वैशाख वद्य १३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


पांडव अज्ञातवासास निघाले

वैशाख व. १३ या दिवशीं द्यूतांत पराभव झाल्यामुळें पांडव बारा वर्षांच्या वनवासास व एक वर्षाच्या अज्ञातवासास निघाले.
सर्वस्व हरण झाल्यावरहि धर्मराज पुन्हा द्यूत खेळावयास बसला. आतां कोणता पण होता ? तर जो हरेल त्यानें बारा वर्षे वनवास भोगावा व एक वर्ष अज्ञातवासांत काढावें. पूर्वीप्रमाणेंच कपटानें डाव टाकून शकुनीनें ‘जित’ म्हणून पण जिंकला !
पांडवांनीं आपलीं बहुमोल वस्त्रें टाकून देऊन वल्कलें धारण केलीं. दु;शासनान दौपदीसंबंधानें गलिच्छ उद्‍गार काढल्याबरोबर भीम संतापून गेला; आणि त्याचा वध युध्दांत करण्याची प्रतिज्ञा भीमानें केली. जाण्यापूर्वी धृतराष्ट्रास नमस्कार करुन युधिष्ठिर म्हणाला, “ईश्वराच्या दयेनें वनवास संपल्यावर मी आपल्या पायांचें दर्शन घेण्यास पुन्हा येईन.” या वेळीं भीष्म - द्रोणांचीं मनें दु:खानें आणि लज्जेनें करपून गेलेलीं असल्यामुळें त्यांनीं कांहींच उत्तरें दिलीं नाहींत. द्रौपदीहि, कुंती, गांधारी यांचा निरोप घेण्यास निघाली. कुंतीनें तिला नीट उपदेश केला. धर्मानें वागणारे पांडवहि यानंतर वनवासास निघाले. सर्वाच्यापुढें युधिष्ठिर, त्याच्यामागून क्रमानें भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, दौपदी व धौम्य असे चालले. जातांना धर्मानें आपले डोळे हातांनीं झांकले होते; भीम आपल्या प्रचंड बाहूंकडे पाहत होता; अर्जुन रस्त्यानें वाळू टाकीत होता, सहदेवानें आपल्या तोंडास काळें फासलें होतें; व नकुलानें आपलें सर्वाग धुळीनें माखले होते. दौपदी आपले केस फसलें होतें; व नकुलानें आपलें सर्वांग धुळीनें माखले होते. दौपदी आपले केस मोकळे सोडून आणि त्या केसांनीं आपलें तोंड झांकून रडत चालली होती. पांडव वनवासास निघाले तेव्हां सृष्टिमातेनेंहि आपलें दु:ख उत्पात व अपशकुन यांच्या व्दारां प्रकट केलें. नारद धृतराष्ट्राकडे येऊन बोलले, “दुर्योधनाच्या या अपराधांमुळें सर्व कौरवांचा व क्षत्रियांचा भीमार्जुनांच्या हातून युध्दांत संहार होणार !” कौरवपक्षास अर्थातच त्याबद्दल पांडवांच्या वनवास - गमनाबद्दल कांहीं वाईट न वाटतां उलट आनंदच झाला. ‘आजपासून दुर्योधन सार्वभौम राजा झाला’ असें कर्णानें म्हटल्यावर धृतराष्ट्रासहि हर्ष झाला.

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP