श्रावण शुद्ध ६

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


रामकृष्ण परमहंसांची समाधि !

शके १७८८ च्या श्रावण शु. ६ रोजीं भारतांतील जगप्रसिध्द सिध्द पुरुष व वेदान्तप्रतिपादक रामकृष्ण परमहंस यांनीं समाधि घेतली>
भारतीय संस्कृतीचा प्रसार सर्व जगांत करणारे विख्यात स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसाचेच शिष्य. लहानपणींच कलकत्त्याच्या दक्षिणेश्वराच्या मंदिरांत कालीची उपासना करीत असतांना एक आध्यात्मिक संत म्हणून स्वामी रामकृष्णांचा लौकिक वाढूं लागाला. नास्तिक्याकडे झुकलेल्या, गांगरलेल्या आणि स्वत्व विसरलेल्या भारताला यांचा संदेल नवचैतन्य देणारा ठरला. केवळ मतांच्या आणि मतांतरांच्या मागें लागूं नका. केवळ पंथांच्या आणि धर्मसमजुतींच्या मागें लागूं नका. त्यांना फारसें महत्त्व नाहीं. तुमच्या स्वत:च्या अंतर्यामीं जें सत्य वास करीत आहे, तेंच तुम्ही अधिक प्रकाशमय केलें, तर त्यापासून अधिक हिताची प्राति होईल. याकरितां परक्यावर टीका करीत न बसतां आत्मसंशोधन करा. सर्व मतांत आणि सर्व धर्मात सत्याचा कांहीं अंश असतोच. धर्म म्हणजे पोकळ शब्द नव्हत अथवा नुसता बाह्याचार हाहि धर्म नसून आत्मानुभव हा खरा धर्म आहे. हें स्वत:च्या आचारणानें तुम्ही सिध्द करा. आत्मानुभवी असतील त्यांनाच या गोष्टीचा उमज पडेल. आत्मानुभव ज्यांना प्राप्त झाला असेल, तेच इतरांस तो देऊं शकतील. हेच पुरुष मानवजातीचें गुरु होऊं शकतील. प्रकाशाचें सामर्थ्य फक्त अशांनाच प्राप्त होईल. हा तो संदेश होता.
फ्रान्सचे माँ. रोमाँ रोलाँ यांनीं रामकृष्ण परमहंसांविषयीं म्हटलें आहे: -
He was the crowning glory of the interior life of two thousand years in a people of three hundred millions. He spoke with a gentle tone, yet his almost silent musings penetrated deep into the heart of listeners without a rapture, and modelled many a life slowly but surely.
- १५ आँगस्ट १८६६

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP