TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

वैशाख वद्य १४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


वैशाख वद्य १४
खंडेराव दाभाडे यांचा मृत्यु !

शके १६५१ च्या वैशाख व. १४ रोजीं मराठेशाहीच्या आपत्‍ प्रसंगीं पराक्रम गाजविनारे खंडेराव दाभाडे यांचें निधन झालें.
दाभाडे घराण्याचा मूळ पुरुष येसाजी. याचा खंडेराव हा थोरला मुलगा. छत्रपति राजाराममहाराज जिंजीस गेले तेव्हां तो त्यांचेबरोबर होता, तेथून परत आल्यावर छत्रपतींनीं त्यांना सेनाधुरंधर हें पद देऊन खंडेरावास गुजराथकडे व बागलाणाकडे मुलुखगिरीवर पाठविलें. आणि वस्त्रें व पोशाख देऊन निशाण व जरिपटका हवालीं केला. पुढें शाहूनें त्याला सेनापतिपद दिलें. त्याच वेळीं दिल्लीच्या बादशहानें दख्खनचा सुभेदार सय्यदबंधूंपैकीं हुसेन अल्ली याच्याविरुध्द उठविण्यास शाहूस कळविलें असतां शाहूनें ते काम खंडेरावावर सोंपविलें. यानें खानदेश - गुजराथवर स्वार्‍या करुन हुसेनचा रस्ता अडवून त्याची फौज कापून काढली. यानंतर शाहूनें त्याला कळवलें कीं, “आपण गुजराथ व काठेवाडाकडे मराठयांचा अमल बसवावा. दरमहा हुजूरखर्चास ऐवज देत जावा. फौज बाळगावी, थोरले महाराज धान्य व नक्त श्रावणमासीं धर्मादाय देत असत. तो सेनापति यांनीं आपल्या तालुक्यांपैकीं दोनचार लाख रुपये खर्च करुन कोटि लिंगें ब्राह्मणांकडून करीत जावीं.”
बाळापूरच्या लढाईत तो हजर असून फत्तेसिंग भोंसल्याच्या आधिपत्याखालीं कर्नाटकांत झालेल्या स्वारींतहि त्याची कामगिरी मोठी होती. वसई ते सुरतपर्यंतचें कोंकण काबीज केल्यामुळें शाहूनें त्याच्याबद्दल पुढील उद्‍गार काढले, “बडे सरदार मातबर, कामकरी, हुषार होते,” इतिहासप्रसिध्द उमाबाई दाभाडे ही त्यांचीच पत्नीइ. त्यांचा मुलगा त्रिंबकराव हाहि बापासारखा शूर होता. संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत, शंकराची नारायण, इत्यादि लोकांपेक्षां राजाराममहाराजांनीं खंडेरावास जास्त उत्पन्न दिलें होतें. जवळजवळ सातशें गांवांची देशमुखी त्याला मिळाली असल्यानें तो वतनदाराचा मुकुटमणि ठरतो. त्यांचा पराक्रम विशेष दर्जाचा होता. अनेक प्रसंगीं त्यांनीं आपल्या शौर्यानें मराठेशाहीचें नांव राखलें आहे.
- १५ मे १७२९

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-09-19T21:56:53.1400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ओपणी

  • स्त्री. विकणें ; विक्री . ओपणें पहा . 
  • स्त्री. ओप देण्याचें हत्यार ; सळई . ( ओप ) 
  • स्त्री. ( वपणें ) पेरणें ; लावणी टुपणी ; लावणी वेणणी . ( सं . वप् ) 
  • स्त्री. १ समर्पण ; सुपूर्त करणें . २ वधूपिता वर पित्याच्या व वधूमाता वरमातेच्या मांडीवर वधुस बसवितात तो विधि . ( ओपणें ) 
RANDOM WORD

Did you know?

Are we transliterating everything? Do we copy that from some other websites?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site