मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|छंदोमंजरी|परिशिष्ट आ| अथ खंडमेरुसंज्ञार्थमत्कृतं सूत्रम् परिशिष्ट आ अथ छंदोमंजरीप्रारंभ : अथ खंडमेरुसंज्ञार्थमत्कृतं सूत्रम् अथ सुमेरुसंज्ञार्थ सूत्रम् अथतिलघुक्रियाप्रस्तारे श्लोकसूत्रम् अथ संख्यानम् अथ नष्टोद्दिष्टकम् अथ नष्टप्रत्यय अथ खंडमेरुसंज्ञार्थमत्कृतं सूत्रम् वृत्त म्हणजे कांहीं नियमित अक्षरांत लघु- गुरुंची विशिष्ट क्रमानें रचना करुन दाखविणें. Tags : grammermarathiमराठीवृत्तव्याकरण अथ खंडमेरुसंज्ञार्थमत्कृतं सूत्रम् Translation - भाषांतर एकाधिकानंघ्रिवर्णमितान् कोष्ठांस्त्वधो लिखेत् ।एकैकोनानूर्ध्व यावदेकमधस्तथा ।कर्णकोष्ठेषु चैकेकमथोर्ध्वाधो युतिं लिखेत् ।समीपकोष्ठे तिर्यक्स्थे खंडमेरुरयं स्मृत: ॥८॥एवं षडक्षरचरणस्य समवृत्तस्य चतु: षष्टि भेदा भवन्ति ।खंडमेरु ( अर्धमेरु )जोशीबुवा म्हणतात, खंडमेरुचें ज्ञान होण्याकरितां मीं केलेलें सूत्र असें आहे. ‘ एकाधिकोनि ’ त्यादि. याचा अर्थ: - ज्या वृत्ताचा आपल्यास प्रस्तार करावयाचा असेल, त्याच्या चरणांत जितकी अक्षरें असतील , त्यांत एक मिळवून जी संख्या होईल, तितकीं कोष्टकें सरळ खालीं मांडावींत . नंतर त्यावर एकेक कोष्टक कमी करुन एक कोष्टक येईपर्यंत क्रमानें वरची वरची कोष्टकें काढीत जावें. नंतर प्रत्येक कोष्टकाच्या ओळींतील शेवटच्या कोष्टकांत व सर्वात खालच्या ओळींतील सर्व कोष्टकाच्या ओळींतील शेवटच्या कोष्टकांत व सर्वात खालच्या ओळींतील सर्व कोष्टकांत एकेक आकडा मांडावा. नंतर वरच्या व खालच्या कोष्टकातील आकड्यांची बेरीज शेजारच्या मागच्या कोष्टकांत मांडावी. अशा रीतीनें मांडीत गेलें असतां खंडमेरु होतो यापुढची गोष्ट स्पष्ट असल्यामुळें जोशीबुवांनी ती लिहिली नाही. ती ही कीं अशा रितीनें खंडमेरु तयार झाल्यावर कोष्टकांची पहिली उभी जी रांग त्यांतील आंकडयांची बेरीज केली असतां त्या वृत्ताची प्रस्ताराची संख्या निघते.व त्याप्रमाणेंच प्रथम कोष्टकांतील आकडा सर्वलघु अथवा सर्वगुरुंच्या प्रकाराचा दर्शक असतो. दुसर्या घरांतील आकडा एक लघु अथवा गुरु याच्या भेदाचा दर्शक असतो. तिसर्या घरांतील आंकडा दोन लघु अथवा गुरु यांच्या भेदाचा निदर्शक असतो. याप्रमाणें शेवटपर्यंत लघु अथवा गुरु यांची संख्या वाढवीत जावे. आणि शेवटचा आकडा सर्वलघूंचा समजावा. पहिला सर्वगुरु व शेवटचा सर्वलघु असें समजून मधले भेद क्रमाक्रमानें एकलघु, व्दिलघु अथवा एकगुरु, व्दिगुरु असे समजावेत. हें स्पष्ट होण्याकरितां एक षडक्षर चरण घेऊन त्याच्या खंडमेरुचें कोष्टक खाली काढून दाखवितों.सहा अक्षरांचा खंडमेरु१६ ११५ ५ १२० १० ४ ११५ १० ६ ३ १६ ५ ४ ३ २ ११ १ १ १ १ १ १-------------------६४ N/A References : N/A Last Updated : March 05, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP