्न । एकीं एक निमालें ॥४॥॥६०५०॥जाणे वर्तमान । परि ते न वारे त्याच्यानें ॥१॥तो ही कारणांचा दास । देव ह्मणवितां पावे नास ॥२॥वेची अनुष्ठान । सिद्धी कराया प्रसन्न ॥३॥तुका ह्मणे त्याचें ॥ मुदल गेलें हाटवेचें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 11, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP